साहित्यः
२ कप स्वछ केलेली कोलंबी /कोळंबी
२-३ कांदे बारीक चिरून
२-३ लसूण बारीक चिरून
२-३ कोकम (आमसूले)
दीड टीस्पून लाल तिखट (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१/२ टीस्पून हळद
१ १/४ चमचा गरम मसाला
मीठ चवीप्रमाणे
तेल
पाकृ:
तेल तापवून त्यात चिरलेले कांदे आणी लसूण घालून परतणे.
त्यात कोकम्,सर्व मसाले व मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतणे.
मग त्यात कोलंबी घालून सगळे एकत्र करणे.
झाकण ठेवून ८-१० मिनिटे कोलंबी शिजू द्यावी.
शिजलेल्या कोलंबी मसाल्यात आपोआपच कोलंबीचे पाणी सुटेल.
वरून बारीक चिरलेले कोथिंबीर घालून चपाती, रोटी सोबत खायला सुरुवात करावी :)
आवडत असेल तर टोमॅटो चिरून घालणे पण मग कोकम घालू नये.
प्रतिक्रिया
10 Apr 2011 - 10:45 pm | चिरोटा
मस्तच आहे. ह्यात खोबरे(वाटप का काय ते) नाही का घालत? आमटीत तरी घालतात बहुतेक.
11 Apr 2011 - 2:32 am | सानिकास्वप्निल
खोबरे,लसूण्,कोथिंबीर आणी चिंचेचा कोळ घालून कोलंबीचे कालवण करतो आम्ही.
वरील पाकृमधे कांदा भरपूर घालूनच बनवतो. (रस्सा नसल्यामुळे चपाती, रोटी सोबत खाता येतं)
:)
10 Apr 2011 - 11:29 pm | सुनील
पदार्थ दिसतोय मस्तच. मला स्वतःला नारळाचे दूध घालून केलेली कोलंबी जास्त आवडते.
11 Apr 2011 - 1:50 am | गणपा
मस्तच.
11 Apr 2011 - 6:38 am | गोगोल
कोलंबी खूप आवडते.
कोलंबी भात कुणाला येतो का?
11 Apr 2011 - 12:05 pm | जागु
तों.पा.सु.
11 Apr 2011 - 12:11 pm | मराठमोळा
जबराट फोटु... :)
के...व...ळ... अ...प्र...ति...म...!!!
:)
कुणीतरी तंदूर कोलंबीची पण पाकृ टाका. लै मस्त प्रकार असतो तो.
11 Apr 2011 - 12:53 pm | गणपा
हिट लिस्ट वर आहे ;)
11 Apr 2011 - 1:11 pm | मराठमोळा
>>हिट लिस्ट वर आहे
वाट पहात आहोत. बाकी तुमचा भारत दौरा कधी ते पण कळवा. म्हंजे आम्ही तयारीत राहु ;)
11 Apr 2011 - 1:22 pm | यशोधरा
मस्त.
11 Apr 2011 - 1:52 pm | RUPALI POYEKAR
छान रेसिपी
11 Apr 2011 - 4:19 pm | गवि
आई ग्ग... आज भुकेजलेला बसलोय आणि एकामागून एक अत्यंत आवडत्या रेसिपीज येताहेत. हाल चाललेत जिवाचे.
झकास फोटो आणि झकास पाकृ..
11 Apr 2011 - 4:23 pm | परिकथेतील राजकुमार
जौ दे.. आम्ही आपले कोळंबी ऐवजी बटाटा अगर टॉमॅटो वापरु.
कृपया अशा पाकृ देऊ नयेत. रेवती काकु शाकाहारी रहावे का मांसाहारी अशा द्विधा मनस्थीतीत जातात आणि मग स्वयंपाकाचा बट्ट्याबोळ उडतो म्हणे.
12 Apr 2011 - 9:02 am | दीपा माने
आम्ही न्युयार्कला एक दिवसाच्या निसर्ग प्रवासासाठी जातो तेव्हा मी अगदी अशीच सुकी कोलंबी आणि चपात्या किंवा पीटा ब्रेड लंचसाठी मुख्य पदार्थ म्हणुन पुष्कळदा नेत असते. निसर्गाच्या सहवासात आपलं खाणं खाताना जो आनंद मिळतो तो केवळ अवर्ननियच! माझा हा ट्रीपचा मेनु गेल्या चाळीस वर्षापासुनचा आहे.
आपल्या पाकक्रुती फारच सुंदर असतात.
13 Apr 2011 - 4:54 am | चित्रा
छानच... आत्त्ताच हवे असे झाले.. :)