(आता करितो भरपाई...)

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
19 Mar 2011 - 11:30 am

या विडंबनासाठी वापरलेला कच्चा माल...

सोडले जुने रागलोभ...राहिलो मिपानगरीचे ठायी...
आता करितो भरपाई...आता करितो भरपाई...

हा तो विसोबाचा गाव.... अवघे चंट, थोडके राव...
पिचकारीच्या रंगामध्ये.. अवघा आसमंत न्हाही...
आता करितो भरपाई...आता करितो भरपाई...

स्वसंपादनाचा घोळ... हा तर बालिश पोरखेळ...
उठली बंदी जर काही.....ती तो नीलकांताची पुण्याई...
आता करितो भरपाई...आता करितो भरपाई...

ते बंधन सुटता वेगे... पहा झाली नवीन पहाट....
विसरूनी शून्य चर्‍हाट... पेनामध्ये भरतो शाई...
आता करितो भरपाई...आता करितो भरपाई...

पिडां देता एकचि हाक...उठे प्रतिसाद मिपाखोर्‍यात...
आंद्या, धम्या, आणिक टार्‍या... गर्जती करूया जंगी कल्हई
आता करितो भरपाई...आयच्यान, आता करितो भरपाई!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
:)

स्वसंपादनावरील बंदीच्या निषेधात आम्ही स्वत:वर लादून घेतलेले मिपावरच्या प्रकाशनबंदीचे धोरण स्वसंपादनावरची बंदी उठल्याने आम्ही आज मागे घेत आहोत!
तेंव्हा, आता येळकोट, येळकोट, जय मल्हार!!!
:)

विडंबनप्रकटन

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

19 Mar 2011 - 11:38 am | विनायक प्रभू

अगदी सहमत

शिमग्याची तयारी करु म्हणता तर मग? ;-)

सहज's picture

19 Mar 2011 - 11:39 am | सहज

चला पिडांजुर्नांचा अज्ञातवास संपला, होउन जाउ द्या!

बबलु's picture

19 Mar 2011 - 11:41 am | बबलु

पिडांकाका आले !! :) :) :)

जय मल्हार !

पैसा's picture

19 Mar 2011 - 11:44 am | पैसा

शिमग्याच्या मुहुर्तावर लेखनसंन्यास मागे घेतल्याबद्दल पिडांचे आभार.

चित्रा's picture

19 Mar 2011 - 7:46 pm | चित्रा

असेच म्हणते, येऊ दे नवीन लेखन.

नगरीनिरंजन's picture

19 Mar 2011 - 9:05 pm | नगरीनिरंजन

सुप्रसिद्ध श्री. पिवळा डांबिस यांचे वाखाणले गेलेले कसदार लेखन वाचण्यास उत्सुक.

गोगोल's picture

19 Mar 2011 - 9:31 pm | गोगोल

हा डांबिस पिवळ्यापेक्षा हिरवाच ज्यास्त आहे :P

श्रावण मोडक's picture

19 Mar 2011 - 2:23 pm | श्रावण मोडक

जय हो!

गणपा's picture

19 Mar 2011 - 2:38 pm | गणपा

:) वेल्कम ब्यॅक.

रमताराम's picture

19 Mar 2011 - 3:30 pm | रमताराम

अजातशत्रू पिडांकाका आपला त्रिदंडी लेखनसंन्यास मागे घेऊन पुन्हा गृहस्थाश्रमी झाल्यामुळे आता धुळवड कमी होईल नि अनेकरंगी रंगपंचमी दुप्पट जोमाने साजरी होईल अशी अपेक्षा आहे.

प्रास's picture

19 Mar 2011 - 4:41 pm | प्रास

.....सध्या इतकेच म्हणतो,

पिडांकाकांचे नवे लिखाण वाचण्यास उत्सुक.

टारझन's picture

19 Mar 2011 - 5:51 pm | टारझन

है जबरान :) चाल लावुन वाचले अगदी :) स्साला , कारण काहीही असो जुणे जाणते लिहीणे बंद झाल्यामुळे मज्जा येत नव्हती. आणि आजकाल नुसतेच बालिश क्रश लेख वाचायला लागत होते :)

-(स्वसंपादन गेल्यामुळे खुश ) टारझन

पियुशा's picture

20 Mar 2011 - 12:12 pm | पियुशा

@ टारर्याआआआआआअ
तुला कोनि आग्रह नव्हता केला ना ,वाचन्याचा
मग
कशाला कश्ट घेतलेस वाचन्याचे :)
पुध्च्या वेळी माझा धागा दिसला कि इग्नोर कर ;)

राजेश घासकडवी's picture

19 Mar 2011 - 6:02 pm | राजेश घासकडवी

भरपाई अशी इतक्यात होणार नाही. सव्याज झाली पायजेल. सुलभ हप्त्यांवर, पण त्यातला एकपण चुकला तर तुमच्या ग्यारेंटरना धरू...

बहुगुणी's picture

19 Mar 2011 - 6:24 pm | बहुगुणी

वा राव! भरा आणि या मैदानात, फार दिवस वाट पहायला लावलीत, आता खरंच दाम-दुप्पट भरपाईची अपेक्षा आहे :-)

भवानी तीर्थंकर's picture

19 Mar 2011 - 8:30 pm | भवानी तीर्थंकर

तुमचे जुने लिखाणही या धाग्याच्या निमित्ताने वाचले. श्री. रमताराम आणि श्री. घासकडवी यांच्याशी सहमत.

सर्वांना होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा.

नंदन's picture

19 Mar 2011 - 8:48 pm | नंदन

वेलकम ब्यॅक! 'न्यू ऑर्लिन्स'बद्दल वाचायला कधी मिळतंय त्याची वाट पाहतो ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Mar 2011 - 9:10 pm | बिपिन कार्यकर्ते

छान. उत्तम.

छान. येऊद्या आता एखादा जोरदार लेख.