सांता कलॉज

पियुशा's picture
पियुशा in जनातलं, मनातलं
20 Dec 2010 - 4:55 pm

santasanta
सांता कलॉज

गोड़ गुलाबी कुडकुड नारी थंडी पडली होती .....
पांढरा पांढरा बर्फही भुरभुरत होता ......
घरातल्या ख्रिसमस ट्री वर छोटे छोटे स्टार हलत होते.........
मी अन बाबानी रात्रि ख्रिसमस ट्री तयार केले होते ...........
सगळे गेले शांत झोपी.....
मी एकटीच आईच्या मखमली कुशितुन बाहेर आले
अंगणात आमच्या लाल पिवळी नाजुके वार्यावर डोलत होती
हासरी ,काग बाहेर आलीस विचारत होती
चन्द्र हसरा कधी ढगांच्या बेटा मध्ये लपयाचा
कधी उंच उंच झाडामागे,
हिरव्या हिरव्या उंच झाडानि
शुभ्र गालिचा ओढला होता
मी माझा मोजा दाराला अडकवला होता
आई म्हणाली होती की मध्यरात्रि सांता कलॉज येइन...................
रात्रि येउन त्यात खुप सारे गिफ्ट ठेउन जाईंन ....................
म्हणून मी बाहेर कुडकुडत होते
सांता कलॉज ची वाट पाहत होते
खुप रात्र झाली तशी थंडी वाढू लागली ....
माझे छोटेस नाक थंड पडले होते ......
वाट पाहून माझा सोबती चंद्रोबा पण ढगांच्या आड़ जाऊं झोपला
अंगन रंगिबिरंगी चिमुकल्याना घेउन शांत पहुडले होते
" कारे सांता का उशीर लावतो? खोटच बोलली आई !
तू काही नाही ऎकत लहान मुलांच
मी रात्रि जागुन तुज्यासाठी ट्री बनवला, आणि तू खोटारडा निघालास "
माझे गुबरे-गुबरे गाल लाल- लाल झाले ....................
डोळ्यातुन दोन गरम टचकन वाहून गेले................
चांदण्या मला बघत होत्या
रडू नको चिमुकले मायेने सांगत होत्या
ज्ज़ा,ज्ज़ा, सगळे खोटारडे कट्टी ,कट्टी कट्टी...
जाउन झोपते आता परत आईच्या कुशीत .....
मागे वळते तोच घंटेचा टन टन टन आवाज झाला
माझ्यासारखाच गब्दुला सांता
हरनांच्या रथातून आला ........
त्याला पाहून मला कित्ती कित्ती आनंद झाला ............
त्याने मला त्याच्या गरम गरम कुशीत उचलून घेतली
उशीर झाला म्हणून रागावली का माझी सोनुली ?
पांढरी शुभ्र दाढ़ी लाल लाल टोपी
मखमली पोटली अन त्यात खुप सारी चोकलेट
आणि खुप खुप खेळनि ..........
माझ्या छोट्या मुठीत अन फरॉकच्या खिशात
चोकलेट मावत नव्हती ..........
तरी पण संता ची पोटली रिकामी होत नव्हती ..........
"ए माझ्या दादाला पण देना खेळनि ..........
तो आळशी, झोपलाय पण मी देइन हा त्याला नक्की ..........."
खुप सारे चोकलेट आणि खुप सारी खेळनि
आणि त्या बरोबर खुप सारे आशीर्वाद
देऊन सांता परतला माघारी.....
टन टन टन करत त्याची हरनाची गाडी उडाली आकाशी...
शोधाया दूसरी चिमुकली फुले गोजिरी ........................santa

कविता

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

20 Dec 2010 - 5:00 pm | परिकथेतील राजकुमार

सांता कलॉज

गोड़ गुलाबी कुडकुड नारी थंडी पडली होती .....

हे दोन शब्द हृदयाला भिडले. टच्कन डोळ्यातुन पाणी आले.

बाकी कविता सुंदरच. वयाची आणि बुद्धीची साक्ष पटवुन देणारी.

पियुशा's picture

21 Dec 2010 - 1:57 pm | पियुशा

"वयाची आणि बुद्धीची साक्ष पटवुन देणारी."

परादादा आताच अन्डयातुन बाहेर आलेय मि !हळू-हळू चोचा (टोचा)
मारायाला शिकेन हा !

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2010 - 2:04 pm | परिकथेतील राजकुमार

परादादा आताच अन्डयातुन बाहेर आलेय मि !हळू-हळू चोचा (टोचा)
मारायाला शिकेन हा !

विकुन खाशील तू आम्हा सगळ्यांना ;) आणि म्हणे 'आताच अन्डयातुन बाहेर आलेय'.

प्रीत-मोहर's picture

20 Dec 2010 - 6:09 pm | प्रीत-मोहर

आम्ही सोमवारी आमच्या हापिसात खेळणारोत सिक्रेट सांता ....

कविता आवल्डी :)

नगरीनिरंजन's picture

20 Dec 2010 - 8:42 pm | नगरीनिरंजन

टन टन टन करत त्याची हरनाची गाडी उडाली आकाशी...

या ओळीवरून एक विनोद आठवला आणि हसून मुरकुंडी वळली. तुमचे लेखन नेहमीच फार्फार इनोदी असते. पुलेशु.

शुचि's picture

20 Dec 2010 - 8:43 pm | शुचि

पुलेशु :)

टारझन's picture

21 Dec 2010 - 10:03 am | टारझन

काय ? शुचि ला पण टण टण टण करणारं हरिण आठवले ? =)) =)) =))
बाकी उत्तम बाळबोध लेखण :) कोदा हॅज सम खाम्पिठिषण !!

- टणटण्क्लॉज

स्पा's picture

20 Dec 2010 - 8:53 pm | स्पा

छान कविता..........
मी पण लहानपणी " सान्ता क्लोस" येतो म्हणून रात्री प्रार्थना करायचो

प्रकाश१११'s picture

21 Dec 2010 - 7:51 am | प्रकाश१११

गोड़ गुलाबी कुडकुड नारी थंडी पडली होती .....
पांढरा पांढरा बर्फही भुरभुरत होता ......
छान नि मस्त. आवडले....

अविनाशकुलकर्णी's picture

21 Dec 2010 - 9:25 am | अविनाशकुलकर्णी

सांता क्लॉज

नाताळ मधे खुप मजा असायची
रात्री मोजा लावायाचो
अन सकाळी उठल्यावर मज्जाच मज्जा
सांता चॉकलेट्स,खाउ, खेळणी द्यायचा
खुप मजा यायची,
मग बाबांना विचारायाचो.....
बाबा सांगाना, कुणी दिला हा खाऊ? खेळणी?
सांता आला होता, तुला आवडतात म्हणुन दिलि.....बाबा
मग मला का नाहि जाग केले?.....
सांता म्हणाला त्याला झोपु द्या...बाबा म्हणाले.
सांता कधिच भेटला नाहि
एका नाताळला मोजा लावला
अन हसत बसलो...
काय रे लबाडा का हसतोस? बाबा..
बाबा मला सांताची गंमत कळाली आहे..
सांता बिंता काही नसतो..
बाबा च खाउ,खेळणी आणुन ठेवत असतात..हसत म्हणालो
चला आमचा बाळ मोठा झाला..बाबा हसत म्हणालें
मी बाबाकडें बघतच राहिलो.???
"अरे ज्या दिवशी तुम्हाला कळत ना
कि सांता बिंता काही नसतो.
त्या दिवसा पासुन तुमच बाल्य संपलेल असत"
बाबा हसत म्हणाले...

अविनाश.....

नगरीनिरंजन's picture

21 Dec 2010 - 4:28 pm | नगरीनिरंजन

मस्त कविता! दुसर्‍या ओळीलाच फुटलो.

इंटरनेटस्नेही's picture

21 Dec 2010 - 1:41 pm | इंटरनेटस्नेही

मी लहानपणी सांता ला काय मागायचो ते येथे लिहिण्यासारखे नाही! ;)

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2010 - 1:44 pm | परिकथेतील राजकुमार

मी लहानपणी सांता ला काय मागायचो ते येथे लिहिण्यासारखे नाही!

आपले हे पालथे धंदे लहानपणापासून चालु आहेत तर.

स्पा's picture

21 Dec 2010 - 1:46 pm | स्पा

आपले हे पालथे धंदे लहानपणापासून चालु आहेत तर.

ह्या: ह्या: ह्या: