साहीत्य-
३ डझन खेकडे
५ टे. स्पून तेल
३ मोठे कांदे
१ इंच आल्याचा तुकडा
४ मोठ्या पाकळ्या लसूण
१० लहान तिखट मिरच्या
१ घट्ट वाटी कोथींबीर
२ घट्ट वाट्या ओलं खोबरं
२ टी स्पून चिंचेचा घट्ट कोळ
१ टी स्पून आलं-लसूण पेस्ट
१ टी स्पून हळद
१/२ टी स्पून हिंग
४ टी स्पून लाल तिखट
४ टी स्पून माशाच्या कालवणाचा मसाला
४ टी स्पून धणे-जीरे पावडर
चवीप्रमाणे नारळाचं दूध
चवीप्रमाणे मीठ
From Lotus
हिरवं वाटण अर्थात कोथिंबीर, मिरच्या, आल्याचा तुकडा, लसूण पाकळ्या वाटून तयार ठेवणे.
खोबरं तेलावर लालसर परतून तयार ठेवणे आणि नंतर मिक्सरमधून काढणे.
कांदा गुलाबी परतून तयार ठेवणे.
From Lotus
चिंबोर्या स्वच्छ करून धुवून, नांग्या तोडून घेणे. मोठ्या नांग्या व मधला भाग वेगळा ठेवणे. लहान पाय वेगळे करणे.
From Lotus
लहान पाय सगळे भरपूर पाणी घालून मिक्सरमधून काढणे व नंतर गाळून त्याचं पाणी घेणे. ह्याच पाण्याचा रस्सा होणार आहे.
हुश्श!!!!! तयारी झाली बाई!
_____________________________
आता एका मोठ्या कढल्यात थोडसं तेल तापवा, त्यावर आपला परतलेला गुलाबी कांदा घाला. थोड्या वेळातच चिंबोर्यांच्या मोठ्या नांग्या, मधले भाग ,लाल तिखट, माशाच्या कालवणाचा मसाला, हळद, हिंग, धण्याजीर्याची पूड, चिंचेचा कोळ व आलं-लसूण पेस्ट घाला. मध्यम आचेवर हे सर्व १० ते १५ मिनीटं मस्त उकळू द्यां. नंतर लालसर परतलेलं आणि मिक्सरमधून काढलेलं खोबरं घाला, मीठ, आणि जरा मेलो करायला नारळाचं दूध घालून, लहान नांग्यांचं आपण काढलेलं पाणी घालून परत मस्त उकळी येऊ द्या.
आणि हा झाला चिंबोर्यांचा रस्सा तय्यार : )
From Lotus
प्रतिक्रिया
25 Jul 2010 - 5:30 am | सहज
३ डझन खेकडे
वॉव!! मोठी पार्टी झाली म्हणायची का? किती जणांकरता? :-)
25 Jul 2010 - 5:51 am | दिपाली पाटिल
अगदी अगदी...मलापण हेच म्हणायचे होते... ३ डझन खेकडे... :O
बाकी पाकृ मस्तच आहे...
दिपाली :)
25 Jul 2010 - 6:53 am | सन्जोप राव
तोंपासु.
पावसाळी हवा आहे. असा रस्सा आणि गरमागरम भात खावा आणि तीन तास झोपून जावे!
26 Jul 2010 - 1:11 am | शुचि
तथास्तु!! :)
25 Jul 2010 - 10:09 am | वेताळ
ही जबरदस्त पाकृ. मज्जा आ गया. आज आम्ही मासा केला आहे.
त्यामुळे रस्सा परत कधी तरी करु.
वेताळ
25 Jul 2010 - 10:18 am | पाषाणभेद
एकदम आण्णा चिबोंरीची आटवन आली बगा.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
25 Jul 2010 - 12:04 pm | Pain
मीही खबरदारमधे हे नाव ऐकले होते पण चिंबोरी म्हणजे खेकडे हे आज कळले.
अशा पद्धतीने हा रस्सा बनवला की त्यातले काय खातात ?
(म्हणजे ड्रमस्टिक्स केल्यावर हाडांच्या भोवतालचे मांस खातात तसे या नांग्यात वगैरे काय खातात / खाण्याजोगा भाग कुठे असतो? )
26 Jul 2010 - 1:16 am | शुचि
चिंबोरी प्रकार बराच क्लिष्ट असतो खायला. पण अतिशय चविष्ट. यात जे क्लॉज (नांग्या) असतात त्यात खूप मिळतं खायला. मधला भाग जरा कौटुंबिक वातावरणात, टेबल म्यानर्स वगैरे धाब्यावर बसवून चिवडत चिवडत खावा लागतो.
जर लाखेची मादी मिळाली तर स्वर्गसुख. खूप चविष्ट अंड्याची सॅक कवचाला चिकटलेली मिळते. मस्त लागते.
25 Jul 2010 - 12:05 pm | अवलिया
सगळ्यात वरचा फोटो मास्तरचा का? त्याला चिंबो-या फार आवडतात असे ऐकले होते.
--अवलिया
25 Jul 2010 - 1:10 pm | विनायक प्रभू
१३ आणि जुळ्या मधे फरल असतो भौ.
25 Jul 2010 - 1:24 pm | अवलिया
प्रचंड सहमत
--अवलिया
25 Jul 2010 - 12:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लै भारी. :)
-दिलीप बिरुटे
25 Jul 2010 - 12:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी चुकून तीन डझन बेवडे असं वाचलं! ;-)
घट्ट वाटी म्हणजे?
अदिती
25 Jul 2010 - 1:08 pm | मराठमोळा
>>मी चुकून तीन डझन बेवडे असं वाचलं!
=))
अदिती,
नशीब तु ही पाकृ करायचं मनावर घेतलं नाहीस, नाहीतर तीन डझन बेवडे उगाचच धारातीर्थी पडले असते.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
25 Jul 2010 - 12:28 pm | मराठमोळा
वा. मस्तच. :)
येकदम आवडेश.
(अवांतरः पेठकर काकांनी यज्ञकर्म मधे नॉन-वेज बंद केले आहे , नाहीतर आताच गेलो असतो.)
मला अक्षररंग सुविधा का नाही बरे? :?
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
25 Jul 2010 - 12:50 pm | स्पंदना
:W
मला पण अक्षररंग सुविधा नाही आहे, त्यात आणी भर म्हणुन ते मोट्ठ्यान तोंड उघडुन हसणार स्मायली पण माझ्या साठी काम नाही करत.
रस्स्सा एकदम मस्त ह शुची पण तीन डझन खेकडे?
साफ करुन करुन रात्री झोपेत पण तेच काम करत असल्यासारख होइल बाई मला तर!
अय्या तु खेकड्यांचे कवच नाही काढत? त्याच्या आत मध्ये तर साफ करतो आम्ही.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
26 Jul 2010 - 1:18 am | शुचि
मला बाई मासे, खेकडे यांची साफसफाई खूप मनापासून आवडते. मग ते हिरवं, खोबर्याचं वाटण्-घाटण.... मज्जाच मज्जा ;)
25 Jul 2010 - 12:58 pm | खादाड
मस्त आम्ही इतक्यातच बनवले होते ८ जोडी पण पायांचा असा उपयोग माहित नव्हता त्यामुळे उगीचच चीवड्त बसलो ! पुढ्च्यावेळी असच करीन धन्यवाद ! पा.क्रु मस्त ! :H
26 Jul 2010 - 1:20 am | शुचि
ते पाय फार नाजूक असतात त्यामुळे खाता येत नाहीत पण खूप रस्सा निघतो त्यांचा असा मिक्सीमधून. जरूर करून पहा :)
25 Jul 2010 - 1:20 pm | jaypal
माझी आवडाती डीश. शुचीजी रस्सा वाटीचा तर्रर्ररी दार फोटो टाकयला हवा होता. =P~ =P~ =P~ =P~
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
26 Jul 2010 - 9:49 am | शानबा५१२
रस्सा कमी झालाय जरा वाढवला पाहीजे होता.
26 Jul 2010 - 12:30 pm | जागु
वा शुची मस्तच.
26 Jul 2010 - 1:05 pm | गणपा
१३ डझन बाबौ.....
बाकी चिंबोरी १ नंबर दिसतायत.
26 Jul 2010 - 3:47 pm | स्वाती२
तोंडाला पाणी सुटले. मस्त दिसतोय रस्सा!
26 Jul 2010 - 11:24 pm | संदीप चित्रे
पावसाळी हवा, गरमागरम भात, चिंबोरीचं असं कालवण आणि मग पडी टाकणे !
सुख निव्वळ सुख !
(खूप जास्त सर्दी झाली तर चिंबोरीचा रस्सा आवर्जून पिणारा) संदीप !