माझा फराळ - ३ अरगट (Lantern Snack)

स्पंदना's picture
स्पंदना in पाककृती
31 Oct 2010 - 10:04 pm

आता हा प्रकार मात्र थोडा वेगळा.
माझी मुलं याला lantern snacks म्हणतात.
From Drop Box

सामग्री :-
१ वाटी रवा
१ वाटी मैदा
१ टी स्पून जिरे
१ टी स्पून ओवा
साधारण एक टेबल स्पून चिरलेली कोथिंबीर
अर्धा टेबल स्पून चिरलेला कढीपत्ता.
१ टेबल स्पून खिसलेल खोबर
२ टी स्पून तीळ
२ hiravya मिरच्या छानश्या बारीक काप करून
१ टेबल स्पून कच्चे शेंगदाणे खल बत्त्यात जाडसर कुटून.
१ टेबल स्पून तूप ( मोहन घालण्या साठी)
मीठ अन थोडीशी साखर.
तळण्या साठी तेल.
From Drop Box
कृती:-
रव्याला तूप गरम करून मोहन घालून घ्या. आता वरील सर्व जिन्नस त्यात मिसळून थोड्याश्या गरम पाण्यान सैलसर पीठ भिजवा.
थोडं वेळ सेट होऊ द्या .
आता या मिश्रणाचा एक थोडा छोटा गोळा घेऊन खलबत्त्यात कुटून घ्या. असे सर्व गोळे कुटून झाले की पाती लाटायला घ्या.
अगदी छान पातळ पात लाटून घ्या अन ती वर असे प्रथम मोट्ठे चौकोन वां आयत कापून घ्या. आता प्रत्येक आयताच्या आत आपण आकाश कंदिलाला कशी बोर्डर सोडून कापतो तश्या चिरा दया .
From Drop Box

दोन्ही बाजूने मुडपून हा घ्या आकाश कंदील !
From Drop Box

तेल गरम करून साधारण ब्राऊन कलर वर तळून घ्या.
झाले 'अरगट' तयार !

(नेहमीच्या पदार्थांपेक्षा माझा हा पदार्थ उगाचच भाव खाउन जातो.)

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

31 Oct 2010 - 10:06 pm | विसोबा खेचर

लै भारी.. :)

नितिन थत्ते's picture

31 Oct 2010 - 10:39 pm | नितिन थत्ते

प्रकार चविष्ट लागत असणार. करून पहायला हवा.

अवांतर : ७० च्या दशकात अमेरिकेहून आयात झालेल्या धान्यात काहीतरी असे त्याला अरगट* म्हणत असे आठवते. काहीतरी म्हणजे कीडहोती की किटकनाशकाचे अंश ते आत नीट आठवत नाही. (रामदास, देवकाका वगैरे यावर प्रकाश टाकू शकतील).

*अरगट हा कुठल्या इंग्रजी शब्दाचा तेव्हाचा अपभ्रंशही असेल.

ते अरगट वेगळे... धान्यावर वाढणारी एक बुरशी, जी विषारी असते....

http://en.wikipedia.org/wiki/Ergot

वारकरि रशियात's picture

1 Nov 2010 - 12:23 pm | वारकरि रशियात

नितीनजी,

आपल्या अवांतराबाबत अधिक अवांतर:
१) तेव्हा अमेरिकेतून समुद्रमार्गे हे धान्य आयात केले जाई. (आपण अन्नधान्यात स्वयंपूर्ण होण्याआधी)
२) या धान्याचे नांव मिलो (यलो मिलो) असे होते - पिवळा मका / तत्सम
३) हे धान्य रेशनवर (सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत) पुरविले जाई.
४) आपले लोक याच्या भाकरी करीत.
५) अमेरिकेत हे धान्य 'पिगरी'त डुकरांना लठ्ठ करण्यासाठी वापरले जाते / जाई.
६) अरगट म्हणजे कीड / कीटकनाशक नव्हे, तर एक प्रकारचा फंगस ergot. हे विषारी असते. तसेच यात अर्गोटामिन हे एक एक विशिष्ट औषधी गुण असलेले द्रव्य असते / मिळविता येते.

अतिअतिअवांतर:
१) ज्या कोणत्या कलमाद्वारे / करारान्वये ही आयात / पुरवठा होई, तिचा क्रमांक (बहुधा) ४२० होता !
२) या धान्याबरोबर एका गवताच्या 'बी'चे ही आगमन झाले - कॉंग्रेस गवत (हे सर्वत्र पसरते / माजते पण हे गवत अगदी शेळ्या / गुरेही खात नाहीत !)

अर्थात तज्ञ अधिक खुलासा / दुरुस्ती सुचवतीलच.

हा संपूर्ण प्रतिसाद अगदीच अवांतर ठरू नये म्हणून केवळ नव्हे तर मनापासून:
अपर्णातैंची दिवाळी फराळाची मालिका खरेच अप्रतिम !

नितिन थत्ते's picture

1 Nov 2010 - 12:31 pm | नितिन थत्ते

जागोमोहनप्यारे आणि वारकरी यांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

त्या गवताचे नाव गाजर-गवत असे होते. त्याला काँग्रेस गवत म्हणण्याची कारणे.

१. त्याचा प्रसार सर्वदूर होतो.
२. काँग्रेसप्रमाणेच याचाही नायनाट करणे शक्य नाही. :(
३. काँग्रेसप्रमाणेच हे बिनकामाचे आहे. :D

प्रदीप's picture

1 Nov 2010 - 3:12 pm | प्रदीप

३. काँग्रेसप्रमाणेच हे बिनकामाचे आहे.

:) नितीन, तुस्सी जवाब नही!

स्पंदना's picture

1 Nov 2010 - 5:39 pm | स्पंदना

सार्‍या शेत भर हेच तर असत, मध्ये याचा काटा काढण्यासाठी नविन प्रकारच गवत आलय अस बोलल जात होत पण अजुन काही ते शेता पर्यंत पोहोचलेल दिसत नाही.
हे कोंग्रेस च बियाण म्हण्जे आपल्या वरील ' अ‍ॅग्रिकल्चरल प्रोडक्शन ' खच्ची करण्य करता वापरलेल एक शस्त्रच म्हणाव लागेल. अगदी जनावर पण खात नाहीत पण अमेरिकेत हे गवत कुठेच दिसत नाही.

स्वाती२'s picture

1 Nov 2010 - 12:03 am | स्वाती२

मस्त आहे ही पाकृ.
रवा बारीक घ्यायचा की जाडा?

थँक्स स्वाती२ .
मी नेहमीचाच रवा वापरते शिरा करतो तो.
चिरोटी रवा घातला तर तो लवकर भिजुन कदाचित असे रवाळ नाही लागणार.

रेवती's picture

1 Nov 2010 - 3:33 am | रेवती

छान! वेगळाच पदार्थ!

इंटरनेटस्नेही's picture

1 Nov 2010 - 4:07 am | इंटरनेटस्नेही

मस्त! टोण्डाला पाणी सुटलं!

ए सगळीकडे आपल चोप्य पस्ते :)

वा छानच दिसतोय हा फराळ देखील.

रोचीन's picture

8 Nov 2010 - 5:10 pm | रोचीन

चंपाकळीपण म्हणतात. कमला बाई ओगल्यांच्या रुचिरा - १ यात याची रेसिपी आहे. याचं मला वाटतं वेगळं कातण मिळतं. तुळशीबागेत बघायला पाहीजे. असे चौकोन कापण्यापेक्षा १पुरिच्या आकाराची पोळी लाटून घ्यायची. कणकेत पिवळा रंग/केशर घालावे. मधे आडवे काप दिल्यावर, गोल रोल करून दोन्हि टोकं धरुन पिरगळायची विरुद्ध दिशेने म्हणजे चाफ्याच्या कळीसारखा आकार होतो. म्हणुन त्याला चंपाकळी म्हणतात. गोड व तिखट २ हि करता येतात. पण नक्की कृती आठवत नाही. जिन्नस वेगवेगळे असु शकतात.

अरेवा मस्त वेगळाच प्रकार आहे.

स्मिता चावरे's picture

1 Nov 2010 - 12:39 pm | स्मिता चावरे

चाफ्याच्या कळीसारखी दिसतेय ना? कमलाबाई ओगलेंच्या रुचिरा या पुस्तकात फोटो पाहिला आहे. पाक कृती कदाचित वेगळी
असु शकेल.

स्मिता_१३'s picture

1 Nov 2010 - 12:57 pm | स्मिता_१३

छान दिसतोय प्रकार. करुन बघायला हवा.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

1 Nov 2010 - 5:04 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

तेच ते ...कमलाबाई ओगलेंच्या पुस्तकात चंपाकळी नावाने आहेत.
plain (तिखट मीठ न घालता) करुन त्यी पाकात पण बुडवतात आणि गोदाच्या चंपाकळ्या करतात म्हणे!

केल्या नाहित कधी...पण छान असाव्यात!

सर्वांचे आभार! नशिबान फराळाचे पदार्थ कधी पुस्तकात बघुन नाही शिकावे लागले. त्यामुळे कमला बाई ओगल्यांकडे कधी वळाव नाही लागल.
घरचा पदार्थ आहे , बरेच जण माझ्या कडे पहिल्यांदा खातात, अन मग रेसिपी ......

बाकी सर्वांना धन्यवाद.

याला अस 'अरगट' हे टारगट नाव का आहे हा प्रश्न मला पण पडतो पण मे बी चव अशी अफलातुन असल्यान अस आडवळणी नाव असाव.

उद्या चवडे!!

निवेदिता-ताई's picture

1 Nov 2010 - 10:54 pm | निवेदिता-ताई

हो ही चंपाकळीच आहे.

एक्दम आव् दलि, वेग् लि आहे करुन पाहिन नक्कि

संजयशिवाजीरावगडगे's picture

4 Nov 2010 - 8:22 pm | संजयशिवाजीरावगडगे

मस्तच ! छान !