नमस्कार मंडळी,
भुक लागणे आणि त्यासाठी कर्म करणे हे माणसाचे एक मुल्य आहे असे मला वाटते, ;)
घराबाहेर असल्यावर घरच्या जेवणाच्या चवीची आठवण येणे सहाजिकच आहे. :)
असो,
लोकांना आवडेल असे जेवण नेहमीच बनवतो पण फोटो घ्यायचे नेहमीच विसरतो, पण आज भुक जरा कमी असल्याने आणि त्यामुळे डोकं ठिकाणावर होतं. शेवटी कमीत कमी शेवटचा फोटो घेतलाच. :)
बाहेर खायची इच्छा नसल्यास आणि भुकेवर साधा सरळ घरगुती उपाय म्हणजे तांदळाची खिचडी. :)
चला तर, घ्या साहित्य..
तेलः तब्येतीनुसार
मीठः चवीनुसार
हिरवी मिरची: मानवेल तशी (उगाचच)
आलं: १ ईंच
तिखट: चवीनुसार
लसुणः ४-५ मोठ्या पाकळ्या
१-२ तुकडे दालचिनी
२-३ ईलायची
गाजरः १
फ्रेश वटाणे: मुठभर
शेंगदाणे: मुठभर
फ्लॉवरः थोडासा ;)
कांदा: मोठा एक
टोमॅटो: एक मिडियम
बटाटा: मोठा एक
कॉलीफ्लॉवरः अगदी थोडा.
घरचा मसाला: २-३ चमचे (नसल्यास हरकत नाही, रेडीमेड वापरा ;) )
कृती:
१. कुकर मधे तेल गरम करुन जिरं, मोहरी, दालचिनी, ईलायची तडकवा..
२. शेंगदाणे, कांदा, जिरं (हवं असल्यास) आणि मिरची तेल तापवुन त्यात टाका.
२. थोडं थांबा हो.. ;)
३. थोडं हिंग टाका
४. मग कांदा,मिरची टाका. परता.
५. टोमॅटो, कॉलीफ्लॉवर, बटाटा.. वगैरे सगळे मिक्स करा.
६. आलं, लसुण (अथवा पेस्ट) हिशोबानुसार टाका. १०-१५ मिनिटे परता.
७. तांदुळ, आणि (कोणत्याही) १-२ डाळी धुवुन घ्या.
८. आधीच्या जिन्नसात मिक्स करा, थोडा वेळ परता... :)
९. तांदुळ टाका, दोन पेरं बुडतील एवढं पाणि टाका झाकण लावा, ३-४ शिट्ट्या काढा, तोपर्यंत भुकेची कळ पण काढा
१०. एक-दोन-तीन शिवास रिगल चे पेग रिचवा.
११. जेवण तयार आहे. दही असल्यास उत्तम. :)
प्रतिक्रिया
15 Sep 2010 - 3:27 pm | गणपा
आय्ला खिचडी आहे कि बिर्याणि;)
शेवटच्या फोटुतल सरबत पण आवडल :)
15 Sep 2010 - 3:38 pm | सुनील
फ्लॉवरः थोडासा
कॉलीफ्लॉवरः अगदी थोडा
म्हणजे काय?
(पाकृ लिहायच्या आधीच फोटोतलं सरबत घेतलं की काय?)
15 Sep 2010 - 3:46 pm | मराठमोळा
मालक,
>>पाकृ लिहायच्या आधीच फोटोतलं सरबत घेतलं की काय?)
अगदी अगदी, थोडा अतिकाम करुन त्रस्त असल्याने.. अजुनही व्हीपीन वर कामच करत आहे.. ;)
आणि इथे हाटेलात एलेक्ट्रीक शेगडी असल्याने जेवण बनायला दुप्पट वेळ जातो. :)
लेख न वाचताच प्रकाशित केला आज.. वेळे अभावी.. :)
व्यग्र,
15 Sep 2010 - 3:46 pm | llपुण्याचे पेशवेll
छान छान. आता ममोपण प्रभ्याप्रमाणे स्वैपाक शिकू लागला आहे तर. :)
ममो लग्नाळू झालास काय रे? ;)
15 Sep 2010 - 3:50 pm | मराठमोळा
पुप्या,
>> स्वैपाक शिकू लागला आहे तर
मला आधीपासुनच येतो रे.. पुण्यात घरी/ आजुबाजुला रांग लागते माझ्या हातची बिर्याणी खाण्याकरता ;)
त्यासाठी लग्नाळु व्हावे लागते असे काही नाही बर का.. ;)
पण आपण आयटीत असल्यास हे सग्ळे बायकोला सांगु नये हा सल्ला.. :D
15 Sep 2010 - 5:38 pm | चिरोटा
मस्त रेसिपी. खिचडीबरोबर भाजलेला पापड असेल तर आणखी मजा.
बायको आय टीत हे असल्यास सांगु नये.(काल बसमध्येच एक 'बकरा' दिसला. बायकोला 'भात बरा झाला आहे का?" म्हणून फोनवर जोरात विचारत होता! बिचार्याला वाटले असणार आजुबाजुला कोणालाच मराठी येत नाही!)
15 Sep 2010 - 5:40 pm | llपुण्याचे पेशवेll
बायको आय टीत हे असल्यास सांगु नये.(काल बसमध्येच एक 'बकरा' दिसला. बायकोला 'भात बरा झाला आहे का?"
=)) =)) =))
15 Sep 2010 - 7:08 pm | गणपा
फुटलो =)) =))
18 Sep 2010 - 11:30 pm | मी-सौरभ
:)
15 Sep 2010 - 5:40 pm | यशोधरा
यू टू ममो?
15 Sep 2010 - 6:00 pm | खादाड
खिचडी हा आमचा जवळपास एक दिवस आड चा बेत आहे लग्नाळु असुन सुद्धा ! फोटो मस्त साथिदार छान आहे खिचडीचा ;)
15 Sep 2010 - 7:02 pm | विसोबा खेचर
खिचडी आणि शिवा.. दोन्हीही क्लास रे.. जियो..! :)
15 Sep 2010 - 7:11 pm | परिकथेतील राजकुमार
बाटली दिसल्याने खिचडीकडे दुर्लक्ष केले आहे.
15 Sep 2010 - 8:28 pm | सूड
खिचडीची रेसिपी छान आहे!!
15 Sep 2010 - 8:20 pm | अनिल हटेला
आपल्या रेशीपीतील खिचडी तोड्या फार फरकाने आस्मादीक सुद्धा बनवतात
आणी व्हेज पूलाव समजुनच खातात....
सोबत शिवास नसली तरी नेमीरॉफ वोडका असते ...;-)
आपला,
वोडकेश्वर प्रसन्न....:-D
15 Sep 2010 - 10:52 pm | शुचि
याला म्हणतात आत्मविश्वास.
नाहीतर ईतर लोक राबतायत एक्झॉटीक अन कठीणात कठीण पदार्थ बनवून त्याच्या अवघड पाकृ टाकण्यासाठी.
ही बघा - एकतर खिचडी त्यात फ्लॉवर दोनदा टाकलाय, फोटो दोनदा टाकलाय. :)
आप्ल्याला स्पिरीट आवडलं ममो! (फोटोतलं ते स्पिरीट नाही स्पिरीट म्हनजे जिगर भौ!)
16 Sep 2010 - 6:36 am | रेवती
गणपा, प्रभो,
प्रतिसादाची भाषा जपून वापरा.
16 Sep 2010 - 7:01 am | सहज
मस्त रे ममो, बाटली+ग्लास (ऑपश्नल) व तो बाउल तसाच्या तसाच घेउन कोचावर तंगड्या पसरुन बसुन टिव्ही समोर खायचे ते दिवस आठवून डोळे पाणावले.
एन्जॉय ममो!
16 Sep 2010 - 11:02 am | सुधीर काळे
'लुत्फ' हा शब्द बरोबर लिहिल्याबद्दल खास कौतुक! (बरेच लोक लुफ्त असा लिहितात!)
बाकी स्वयंपाकात आपली प्रगती फक्त चहा करण्यापुरती आणि मॅगी उकळण्यापुरती(च)!
आणि आम्ही 'ब्लॅक लेबल'चे भक्त, 'शिवास रीगल'चे नाहीं!
16 Sep 2010 - 1:10 pm | सुहास..
ताटापेक्षा बाटलीतली पाककृती आवडली :)
18 Sep 2010 - 11:34 pm | मी-सौरभ
सरबत असेल तर खिचडी पण खायला तयार है आपण :)
19 Sep 2010 - 12:01 am | शिल्पा ब
खिच्ची छान दिसतेय...पण कुकरात दोन शिट्ट्यात होते खिचडी...एवढ्या ४-५ कशाला हव्यात?
एक शिट्टी झाली कि gas मध्यमवर ठेवून उरलेली एक शिट्टी घ्यावी.....अनुभव.
19 Sep 2010 - 10:31 pm | मी-सौरभ
'शिट्टी' वाजवूच नये :)
20 Sep 2010 - 8:56 am | स्पंदना
>>>>काही जण म्हणतात शीट्टी वाजवु नये>>
अहो एव्हढी एकच शीट्टी आहे जी ऐकायला सार्या भारतिय स्त्रिया आतुर असतात आणि प्रतिसाद म्हणुन कुकर कडे पण पळतात...अग्दी मुरलिचा नाद ऐकुन पळायच्या तश्या..
हलके घ्या हो सर्वजण ...नाहीतर माझी कंबख्ती!
23 Sep 2010 - 6:04 pm | अनन्ता
Chivas Regal बरोबर खिचडी, फारच भारि
27 Sep 2010 - 3:54 pm | स्वैर परी
:)