मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाककृती : आमरस

शाहरुख · · पाककृती
साहित्य : पिकलेले आंबे, पातेलं, कणभर मीठ १. हात स्वच्छ धुवा. २. बनियन काढा..वातानुकुलित घरात रहात नसाल तर कृती करायच्या मोसमात शर्ट घातला नसेलच..शर्ट असेलच घातलेला तर शर्ट काढून मग बनियन काढा..स्त्री वर्गाने एखादा जुना अ‍ॅप्रन चढवावा. ३. प्रत्येक आंबा जरासा पिळून देठाजवळील चिक काढून टाका..आणि मग पिळून रस पातेल्यात जमा करा. ४. काही मंडळी रस मिक्सरमधून काढतात..शप्पथ आहे तुम्हाला असे कराल तर..हातानेच रस एकजीव करा. ५. कणभर मीठ घाला..आंबे निवडताना फसले गेला नसाल तर साखर घालायची गरज नाही..जरा ढवळून घ्या. ६. काही मंडळी कोयी आणि साली दुधात धुवून वगैरे ते रसात घालतात..पण मी म्हणतो कशाला उगाच..रस काढल्याचा मेहनताना म्हणून कोयी आणि साली स्वतःच चोखुन चोखुन पार पांढर्‍या फट करुन टाका. ताटात पोळ्यांचा ढीग (कोणी आयत्या गरम गरम करुन वाढणार असेल तर चांगलंच आहे) आणि वाटीत रस घेऊन बसा जेवायला..रसाचं पातेलं जवळंच ठेवा..संपवून उठा आणि झोपायच्या खोलीकडे प्रस्थान करा :D कृती लेखकाने स्वतः केली आहे यावर विश्वास ठेवावा..पातेलं, आंबे, रस वगैरेचे फोटो सवडीने. गुडनाईट इंडिया !!

वाचन 20327 प्रतिक्रिया 49