तुम्ही कधी न खाल्लेला ऐकलेला पदार्थ - ---नाकारड्...

स्पंदना's picture
स्पंदना in पाककृती
14 Oct 2010 - 9:58 am

निवेदिता ताईंचा विस्मरणात गेलेले पदार्थ वाचला अन मग फार दिवसापासून लिहीन लिहीन म्हणतेय तो पदार्थ 'नाकारड' आज लिहायचा घाट घातला.
हा पदार्थ मी माझ्या घरा व्यतिरिक्त कोठेही ऐकला सुद्धा नाही. चाखन तर दूरच ! त्यामुळे एका प्रकारे मी माझ्या घरातली सिक्रेट रेसिपी इथे देते आहे.
तुम्हा कोणाला माहीत असेल असं अजिबात वाटत नाही. माहीत असेल तर 'चू चू' च गजराच घड्याळ बक्षिस !!

हा पदार्थ काकड्यां पासून बनवतात. मागे प्रियालि कडे खुप काकड्या झाल्या अस ऐकल , घ्या त्यातल्याच दोन!!
आता काकडी म्हंटल की मला हसायच्या उकळ्यावर उकळ्या फुटतात.
का?
कारण पंचतंत्र!
त्यात एक गोष्ट आहे.
'राजाच्या जवळपास काम करणारा चतुर्थ श्रेणी कामगार सुद्धा दुखवू नये. त्यामुळे राजाची गैर मर्जी होऊ शकते.' संजीवक म्हणाला.
'ते कसे?' दमनक म्हणाला
'ऐक.'
एकदा एका महाअमात्याने एका महालाच्या झाडूवाल्याला अपमानास्पद वागणूक दिली.
त्यानंतर थोड्या दिवसांनी एकदा महाराज साखर झोपेत असताना हा झाडूवाला तेथे झाडू मारत होता. अचानक तो म्हणाला, ' महाअमात्य राणी साहेबांना आलिंगन देऊन चुंबत आहेत'.
राजा खाडकन जागा झाला. ' काय बोललास?' त्याने खडसावल.
'काय झालं महाराज? मी काही बोललो का?' मी काल रात्री नाटकाला गेल्याने माझी झोप अपुरी झालेय. मी काही तरी नाटकातले बोललो असेन ' झाडूवाल्याने सावरा सावरी केली.
पण संशयाचा किडा राजाच्या मनात घुसला अन महाअमात्यांची पदोपदी दैना सुरु झाली.
हे कसे झाले? असा प्रश्न पडून महाअमात्यांनी सखोल विचार केले तेंव्हा आपण त्या कामगाराला दुखावल्याचे त्यांच्या लक्षात आले.
मग त्यांनी वस्त्र प्रावरणे देऊन त्याचा सन्मान केला अन क्षमा याचिली.
दुसऱ्या दिवशी परत महाराज साखर झोपेत, अन झाडूवाला बोलला ' महाराज प्रात:विधीला बसून काकड्या खाताहेत '
परत महाराज खाडकन जागे झाले, ' काय ?काय बोललास?'
' काय बोललो महाराज? मी काल परत रात्री नाटकाला गेलो होतो'
राजाने विचार केला हा झाडूवाला खरच झोपेत काहीही बरळतो आपण तर कधीच प्रात:विधीला बसून काकड्या नाही खाल्ल्या?(डोळा मारायची स्मायली) अन मग महाअमात्य परत मर्जीत आले.

तर अश्या या काकड्य!!

From Drop Box" alt="" />

आता रेसिपी.

तर सामग्री:-
२ जून काकड्या. बरोबर वाचलात , थोड्या जून झालेल्या काकड्या मध्यम आकाराच्या.
हळद
हिंग
मीठ
हिरवी मिरची. (इथवर सार आ. आ. मा. ने घे.)
१०-१२ लवंग
२ इंच दालचिन
९-१० मिरे
२ टी स्पून जिरे
१-इंच भर सुंठ
२ टी स्पून मोहरी
५-६ पाकळ्या लसूण.
अर्धी वाटी दही पूर्ण पाणी गाळून (ऑप्शनल)

कृती :-

काकड्यांची साले काढून, खिसून घेणे.
आता हा कीस एका नॅपकिन वर टाकून, नॅपकिन गुंडाळून चक्क कपडा पिळल्या सारखा पिळून घ्या. जमेल तेव्हढ पाणी काढून टाका.
वरील सर्व मसाले, मोहरी, सुंठ(आधी फोडुन घेणे), लवंग दालचिन , जिरे मिरे, यांची मिक्सरवर छान पावडर करून घ्या.
एकदा बारीक झाले की मग त्यातच लसूण अन मिरची घालून परत एकदा मिक्सर वर वाटून घ्या. हळद हिंग मीठ मिसळा.
आता हे सर्व काकडीच्या किसात मिसळून छान एकत्र करा. आता पाणी काढलेलं दही मिक्स करा. तुमच दही भाता बरोबरच वा नुसत तोंडीलावण तयार.
हे 'नाकारड' खाताना नाकातून अक्षरश: सुं सुं पाणी सुरु होत. सर्दी पडश्यावर नामी उपाय !! झटकन जाम झालेलं डोकं हलक होत.

फ्रीज नसलेल्या काळात हे 'नाकारड' सहज महिनाभर मडक्यात राहायचं. टिकायच.
आतातर मी चक्क बरणीत भरून दोन महिने चाखत माखत राहते.

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

14 Oct 2010 - 10:17 am | विंजिनेर

ह्नह्म.. वेगळाच पदार्थ दिसतोय.
एक शंका: मोहोरी सालासकट वाटली तर त्या सालींचा कडवट पणा उतरत नाही का मसाल्यात?

स्पंदना's picture

14 Oct 2010 - 10:22 am | स्पंदना

याची चवच वेगळी असते . आई तर साली सकट घालायच्या, मी ही ते च करते. अगदी तस्सच होत, आईंसारख.

मराठमोळा's picture

14 Oct 2010 - 10:38 am | मराठमोळा

:)

मी असाच प्रकार प्रकार खाल्ला आहे पण त्यात काकडी ऐवजी कैरी होती.. एक नंबर प्रकार असतो तो.

काकडीची आणि पेरुची भाजी एका जैन कुटुंबाच्या घरी खाल्ली होती ते आठवलं.
बक्षिस नाही मिळालं तरी चालेल कारण मला गजर झालेला आवड्त नाही.. ;)

असो,
चान पाकृ..

गजर आवडो न आवडो पण घडयाळ नाही मिळणार हाच पदार्थ खाल्ला असेल तर. अन नाव? नावाच काय?

मराठमोळा's picture

14 Oct 2010 - 11:18 am | मराठमोळा

अर्र्,
नाव कुठुन आणणार? आता आठवत नाही. किंवा कदाचित विचारलं पण नव्हतं हापिसात एकाने जेवणाच्या डब्यात आणला होता हा प्रकार..

मी ठेवतो एक नाव. चिलीमिली कैरी.. :) कसं वाटतय?

घड्याळ्याचं नंतर बघु ;)

नगरीनिरंजन's picture

14 Oct 2010 - 10:56 am | नगरीनिरंजन

ह्म्म.. वेगळंच प्रकर्ण दिसतंय. मसालेदार चमचमीत असेल असं वाटतंय.
आजकाल फोटो टाकण्याची फ्याशन नाहीशी व्हायला लागलेली दिसतेय. फोटो शिवाय पाकृ वाचायची तितकी मजा येत नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Oct 2010 - 12:01 pm | परिकथेतील राजकुमार

ह्याला आमच्याकडे खमंग काकडी म्हणतात :)

गणपा's picture

14 Oct 2010 - 1:29 pm | गणपा

पर्‍याशी सहमत :)

स्पंदना's picture

14 Oct 2010 - 1:49 pm | स्पंदना

ठीक आहे . गणपा अन परा तुम्ही दोघे ते घड्याळ वाटुन घ्या.

चु चु कडे जाउन तिच घड्याळ घेउन या. (चु चु सतरा अठरा हे काय लवकर उठायच वय हाय? वाढीच्या वयात फार झोप येते . झोपुन घे हो बाय. घड्याळ देउन टाक हं!)

अन नगरी नगरी द्वारे द्वारे--हय न्हव का फोटो काकड्यांचा , साल काढायला अन पिळायच खात माझ्याकडे न्हाय ठेवत मी, म्हुनशान बिन सोललेल्या.

नगरीनिरंजन's picture

14 Oct 2010 - 1:51 pm | नगरीनिरंजन

हे बरंय.. उद्या बिर्याणीच्या पाकृमध्ये बोकडाचा फोटो लावाल.

मी ऋचा's picture

16 Oct 2010 - 2:52 pm | मी ऋचा

ह.ह.पु.वा.! एक लंबर!

शहराजाद's picture

15 Oct 2010 - 1:01 am | शहराजाद

माझी आईदेखील काहीशी अशीच खमंग काकडी करते, पण त्यात दह्याच्या जागी दाण्याचे कूट असते.

अपर्णातै, एक शंका: काकडी-दह्याचा हा पदार्थ एक-दोन महिने कसा टिकवतात? माझ्याकडे फ्रिजबाहेरचे दही, पाणी काढूनही काही दिवसांतच वाशेळे होते.

फ्लूचा सीझन येतोच आहे, त्यावेळी पडशासाठी करून बघेन.

सुहास..'s picture

14 Oct 2010 - 1:49 pm | सुहास..

दॅट्स ईट !!

वाटच बघत होतो, धन्यु धन्यु.

जिप्सी's picture

14 Oct 2010 - 2:10 pm | जिप्सी

अपर्णाताई, हा पदार्थ मला लहानपणापासून माहीत आहे,आमच्या कोल्हापूरातल्या घरात डांगर्,नाकार्ड इ. पदार्थ नेहमीच असतात.(आमची आजी नेहमी वाळकं(काकडीला कोल्हापूरी नाव) घालून डांगर करायच्या गोष्टी करत असे) कदाचित तुम्हाला कायरस्,खांतोळ्या असले आडमार्गी पदार्थ्सुद्धा माहीत असतीलच.

अवा.:- आता आमचीसुद्धा वाटणी आलीच घड्याळात !

स्पंदना's picture

14 Oct 2010 - 4:21 pm | स्पंदना

खरच माहिती आहे? नाही हो कोल्हापुरात पण कोणाला माहित असलेल नाही माहीत मला.

तुम्ही कोल्हापुरचे ना? मग माझ्या माहेरचे.
तुम्ही नका त्या घड्याळ्याच्या माग जाउ. मी तुम्हाला एक अख्खा कोम्बडा देते. जिवंत. तो आरवला की उठा.
काय?

नाकार्ड मस्त

आणि जीप्सींना कोंबदा पण मिळाला आहे .. त्यामुळे चिकन बरोबर पण तुम्ही खाउ शकता, बरे आहे बाबा.

जिप्सी's picture

14 Oct 2010 - 7:00 pm | जिप्सी

खरच माहिती आहे? नाही हो कोल्हापुरात पण कोणाला माहित असलेल नाही माहीत मला. >>>> अहो उन्हाळ्यात ते खायला घालून पार कंटाळा आणायचे,त्यामुळं चांगलच लक्षात आहे.

एक अख्खा जिवंत कोम्बडा देते :- नको नको सध्या तो कोंबडा तुमच्याकडंच एफ.डी.मधे जमा असूदे,६ महिन्यात त्याच्यावर व्याज जमा होउन त्याचा बोकड होइल्,मग तो मला द्या. कसं?

मला हा पदार्थ ऐकून माहित होता.
घड्याळ नको.
धन्यवाद!

जिप्सी's picture

14 Oct 2010 - 7:11 pm | जिप्सी

मग बोकड वाटून घ्यायचा काय? २ फर्रे तुम्हाला २फर्रे मला.
(आपण उदार असत असतो!)

बोकडही नको!
मी शाकाहारी आहे.

स्पंदना's picture

14 Oct 2010 - 8:29 pm | स्पंदना

याला म्हणतात बाजारात तुरी...

साध कोम्बड द्यायला गेले नॅचरल घड्याळ म्हणुन तर यांना बोकडाची स्वप्न पडायला लागली.

गजराच घड्याळ नाहीतर मग लवकर उठण्यासाठी म्हणुन कोम्बडा देते म्हंटल तर त्याचा फर्रा दिसतो .
नाकारड खा गपचुप.

जिप्सी's picture

14 Oct 2010 - 11:49 pm | जिप्सी

कोंबडा = नॅचरल घड्याळ अस्सं म्हणा की,मला वाटलं की नाकार्ड खाउन कंटाळा आला असेल तर कोंबडा खावा. असू दे आता ! कोंबडा तर कोंबडा पण तेवढा उलट्या पंखाचा असू दे !!! ;-)

स्वाती२'s picture

14 Oct 2010 - 7:24 pm | स्वाती२

नविनच पदार्थ!

विसोबा खेचर's picture

14 Oct 2010 - 8:28 pm | विसोबा खेचर

मस्तच..! :)

तात्या.

--
तात्या-धर्मेन्द्र भेट हा लेख मिपावर लौकरच! :)

शुचि's picture

15 Oct 2010 - 4:32 am | शुचि

सॉलीड गोष्ट आहे. उपद्रवमूल्य किती असतं काही लोकांचं ना खरच :\

निवेदिता-ताई's picture

15 Oct 2010 - 11:06 am | निवेदिता-ताई

मस्त.......वेगळाच आहे.......कध्धी खाल्ला नाय........येयला पाहिजे तुमच्याकडे,

आमच्याकडे ते वाळक पण मिळत नाही बॉ.

प्राजक्ता पवार's picture

15 Oct 2010 - 2:05 pm | प्राजक्ता पवार

मस्तं :)