नमस्कार मंडळी,
भुक लागणे आणि त्यासाठी कर्म करणे हे माणसाचे एक मुल्य आहे असे मला वाटते, ;)
घराबाहेर असल्यावर घरच्या जेवणाच्या चवीची आठवण येणे सहाजिकच आहे. :)
असो,
लोकांना आवडेल असे जेवण नेहमीच बनवतो पण फोटो घ्यायचे नेहमीच विसरतो, पण आज भुक जरा कमी असल्याने आणि त्यामुळे डोकं ठिकाणावर होतं. शेवटी कमीत कमी शेवटचा फोटो घेतलाच. :)
बाहेर खायची इच्छा नसल्यास आणि भुकेवर साधा सरळ घरगुती उपाय म्हणजे तांदळाची खिचडी. :)
चला तर, घ्या साहित्य..
तेलः तब्येतीनुसार
मीठः चवीनुसार
हिरवी मिरची: मानवेल तशी (उगाचच)
आलं: १ ईंच
तिखट: चवीनुसार
लसुणः ४-५ मोठ्या पाकळ्या
१-२ तुकडे दालचिनी
२-३ ईलायची
गाजरः १
फ्रेश वटाणे: मुठभर
शेंगदाणे: मुठभर
फ्लॉवरः थोडासा ;)
कांदा: मोठा एक
टोमॅटो: एक मिडियम
बटाटा: मोठा एक
कॉलीफ्लॉवरः अगदी थोडा.
घरचा मसाला: २-३ चमचे (नसल्यास हरकत नाही, रेडीमेड वापरा ;) )
कृती:
१. कुकर मधे तेल गरम करुन जिरं, मोहरी, दालचिनी, ईलायची तडकवा..
२. शेंगदाणे, कांदा, जिरं (हवं असल्यास) आणि मिरची तेल तापवुन त्यात टाका.
२. थोडं थांबा हो.. ;)
३. थोडं हिंग टाका
४. मग कांदा,मिरची टाका. परता.
५. टोमॅटो, कॉलीफ्लॉवर, बटाटा.. वगैरे सगळे मिक्स करा.
६. आलं, लसुण (अथवा पेस्ट) हिशोबानुसार टाका. १०-१५ मिनिटे परता.
७. तांदुळ, आणि (कोणत्याही) १-२ डाळी धुवुन घ्या.
८. आधीच्या जिन्नसात मिक्स करा, थोडा वेळ परता... :)
९. तांदुळ टाका, दोन पेरं बुडतील एवढं पाणि टाका झाकण लावा, ३-४ शिट्ट्या काढा, तोपर्यंत भुकेची कळ पण काढा
१०. एक-दोन-तीन शिवास रिगल चे पेग रिचवा.
११. जेवण तयार आहे. दही असल्यास उत्तम. :)
वाचने
7083
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
आय्ला खिचडी आहे कि
ठीक
मालक,>>पाकृ लिहायच्या आधीच
In reply to ठीक by सुनील
छान छान. आता ममोपण
पुप्या, >> स्वैपाक शिकू लागला
In reply to छान छान. आता ममोपण by llपुण्याचे पेशवेll
मस्त
बायको आय टीत हे असल्यास सांगु
In reply to मस्त by चिरोटा
काल बसमध्येच एक 'बकरा' दिसला.
In reply to बायको आय टीत हे असल्यास सांगु by llपुण्याचे पेशवेll
ह्म्म
In reply to काल बसमध्येच एक 'बकरा' दिसला. by गणपा
यू टू ममो?
खिचडी हा आमचा जवळपास एक दिवस
खिचडी आणि शिवा.. दोन्हीही
बाटली दिसल्याने खिचडीकडे
खिचडीची रेसिपी छान आहे, पण
सै रे !!
याला म्हणतात
गणपा, प्रभो,प्रतिसाद जपून
मस्त
लुत्फ हा शब्द बरोबर लिहिल्याबद्दल खास कौतुक!
ताटापेक्षा बाटलीतली पाककृती
लुत्फ कधी??
खिच्ची छान दिसतेय...पण कुकरात
काही लोक म्हनतात ...
In reply to खिच्ची छान दिसतेय...पण कुकरात by शिल्पा ब
>>>>काही जण म्हणतात शीट्टी
:)
ह्याला पुलाव पन म्हन्तात!