कश्मिरि चिकन करी......

पियुशा's picture
पियुशा in पाककृती
9 Mar 2011 - 10:15 am


कश्मीरी चिकन करी....
साहित्य ;- चिकन १ कि., २ टी स्पून बदाम काप,१/२ कप दही , कांद्याची पेस्ट दिड वाटी, ४-५ लवंगाची भुकटी ,४-५ हिरवी इलायची ,आल लसून पेस्ट २ चमचे, २ टमाटर बारीक कापलेले, गरम मसाला १/२ चमचा,
६-७ काश्मिरी लाल मिरच्यांची पेस्ट (नसेल तर आपली नेहमीची चालेल ),मीठ बस ........

गार्निशिंग साठी कोथिंबीर आणि तळलेले काजू

कृती :- चिकन स्वछ धुवून घ्या ,
(एरवी आपण चिकन करताना आधी ते शिजवून नंतर फोडणी करतो पण काश्मिरी चिकन मसाल्या मध्येच पूर्ण शिजवून घेतात )
(मी वेळ वाचविण्यासाठी एक शिट्टी देऊन घेतलीय )

कुकरमध्ये थोड तेल ,दही ,हळद घालून फक्त एक शिट्टी घ्या
पॅन मध्ये ३ मोठे चमचे तेल (बटर किन्वा घि पन घालु शकता)घाला , कांदा पेस्ट घालून परतावा , हलका सोनेरी होऊ द्या ,तेल सुटू लागले कि ,आल लसून पेस्ट घाला .टोमाटो घाला ,आता मिरची पेस्ट,लवंग भुकटी , आणि इलायची घाला मस्त परतून घ्या .आता गरम मसाला घाला.
जबरा वास सुटेल आता चिकन पिसेस घालून मस्त हलवून घ्या , चवीनुसार मीठ घाला .
चिकन शिजवताना जे पाणी वापरलय तेच पाणी करीसाठी वापरा ,
आता त्यात थोड - थोड दही घालून छान मिक्स करत रहा
१५-२० मिनट छान शिजवून घ्या .

थोडे पाणी आटल्याने मस्त ग्रेवी तय्य्यार होते

कापलेली कोथिंबीर ,तळलेले काजू आणि बादामाचे काप घालून गार्निश करा .

काश्मिरी चिकन करी वर्पायला तय्यार आहे :)


(फोटू मोबाइलवर घेतले असल्याने क्लिअरिटि बद्दल शमस्व )

प्रतिक्रिया

हे कळल नाही. म्हणजे नुसत्याच रिकाम्या कूकरची शिट्टी घ्यायची की काय?

बाकी दिसायला मस्तच.

कुकरमध्ये थोड तेल ,दही ,हळद आनि चिकन घालून फक्त एक शिट्टी घ्या
असे म्हनायचे होते मला,गड्बडित विसरले :)
स्वारि ह !

सानिकास्वप्निल's picture

9 Mar 2011 - 10:41 am | सानिकास्वप्निल

मस्त पा़कृ

नगरीनिरंजन's picture

9 Mar 2011 - 11:03 am | नगरीनिरंजन

झहकाहासह! करून पाहणार नाही नुस्तं तर हाणणार!

त्यात आणि इतर मसाल्यात असा कोणता फरक असतो?

दुकानात मिळेलः)

ह्या मसल्यात काश्मिरि मिरचि अस्ते आनि सोफ , दाल्चिनि,एलायचि (छोटी) ,लवन्ग्,आनि केसर वापर्तत
रेडीमेड मिळ्तो ,घरिहि बन्वु शकता

टारझन's picture

9 Mar 2011 - 12:04 pm | टारझन

प्रतिसाद संपादित.
टारझन ह्या सदस्यास वैयक्तिक टिका टाळावी म्हणुन सक्त ताकिद देण्यात येत आहे. पुण्हा सांगण्यास लावु नये.

प्यारे१'s picture

9 Mar 2011 - 12:30 pm | प्यारे१

>>>पुण्हा सांगण्यास लावु नये.

हा टार्‍या स्वतःच संपादितो की काय???????

@ सं मं- सॉरी शक्तिमान.

शिल्पा ब's picture

9 Mar 2011 - 12:14 pm | शिल्पा ब

मस्तच...उद्याचा बेत ठरला.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Mar 2011 - 12:18 pm | परिकथेतील राजकुमार

झकास दिसतयं बॉ ! एकदच चरचरीत.

मात्र आम्ही शाकाहारी असल्याने बटाटा आणि फ्लॉवर वापरु ;)

मस्त आहे. नक्की करुन बघते. :)

सुहास..'s picture

9 Mar 2011 - 9:15 pm | सुहास..

छान आणि क्षमस्व !!

ही डिश कश्मीरी नाही , पण जे काही झालय ते मस्त दिसत आहे , त्यामुळे चवदार असणार हे मान्य ;)

कोन म्हनत?
हो मि अशिच रेसेपि वाचुनच काश्मिरि चिकन करि बनवलि आहे
काश्मिरि मसल्यात मिर्चि बरोबर सोफ्.केसर्,दाल्चिनि,आनि हिरवि एलायचि ,लवन्ग भुकटि,वापर्तात आनि दहि घालुन हि रेसेपि शिजवलि जाते
कित्ति वेळा सान्गु ?
आनि ह्यातला मसाला नेह्मि प्रमाने नसुन वेगळा आहे हे रेसेपित नमुद केलेले आहे

कोन म्हनत?
हो मि सेम अशिच एक रेसेपि वाचुनच काश्मिरि चिकन करि बनवलि आहे
काश्मिरि मसल्यात मिर्चि बरोबर सोफ्.केसर्,दाल्चिनि,आनि हिरवि एलायचि ,लवन्ग भुकटि,वापर्तात आनि दहि घालुन हि रेसेपि शिजवलि जाते
कित्ति वेळा सान्गु ?
आनि ह्यातला मसाला नेह्मि प्रमाने नसुन वेगळा आहे हे रेसेपित नमुद केलेले आहे

आम्ही शुद्ध शाकाहारी त्यामुळं जिवंत खेळणा-या बागडणा-या कोंबड्याच जास्त बघतो.

तरी, ही पाक्रु छान असेलच, वर परा म्हणतात तसं बटाटे व प्लॉवर घालुन करुन पाहु.

@ परा, तु आणि मी बटाटे व प्लॉवर आणु, आणि पियुषा रस्सा करुन आणेल चालेल का ?

पियुषा, ही काश्मिरी का ? फक्त काश्मिरी मिर्ची टाकली म्हणुन की अजुन काही वेगळं कारण आहे.?

टारझन's picture

10 Mar 2011 - 1:58 pm | टारझन

ही काश्मिरी का ? फक्त काश्मिरी मिर्ची टाकली म्हणुन की अजुन काही वेगळं कारण आहे.?

ऑफकोर्स , परवाच मी बंगाली खारे शेंगदाणे खाल्ले ..विचारा कसे ? त्यात बंगालच्या उपसागरातलं मीठ होतं ना =))

लवकरंच एक मल्टिनॅशनल डिश टाकतो .. प्रत्येक देशातला एकेक पदार्थ घेउन यायचा ;)

खादाड अमिता's picture

10 Mar 2011 - 2:27 pm | खादाड अमिता

एक नंबर! काजू बदाम वाले चिकन!

शुचि's picture

11 Mar 2011 - 6:53 am | शुचि

भारीये