श्रीखंड

स्मिता.'s picture
स्मिता. in पाककृती
17 Mar 2011 - 4:27 pm

'श्रीखंड' शब्द वाचूनच कसं शांत, शीतल वाटतं ना! बहुतेक मराठी जनतेचा आवडीचा पदार्थ आहे हा. मलासुद्धा श्रीखंड फार आवडते. योगायोगाने मिपावर अजूनपर्यंत कोणी त्याची पाकृ टाकलेली नाही (मला तरी सापडली नाही). त्यामुळे मीच हा विडा उचलला (सोपी पाकृ आहे ना ;)). असंही भारतात आता उन्हाळ्याला सुरुवात होतच आहे... तेव्हा आज बनवूया श्रीखंड!

साहित्यः
दही - ५०० ग्रॅम
बारीक साखर - २ मोठे चमचे
जाडसर वेलची पूड - १/४ लहान चमचा
दूध - १/४ कप
सजावटीसाठी सुका मेवा - बदाम, काजू, पिस्ता यांचे काप, बेदाणे, चारोळी, इ. (आवडीप्रमाणे)
मलमलचे किंवा मऊ सूती स्वच्छ कापड

कृती:
श्रीखंडाची पूर्वतयारी ६ ते ८ तास आधीच करावी लागते. त्यासाठी पहिले दही जमवावे. शक्यतो बाजारात मिळणारे अमूल, नेस्ले, इ. असे दही आणावे. ते दही छान घट्ट असते. घरी जमवलेल्या दह्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. हे दही मलमलच्या किंवा सुती कपड्यात सैलसर बांधून हलक्या हाताने दाबून जास्तीचे पाणी काढून टाकावे. नंतर ते ६ ते ८ तासांसाठी बेसिनवर (त्यातून सतत पाणी ठिबकते म्हणून) टांगून ठेवावे.

आता तयार झालेला चक्का म्हणजे पाणी निघून गेलेले दही एका भांड्यात काढून घ्यावे. त्यात साखर, वेलची पूड आणि योग्य कन्सिस्टंसीसाठी(मराठी?) लागेल तसे दूध घालून ते मिश्रण ब्लेंडरने एकजीव करून घ्यावे. एकदा चव बघून जास्त गोड आवडत असल्यास थोडी साखर घालून पुन्हा ते मिश्रण मऊ होईपर्यंत ब्लेंड करावे.

हे मिश्रण सर्व्हींग बाऊल मध्ये काढून घ्यावे आणि त्यावर आपल्या आवडीप्रमाणे सुका मेवा पसरवावा. जेवणाआधी किमान अर्धा तास बाऊल फ्रीज मध्ये ठेवावा. झाले आपले थंडगार श्रीखंड तयार!

प्रतिक्रिया

सूड's picture

17 Mar 2011 - 4:31 pm | सूड

>>त्यासाठी पहिले दही जमवावे.
जमवावे नाही लावावे हो !! जमवावे म्हटलं की शेजारपाजार्‍यांकडून आणून जमवल्यासारखं वाटतं . ह.घ्या.
बाकी रेसिपी झ्याक !!

षिर्षक ण वाचता फक्त फोटु पाहिला , मला वाटलं घरच्या घरी लक्ष्मीणारायण चिवडा बणवलाय की काय ?
असो , श्रिखंड शक्यतो खाऊच नये , सॉल्लिड कॅलरीज :)

- टारुभाऊ श्रीखंडे

मस्त ह !
मला वाट्ते तु रन्गित डिश मध्ये फोटो काध्ला अस्ता ना तर अजुन जबरा दिसला अस्ता
असो..
आम्हि फक्त निरिक्शन नोन्दवले :)

पर्नल नेने मराठे's picture

17 Mar 2011 - 4:48 pm | पर्नल नेने मराठे

सुका मेवा केवढा घातलाय :ओ

परिकथेतील राजकुमार's picture

17 Mar 2011 - 4:52 pm | परिकथेतील राजकुमार

सुका मेवा केवढा घातलाय :ओ

हेच बोल्तो.
च्यायला काय दिवस आलेत :( चुचु बरोबर सहमत व्हावे लागत आहे.

श्रीखंड आहे सुकामेवाखंड ?

पर्नल नेने मराठे's picture

17 Mar 2011 - 4:59 pm | पर्नल नेने मराठे

कोब्रा ना तु ;) ह्या बाबतित सहमत होणारच =))

प्राजु's picture

17 Mar 2011 - 7:25 pm | प्राजु

मी पण मी पण!!! :)

मुलूखावेगळी's picture

17 Mar 2011 - 4:55 pm | मुलूखावेगळी

मस्त ग
यम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्मम्मी
घरचेच श्रीखंड आवडते मला.

बशीत श्रीखंड कमी आणि सुकामेवा जास्त दिसतोय.. चुचुतायला भलतीच काळजी आहे.

श्रीखंड मस्तच..

- पिंगू

अन्या दातार's picture

17 Mar 2011 - 5:06 pm | अन्या दातार

घरी तयार चक्का आणून करतो श्रीखंड.
बाकी ५०० ग्रॅम दह्यात २ मोठे चमचे साखर घालून अशी कितीशी चव बदलणार आहे? आईच्या प्रमाणानुसार ५०० ग्रॅम चक्क्याला २०० ग्रॅम साखर लागते
(तुमचे चमचे रजनीकांतकडून आणलेत का??? ;) )

अन्याशी सहमत. मी फक्त फोटो बघितला. पाककृती वाचलीच नव्हती..

- पिंगू

+१ टु अन्या, बाकी पाक्रु भारी असली तरी, पाक्रु वरचे प्रतिसाद वाचताना आज खरंच खुप हसु आलं.

आमच्याकडे रजनिकांतचे चमचे ( दह्यात साखर घालुन श्रिखंड करायचे) धुण्याची मशिन नाही. सदर हे श्रीखंड आपापल्या जबाबदारीवर करावे.

सगळ्यांची आवडती पाकृ आहे. सारखं माझी आवडती पाकृ म्हटल्यामुळे काही लोकांना वाट्टय की मी खादाड आहे.;)
नटस् पसरून श्रीखंड नटवण्याचा प्रकार आवडला. मेक अप जरा जास्त झालाय तरी फोटू छान आलाय.;)

माझीही शॅम्पेन's picture

17 Mar 2011 - 6:39 pm | माझीही शॅम्पेन

निषेध :-
श्रीखंडाच्या नावाखाली सुकामेवा-खंड म्हणून रेसेपी टाकली
म्हणून स्मिता यांचे सदसत्व रद्द व्हावे (क्रु. ह. घ्या)

निवेदिता-ताई's picture

17 Mar 2011 - 6:49 pm | निवेदिता-ताई

स्मिता - यात बारीक साखर न घालता नेहमीची मोठी साखर घातली तरी चालते,
आणी दुध न घालता साय घालावी........अश्शी चव जमते न.......व्वा...:)

कसं परवडतं महागाईच्या दिवसात यांना श्रीखंड वगैरे खाणं ?

पर्नल नेने मराठे's picture

17 Mar 2011 - 7:24 pm | पर्नल नेने मराठे

नाना ... तुला स्मिता तै एनआरआय आहेत असे म्हणायचेय का? ;)

स्मिता.'s picture

17 Mar 2011 - 7:10 pm | स्मिता.

सर्व प्रतिसाद देणार्‍यांचे आणि वाचकांचे आभार!

'सुकामेवाखंड' असे प्रतिसाद वाचून मीसुद्धा खूप हसून घेतलं. आता माझ्या बाजूने सफाई इतकीच की ज्या बशीत ते श्रीखंड आहे ती मध्ये बरीच खोलगट आहे. त्यामुळे जरी सुक्यामेव्याचा वापर जरा सढळ हस्ते असला तरी ते 'सुकामेवाखंड' नक्कीच नाही :)

@पियुशा: श्रीखंड बाऊल मध्ये काढतांना फोटोचा विचार नव्हता केला. तुझं निरिक्षण योग्यच!

@अन्या दातार: बाकी ५०० ग्रॅम दह्यात २ मोठे चमचे साखर घालून अशी कितीशी चव बदलणार आहे? आईच्या प्रमाणानुसार ५०० ग्रॅम चक्क्याला २०० ग्रॅम साखर लागते.
५०० ग्रॅम चक्क्याला २०० ग्रॅम साखर लागते, बरोबरच आहे. पण मी ५०० ग्रॅम दही म्हटले आहे. त्याचा चक्का झाल्यावर वजन बरेच कमी होते. किंवा माझ्याकडच्या मोठ्या चमच्यांना 'रजनीकांतचे चमचे' म्हणू शकता ;)
मी चमच्याने साखर घातल्याने ग्रॅम मध्ये नक्की सांगता येणार नाही :(

-------------------

ता. क. - मिपावर आधीच गणपाभाऊंची श्रिखंडाची पाकृ आहे. ते 'श्रिखंड' असल्याने सापडले नाही. गणपाभाऊ, ह. घ्या.

मला श्रीखंड फारसे आवडत नाही. भारतात होते तेव्हा सहसा मी श्रीखंड खाण्याच्या भानगडीत नाही पडले.
मात्र इथे आल्यापासून ते सावरक्रीम घालून केलेलं.. श्रीखंड आवडायला लागलं आहे. का माहिती नाही पण त्यात एक प्रकारचा सिल्कीनेस वाटतो.. घट्ट वाटत नाही ते. चवही आवडते.

दीविरा's picture

17 Mar 2011 - 8:27 pm | दीविरा

श्रीखंड आवडते :) पण सुक्यामेव्या शिवाय :)

प्रतिसाद वाचून जास्ती मजा आली.

आता पुरण पोळीची वेळ आली (होळी)

इरसाल's picture

17 Mar 2011 - 9:13 pm | इरसाल

जाम भारी..............

सानिकास्वप्निल's picture

18 Mar 2011 - 1:42 am | सानिकास्वप्निल

मस्त...थोडा सुकामेवा कमी असता तर अजून मस्त वाटलं असतं.