चटपटीत भेळ

स्पा's picture
स्पा in पाककृती
28 Mar 2011 - 8:12 pm

माझी मिपावरची पहिली वहिली पाक्रु (गणपा, निवेदिता तै, स्वाती तै आदी प्रभूतींनी सांभाळून घ्यावे ;) )

थोडक्या कष्टात दाबून काही खायचं असेल तर भेळेला पर्याय नाही
चटपटीत भेळ (४ माणसांसाठी)

साहित्य :

कुरमुरे - ८ वाट्या
फरसाण - २ वाट्या
बारीक शेव - १ वाटी
कोथिंबीर , पुदिना - २ वाट्या
लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या - ५,६
टोमाटो, उकडवलेले बटाटे, २ कांदे (बारीक चिरलेले)
खजूर - १ वाटी
चिंचेचा कोळ - अर्धी वाटी
गुळ - १ चमचा
जिरं, मीठ , चाट मसाला चवीपुरता

कृती :-

गोड चटणी :- सर्वप्रथम खजूर, गुळ, चिंच पाण्यात ५-६ मिनिटे उकळवून घ्यावी
मग त्यात जिरं, मीठ घालून , घोटून गाळण्याने गाळून घेतली , कि झाली गोड चटणी तयार

तिखट चटणी :- हिरव्या मिरच्या,कोथिंबीर, पुदिना, लसूण, मीठ झकास मिक्सर मधून वाटून घावे , तिखट चटणीही झाली तयार .

आता वाट कसली बघताय, करा सर्व एकत्र, वरतून चाट मसाला भुरभुरवा , आणि शेव आणि कोथिंबीर टाकून पेश करा

आता या भेळेला चाट गाडीवरच्या , कुठे कुठे हात लावून खाजवलेल्या भैयाच्या हाताची चव येणार नाही, पण अशी चव येईल कि तुम्ही परत गाडीवर जाणार नाही हे नक्की
;)

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

28 Mar 2011 - 8:15 pm | छोटा डॉन

ख-प-लो !!!!
लै खतरनाक फोटु बॉस, मान गयें

- छोटा डॉन

पैसा's picture

28 Mar 2011 - 8:19 pm | पैसा

काय भारी फोटो आलेत!
सध्या थोडीशी कैरी पण मस्त लागते भेळेत, आणि हो, फोटो काढण्याएवढा थांबलास बरा खाण्यापूर्वी!

फोटो काढण्याएवढा थांबलास बरा खाण्यापूर्वी!

कशीबशी कळ काढली, आणि नंतर असा ताव मारलाय कि बास्स :)

मस्त फोटू ... फक्त प्रमाण ४ माणसांसाठीचे वाटत नाही :)

- चारझन

फक्त प्रमाण ४ माणसांसाठीचे वाटत नाही

अरे ते फोटोत दाखव्ण्यापुर्ता रे...

बाकीचं पातेलं लपवून ठेवलं आहे, एवढं शो करत बसलो नाही :D

श्रीराम गावडे's picture

28 Mar 2011 - 8:27 pm | श्रीराम गावडे

खूप भारि झालीये भेळ. असे फोटु पाह्यल्यावर आता घरचा रस्ता धरणे आलेच.

अर्रर्र!! मिष्टेक!!
तिखट चटणी :- कोथिंबीर, पुदिना, लसूण, मीठ झकास मिक्सर मधून वाटून घावे , तिखट चटणीही झाली तयार .

यामध्ये हिरवी मिरची नाही तर ही तिखट कशी लागेल भौ!! मिष्टेक झाली का? पुदीन्याच्या चटणीत हिरव्या मिरचीला पर्याय नाही..!

फोटो चांगला आहे.

स्पा's picture

28 Mar 2011 - 9:10 pm | स्पा

बदल केल्या गेल्या आहे :)

निवेदिता-ताई's picture

28 Mar 2011 - 10:50 pm | निवेदिता-ताई

हे कुरमुरे वेगळेच दिसतायत???

आम्चे इकडे वेगळे असतात...म्हणजे त्यात प्रकार आहेत..पंढरपुरी, कोल्हापुरी वगैरे.

हे कुरमुरे वेगळेच दिसतायत??

ई भडंग कुरमुरा हे मेमसाब

विशाखा राऊत's picture

28 Mar 2011 - 8:41 pm | विशाखा राऊत

अहाहा.. खुपच छान.. all time favourite..
सुकी असो वा ओली... भेळ कधीहि मस्तच...

योगप्रभू's picture

28 Mar 2011 - 9:20 pm | योगप्रभू

आठ वाट्या चुरमुर्‍यांऐवजी चार वाट्याच घेतल्या आणि उरलेल्या चार वाट्या सांगलीचे गोरे भडंग, भोरे भडंग किंवा जयसिंगपूरचे भडंग (सर्व दुकानांत/ग्राहक बझारमध्ये रेडीमेड मिळते) टाकले तर आणखी झक्कास भेळ.

आमच्याकडे पुण्यात पुष्कर्णीची कोरडी भेळ व दोन्ही चटण्या तयार मिळतात. आम्ही घरी त्यात भडंगचे एक पाकिट आणि बाकी मालमसाला मिसळतो. फार मस्त भेळ तयार होते. हलदीरामचीही तयार भेळ चवीला चांगली आहे.

स्पा यांच्या भेळेचे लपवून ठेवलेले पातेले मी शिताफीने पळवून आणले आहे. इच्छुकांनी भेळ खायला यावे, पण त्यांना कृपया सांगू नये. :)

सांजसखी's picture

28 Mar 2011 - 9:28 pm | सांजसखी

फुटू पाहून तोंडाला पाणी सुटले...
छान जमली आहे हो भेळः)

जयंत कुलकर्णी's picture

28 Mar 2011 - 9:31 pm | जयंत कुलकर्णी

चायला, कोठे रहातोस रे तू ?

निवेदिता-ताई's picture

28 Mar 2011 - 9:47 pm | निवेदिता-ताई

मा़झी सगळ्यात आवडती........भेळ.....भेळेला पर्याय नसतो.......

अतिशय सुंदर........फोटू पण..

असुर's picture

28 Mar 2011 - 9:55 pm | असुर

स्पाल्या, कुफेहेपा??

--असुर

तरीच आज तुमच्या हापिसाच्या खानावळित गर्दि नव्हती, खाली पार्किंगमध्येच होती सगळी कष्टकरी मंडळी. तुला काय वाटलं आमाला कळत नाही काय असले साईडबिझनेस केलेले.

जिस बिल्डिंग मे तुमारा हापिस है ना, उस बिल्डिंगा का कॅमेरा हमारे टिम ने लगाया है.

चला, तुमची पण पुर्वतयारी चालु झाली. मासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काय ?

अवांतर - मिपावरचं सगळं लगनाळु पब्लिक हल्ली पाकक्रुती आणि देव देव करायला लागलंय, म्हणजे पुढच्या सिझन्ला आहेराच्या नावानं लई गल्ल्ला खाली होणार आहे. आतापासुनच मिपासदस्यलग्नआहेरफंड काढला पाहिजे.

प्रचेतस's picture

28 Mar 2011 - 11:03 pm | प्रचेतस

लै भारी प्रतिसाद. एक नंबर

तुला काय वाटलं आमाला कळत नाही काय असले साईडबिझनेस केलेले.

ओ , आयला हर्षद , तू रोज हापिसात येऊन जातोस व्हय रे
गविन सारखा तू पण टांग द्यायला लागलास :D

मिपावरचं सगळं लगनाळु पब्लिक हल्ली पाकक्रुती आणि देव देव करायला लागलंय, म्हणजे पुढच्या सिझन्ला आहेराच्या नावानं लई गल्ल्ला खाली होणार आहे. आतापासुनच मिपासदस्यलग्नआहेरफंड काढला पाहिजे.

तेजायला , बाजार उठवल्या गेल्या आहे :D

गवि's picture

29 Mar 2011 - 9:58 am | गवि

स्पावड्या.. झकास पाकृ रे..

चळचळून लाळ सुटली. असो.. ज्यास्ती वर्णन नाय करत.

फरसाण हे प्रेफरेबली कोकण साईडचे असावे.. ते मस्त तिखट आंबट गोड आणि खुसखुशीत असते.

चुरमुरे नाशिक / मुंबईचे नकोत कारण ते पोह्यासारखे असतात आणि बेचव. शिवाय ओली चटणी मिसळल्यावर पुळकावणी होऊन जातात.

बेश्ट चुरमुरे सांगली कोल्हापुर साईडला बनणारे..कुरकुरीत आणि टपोरे. (वर यो.प्र. नी म्हटल्याप्रमाणे भडंग हाही चांगला पर्याय आहे. फक्त त्यात तिखट्गोड भडंग मसाल्याची टेस्ट वरचढ होऊन भेळेचा स्वतःचा इफेक्ट जातो.)

आज घरी जाताना सामान घेऊन जातो भेळेचे. रात्री तर रात्री, आता खाल्लीच पाहिजे.

अवांतर : टांग नाही रे मित्रा खरंच.. अडकलो आहे बारा गोष्टींत एकावेळी. बाकी व्यनी.

कुंदन's picture

28 Mar 2011 - 10:40 pm | कुंदन

आजच करुन बघितली.
छान झाली होती.

कुंदन's picture

28 Mar 2011 - 10:40 pm | कुंदन

आजच करुन बघितली.
छान झाली होती.

आमच्या एका मित्रानं आज पुणेरी आमंत्रण दिलं होतं. (येण्या जाण्याचा वेळ अन खर्च बघता त्या खर्चात चार -पाच भेळेच्या गाड्या आल्या असत्या ही गोष्ट वायली.)

एकानं मीठ-मसाला भुरभुरला अन दुसर्‍याने लिंबु पिळलं, आता भेळेचे डोहाळे लागलेत. :(

मेघवेडा's picture

28 Mar 2011 - 10:57 pm | मेघवेडा

कडक फोटू!

प्रचेतस's picture

28 Mar 2011 - 11:04 pm | प्रचेतस

तोंडाला पाणी सुटले.
कधी येउ चटपटीत भेळ खायला बोल?

रेवती's picture

28 Mar 2011 - 11:56 pm | रेवती

रंगीबेरंगी फोटू खल्लास!
तुम्ही पाकृ प्रांतात घुसखोरी केली म्हणायची!;)

शिल्पा ब's picture

29 Mar 2011 - 12:26 am | शिल्पा ब

मस्तच रे!!

पुष्करिणी's picture

29 Mar 2011 - 1:45 am | पुष्करिणी

जबरदस्त रे स्पा !!
भारी फोटू

नगरीनिरंजन's picture

29 Mar 2011 - 5:16 am | नगरीनिरंजन

मस्त! पण प्रमाण गंडलंय का स्पा? चार-पाच वाट्या तर मी येकटाच खाईन.

चार-पाच वाट्या तर मी येकटाच खाईन.

ओय , ननी ते प्रमाण व्यक्ती सापेक्ष आहे बर्र .... :D

विंजिनेर's picture

29 Mar 2011 - 9:22 am | विंजिनेर

ऐय छोटू, एक भेल इद्दरभी देना. मिडीयम तिखट मंगता हय.

सूर्यपुत्र's picture

29 Mar 2011 - 10:07 am | सूर्यपुत्र

>>आता या भेळेला चाट गाडीवरच्या , कुठे कुठे हात लावून खाजवलेल्या भैयाच्या हाताची चव येणार नाही, पण अशी चव येईल कि तुम्ही परत गाडीवर जाणार नाही हे नकी
मग, समजा, ही बेळ जर समजा आपणच कुठे-कुठे हात लावून खाजवून केली, तर भैय्याच्या हाताची चव येइल का? ;)
की त्यासाठी भैयाचाच हात वापरावा लागेल?? ;)

-सूर्यपुत्र.

मग, समजा, ही बेळ जर समजा आपणच कुठे-कुठे हात लावून खाजवून केली, तर भैय्याच्या हाताची चव येइल का?
की त्यासाठी भैयाचाच हात वापरावा लागेल??

अहो मग त्यात विचारता काय?
करून बघा लगेच
हातच्या खाजेला अर्रर कंकणाला आरसा कशाला? ;)

स्पंदना's picture

29 Mar 2011 - 10:32 am | स्पंदना

स्पावड्या बावड्या काय काम उरली नाहित कारे तुला?

मला त्रास झाला नाही, कारण मी पाहिले नाही, जे पाहिले नाही त्याने तोंडाला पाणी सुटले नाही. अन न वाचल्याने भैयाच्या हाताचा नमुना आठव्या नही.

मुलूखावेगळी's picture

29 Mar 2011 - 10:52 am | मुलूखावेगळी

मस्त रे स्पा
किचनकडे कसा काय वळलास.
हर्षद म्हन्तो त्याप्रमाने लग्नाची तयारी का ;) चालु दे मग आनि अजुनही असतील तर पाक्रु टाक

आमाला भेळ आवडत नाही. त्यामुळे वरील भेळदेखील आवडली नाहीये (हे वे सां न ल)

उगाच चार दोन प्लेटा खातो बस्स. कुणाचे (चाणाक्ष वा ल आ अ च.) मण दुखावायला नको म्हणून.

पु पा कृ साठी शु. त्याहून जास्त पु ल (= लग्न) शु.

सूर्यपुत्र's picture

29 Mar 2011 - 4:15 pm | सूर्यपुत्र

>>पु पा कृ साठी शु. त्याहून जास्त पु ल (= लग्न) शु.
म्हणजे, पुढील लग्नासाठी शुभेच्छा??
बापरे...

-सूर्यपुत्र.

प्यारे१'s picture

29 Mar 2011 - 5:13 pm | प्यारे१

आय्ला असं झालं काय?

'पु' न लिहिता 'प= पय्ल्या' लिहितो मग.

लिझ टेलर गेली बिचारी.

तिच्यासाठी बरे होते असे लिहिणे.

जागु's picture

29 Mar 2011 - 11:49 am | जागु

जबरदस्त.

सूड's picture

29 Mar 2011 - 12:47 pm | सूड

काय स्पा कोणासाठी हे चटपटीत वैगरे बनवायला शिकतोय्स ??
काही विशेष ??
;)
बाकी फोटु छान आलेत.

इंटरनेटस्नेही's picture

29 Mar 2011 - 12:48 pm | इंटरनेटस्नेही

मस्त! मस्त! अगदी पंचतारांकित म्हणावी अशी भेळ! आवडली.. बाकी स्पा लग्नाची पुर्वतयारी करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ;)
.

कवितानागेश's picture

29 Mar 2011 - 2:52 pm | कवितानागेश

स्पा जोरदार तयारीला लागला आहे!
;)

अवांतरः घरी कधी येउ?

sneharani's picture

29 Mar 2011 - 4:28 pm | sneharani

वा! मस्त चटपटीत भेळ!!
:)

सानिकास्वप्निल's picture

29 Mar 2011 - 5:04 pm | सानिकास्वप्निल

चटकदार दिसतेय भेळ :)

वपाडाव's picture

29 Mar 2011 - 5:07 pm | वपाडाव

तिज्यायला... सुरुवातीला पाहिलं भेळ म्हणलं असंच लिहिलं असंन क्वणतरी...
पण हर्षद ख.व्.त येउन ढेकरा द्यायला लागला ना भौ....
मंग म्हणलं... आपण जाउन मुठभर खाउन यावं...

स्पावड्या... गल्ली चुकलास काय?
ख मं ग ....

मला गोविंदाचं गाणं आठौलं... मै तो रस्ते से जा रहा था..

सखी's picture

29 Mar 2011 - 5:32 pm | सखी

चटपटीत भेळ, भेळेला खरचं पर्याय नाही. फोटो मस्त आलेत.
संदीप चित्रेचा भेळेवरचा लेख आठवला, तो लेखही असाच चटपटीत होता.

संदीप चित्रे's picture

30 Mar 2011 - 2:37 am | संदीप चित्रे

ठेवल्याबद्दल धन्स :)
तो लेख इथे वाचता येईल.

प्रीत-मोहर's picture

29 Mar 2011 - 6:03 pm | प्रीत-मोहर

मी सुद्धा अश्शीच बनव्ते भेळ!!!

गणपा हा सगळ्या लग्नाळू मिपाकर पुरूष सदस्यांचा अलिखित गुरू बनला आहे..! त्यामुळे गणपाकडून प्रेरणा घेऊन ही सगळी मंडळी पाकृ विभागात घुसली आहेत.. फोटो काढतात बरे आणि डकवतात !! चव कशी होती.. कोण गेलंय बघायला!! ;)

रमताराम's picture

31 Mar 2011 - 6:51 pm | रमताराम

चव कशी होती.. कोण गेलंय बघायला!!
आपले हक्काचे कुरण हातचे चाललेले पाहून पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटते आहे का? इनो पार्सल केले आहे. मिळाले की योग्य प्रमाणात घेणे.

(लाटणं टकुर्‍यात बसायच्या किंवा प्राजुतैंनी केलेली भेळ खाण्याची शिक्षा फर्मावली जाण्याच्या आत पळतो.)

-सुग्रणराम

स्पा's picture

29 Mar 2011 - 7:47 pm | स्पा

ओ मी लग्नाळू नाय वो ......
जरा माझ्या आयला मदत करतो होतो...
तर त्या हर्षद ने माझा बाजारच उठवला डायरेक्ट :D

असुर's picture

29 Mar 2011 - 9:03 pm | असुर

स्पायल्याची फिफ्टी झाली की!!!!
आत्महत्येपासून ते भेळेपर्यंत - हा स्पायल्या किमान फिफ्टी मारतोच!!
रेवतीआजीला सांगितलं पाहीजे!!!

--असुर

रेवती's picture

29 Mar 2011 - 9:10 pm | रेवती

वाचत्ये आहे हो असुरा!
पण या वयात आत्महत्या करण्याचा खर्च कशाला मी म्हणते?
माझा देव मला बोलावणं धाडील त्या दिवशी विमानात बसून जायचं.;)
बाकी हा स्पा कि कोण तो लग्नाळू वाटतो आहे.
माझ्या नातीची मैत्रिण आहे हो लग्नाची.....असेल कर्तव्य तर सांग.:)

>>> पण या वयात आत्महत्या करण्याचा खर्च कशाला मी म्हणते?
माझा देव मला बोलावणं धाडील त्या दिवशी विमानात बसून जायचं. <<<
अगो आज्जी, तुज कोण म्हणते आहे जावयास? तुला तर विमानप्रवासाची भिती देखील वाटते असं काहीसं म्हणत होतीस ना? हा स्पायलू लिहीतो असले आत्महत्येचे धागे, लोक त्यावरही प्रतिसाद देतात. थोडेथोडके नव्हे तर शेकड्याने! म्हणून म्हटले की तुज सांगावे, "आपल्याच धाग्यांवर प्रतिसाद का येत नाहीत" हा तुला आदिम काळापासून पडलेला प्रश्न तुझ्या नुकत्याच झालेल्या प्रतिसाद-शंभरीमुळे आता मला पडलाय!

>>> बाकी हा स्पा कि कोण तो लग्नाळू वाटतो आहे. <<<
अलबत!! आणि सर्व लग्नाळू मुलांप्रमाणे हे सत्य तो नाकारतोदेखील आहे हो! कौतुकास्पद आहे हो अगदी. :-)

>>> माझ्या नातीची मैत्रिण आहे हो लग्नाची.....असेल कर्तव्य तर सांग. <<<
कर्तव्य कुणास? स्पा की मी? स्पाच बरा हो, त्यालाच विचार! आमचा काय भरोसा नाही! ;-)

रेवती's picture

29 Mar 2011 - 9:30 pm | रेवती

अरें, ते आकाशातले विमान नव्हे.......तुकोबांना आले ना न्ह्यायला.....ते म्हणते मी!
आणि लग्नासाठी असूर कसा चालेल? हा स्पा सुद्धा मडमेच्या गावातला दिसतोय. त्याचं नाव मला कवळी न लावता म्हणताच येत नाही. भेळेचा फोटू मात्र चांगला आलाय हो! अगदी काही नाही उद्योग केला तरी भेळेची गाडी नाहीतर फोटू काढून संसार चालवेल. चला, किर्तनाला जायची वेळ झाली.;)

असुर's picture

29 Mar 2011 - 9:39 pm | असुर

__/\__

धन्य हो तू!! आता हे म्याटर लायनीला लागलेच आहे तर स्पायलूच्या लग्नाचा (आमंत्रण+कामेंटरी+विश्लेषण+फोटू) धागा काढला तर १०० प्रतिसाद होतील का ग? पण हा धागा मी काढणार हो, भले तुझ्या नातीची मैत्रीण असली तरी! कधीतरी माझीही शंभरी होऊ दे की! :-)

आणि किर्तनाला जाशील तर तर प्रसादाचे साखरफुटाणे घेऊन ये माझ्यासाठी. गेले कित्येक दिवस स्वत:च खाऊन टाकते आहेस! ;-)

--असुर

रेवती आजी अणि असुराजोबा

__/\__

अगगागाग्गा
नका रे नका बाजार उठवू, पुरे आता
नका सगळ्यांना कोलीत देऊ हातात :D
बाकी पु. प्र.(=प्रतिक्रियांना) शु

असुर्या थांब, तू गावशीलच कधीना कधी....
गेलास तू आता, गेम ओवर ;)

स्पावडी भेळ चटपटीत आहे. पण त्यावरच्या कॉमेंट मात्र भलत्याच चटपटीत आहेत. भेळ खाताना कॉमेंट वाचल्या तर मज्जा येईल.

- (भेळ चर्चावाला) पिंगू

संदीप चित्रे's picture

29 Mar 2011 - 11:49 pm | संदीप चित्रे

'भेळ' ह्या एका गोष्टीनेच आम्ही खपतो...
जास्त बोलण्यात वेळ घालवत नाही.... आज संध्याकाळी भेळ खावी असा प्लॅन केलाय :)

रुक्मिणि स्वयंवर वाचायच्या ऐवजी आता सगळ्या लग्नाळुंनी भेळ करुन त्याचे फोटो आंजावर टाकल्यास, प्रतिक्रिया तर मिळतीलच अधिक स्थळं पण सांगुन येतील.

आणि स्पा, अरे खरंच आता आज मॅचसाठी कैरी घालुन कर भे़ळ. त्या कैरीचा पण फोटो टाक, इथं. म्हणजे तुला भाज्यातलं बरं वाईट कळतं का नाही ते कळेल,तेवढंच सिव्ही मध्ये बरं दिसतं रे ते.

मी यापुढं एक दिवस आधीच कळवत जाईन तुला तिकडं येताना, म्हणजे ते खानावळितलं जेवणं जेवण्यापेक्षा त्या उडणा-या माणसाजवळ बसुन भेळ खाउ आपुण, अर्थात तुझ्याबरोबर कोणी नसली तर.

पुन्हा एकदा पुशु.

वपाडाव's picture

30 Mar 2011 - 8:54 am | वपाडाव

कैरी घालुन कर भे़ळ.

हो रे स्पावड्या, डोहाळे लागलेत सगळ्यांना तुझ्या लग्नाचे...
मी मात्र तुझ्या पाठीशी उभा राहीन हो... पडत्या काळात कुणी नको का तुझ्या सवे... (करवला म्हणुन)

अर्थात तुझ्याबरोबर कोणी नसली तर.

ठॉ ठॉ ठॉ...
हर्षदराव, लै सुप्पार्‍या घेताय म्हणे आजकाल...

''मी मात्र तुझ्या पाठीशी उभा राहीन हो... पडत्या काळात कुणी नको का तुझ्या सवे... ''

@ वपाडाव, स्पा मला विचारत होता काच पडत होती तेंव्हा कुठं गेला होतास तु ?

स्पा मला विचारत होता काच पडत होती तेंव्हा कुठं गेला होतास तु ?

हा हा हा हा

कै च्या कै कनेक्शन....

आव्रा :D

रणजित चितळे's picture

30 Mar 2011 - 11:40 am | रणजित चितळे

काही लसुण घालत नाहित

कैरीच्या बारिक फोडी छान लागतात.

नि३सोलपुरकर's picture

31 Mar 2011 - 5:54 pm | नि३सोलपुरकर

भेळ मस्त झालीय.
च्यायला नेमका उपवासाच्या दिवशी धागा वाचायला घेतला. बाकी जाणकार उपवासाची भेळ यावर प्रकाश टाकतील अशी आशा ..

अवातर : पुण्यात पुना गेस्ट हाउस येते उपवासाची थाळी मिळते ..

त्यालाच अपना घर असेही म्हटले जाते....डेक्कन कॉर्नरला आहे तेच ना !!!!

नि३सोलपुरकर's picture

1 Apr 2011 - 11:45 am | नि३सोलपुरकर

मी ल़क्ष्मी रोड वरील पुना गेस्ट हाउस बद्द्ल बोलत आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

31 Mar 2011 - 6:03 pm | परिकथेतील राजकुमार

वा र लो !!!

सुहास..'s picture

31 Mar 2011 - 7:24 pm | सुहास..

जो र दा र !!

अवांतर : परश्या , आता नक्की लग्न होईल बघ तुझे ; )

स्मिता.'s picture

31 Mar 2011 - 9:05 pm | स्मिता.

ही पाकृ पहिल्यांदा पाहिली तेव्हाच तोंडाला पाणी सुटलं आणि मी असूयेपोटी प्रतिसाद देण्याचं टाळलं.
पण रोज-रोज नवीन प्रतिसाद येतात आणि रोज ते भेळेचे फोटु बघायला मी धागा उघडतेच!!
का असे फोटो टाकता??? आमच्या सारख्यांना जळवण्यासाठीच हे असं करतात.
आता मी काही छान वगैरे म्हणणार नाही... फक्त 'कर्तव्या'साठी शुभेच्छा देते ;)

धमाल मुलगा's picture

1 Apr 2011 - 12:10 pm | धमाल मुलगा

काय फोटू म्हणायचं का काय वो हे? स्क्रीनकडं हात गेला न्हवं का सगळी भ्येळ गाप्प करायला :)

चला,आता पुढच्या भटकंतीला स्पाशेठला घेऊन जाऊ.
स्पाशेठ, भटकंतीला येताना पाठीवरच्या सॅकमध्ये भेळेचे जिन्नस आणि डोक्यावर पातेलंच घालून या. :D

अवांतर: ह्याच्या लग्नाला 'बारातीयोंका स्वागत स्पा भेळ' ने होणार वाटतं. ;)

तेजायला चटण्या काय तुझ्या डोक्यावर वाटू काय बे?
मिक्सर कुठून आणणार?

सुकी भेळ करावी लागेल

धमाल मुलगा's picture

1 Apr 2011 - 12:23 pm | धमाल मुलगा

प्रकाटाआ.

विषय संपला.
धन्यवाद. ;)

धमाल मुलगा's picture

1 Apr 2011 - 12:21 pm | धमाल मुलगा

चटण्या घरुन करुन आणणेत याव्यात ही णम्र इनंती.
-हुकुमावरुन. ;)

मातोश्रींनी पुरवलेल्या माहिती नुसार पुदिना चटणी ३ ४ तासात खराब होते, जर फ्रीज मध्ये ठेवली नाही तर

धमाल मुलगा's picture

1 Apr 2011 - 2:54 pm | धमाल मुलगा

१ थर्मास,
१/२ किलो बर्फ
१ प्लॅस्टिकची पुरचुंडी
हवी तित्की चटणी.

कृती:
एक थर्मास स्वच्छ धुवून घ्यावा. आता अर्धा किलो बर्फ बारीक कुटुन त्याचा चुरा करावा. हा बर्फाचा चुरा थर्मासमध्ये नीट बसवावा.चटणी किती आहे ते पाहून साधारण तेव्हढी जागा ठेऊन उरलेला थर्मास बर्फाने भरून घ्यावा.
आता ती चटणी प्लॅस्टिकच्या पुरचुंडीत भरावी. ही पुरचुंडी त्या बर्फ भरलेल्या थर्मासमध्ये ठेवावी. थर्मासचे झाकण घट्ट लावून घ्यावे.

चटणीचे आयुष्य वाढायला मदत होईल.

आयुष्यमान भौ !!

धमाल मुलगा's picture

1 Apr 2011 - 3:50 pm | धमाल मुलगा

आयश्यायश्याय प्रुडेन्श्याल वाले का तुमी? ;)

स्पा's picture

1 Apr 2011 - 3:06 pm | स्पा

__/\__

५० फक्त's picture

3 Apr 2011 - 2:15 pm | ५० फक्त

''मातोश्रींनी पुरवलेल्या माहिती नुसार पुदिना चटणी ३ ४ तासात खराब होते, जर फ्रीज मध्ये ठेवली नाही तर ''
@ धमु, अरे आपण ३४ तासाच्या ट्रेकला जाणार आहोत का, आणि गेलो तरी स्पाची भेळ ३४ तासाच्या आतच संपेल ना. मग कशाला उगा वजन वाढवा सामानाचं,

असु दे रे स्पा, तु घेउन ये चटणी, काही होत नाही ३४ तास चटणीला,

सखी's picture

3 Apr 2011 - 6:19 pm | सखी

अजुन एक आइडायची कल्पना अशी की घरातुन निघायाच्या आदल्या दिवशीच जर चटण्या डीप फ्रीज प्लॅस्टिकच्या पुरचुंडीत करुन ठेवल्या तरी त्यांचे आयुष्य वाढायला मदत होते. नंतर त्या हळुहळु वितळायला लागुन नॉरमालला यायला लागतात २-४-६ तासात (बाहेर किती तापमान आहे यावरुन). प्लॅस्टिकच्या पुरचुंडी भक्कम पाहीजे नाहीतर सगळीकडे चटण्या लागतील.

तुमी फकस्त रेशिप्याच ल्ह्या !! ;) आसू द्या, ती रेडिमेड भेळ मिळते न्हवं बाजारात काय ते हल्दिराम का काय; आमी त्येच इकत घिऊ. तुमचं चालू द्या. :D

मराठमोळा's picture

1 Apr 2011 - 12:42 pm | मराठमोळा

वा!!!

फोटो पाहुन दुपारच्या जेवणात बदल केल्या गेल्या आहे. चटपटीत भेळ बनवल्या गेली आहे.

:)

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Apr 2011 - 1:55 pm | ज्ञानोबाचे पैजार

लेका, भेळ नको, लाडु पाहीजे लाडु,