साहीत्य-
३ डझन खेकडे
५ टे. स्पून तेल
३ मोठे कांदे
१ इंच आल्याचा तुकडा
४ मोठ्या पाकळ्या लसूण
१० लहान तिखट मिरच्या
१ घट्ट वाटी कोथींबीर
२ घट्ट वाट्या ओलं खोबरं
२ टी स्पून चिंचेचा घट्ट कोळ
१ टी स्पून आलं-लसूण पेस्ट
१ टी स्पून हळद
१/२ टी स्पून हिंग
४ टी स्पून लाल तिखट
४ टी स्पून माशाच्या कालवणाचा मसाला
४ टी स्पून धणे-जीरे पावडर
चवीप्रमाणे नारळाचं दूध
चवीप्रमाणे मीठ
हिरवं वाटण अर्थात कोथिंबीर, मिरच्या, आल्याचा तुकडा, लसूण पाकळ्या वाटून तयार ठेवणे.
खोबरं तेलावर लालसर परतून तयार ठेवणे आणि नंतर मिक्सरमधून काढणे.
कांदा गुलाबी परतून तयार ठेवणे.
चिंबोर्या स्वच्छ करून धुवून, नांग्या तोडून घेणे. मोठ्या नांग्या व मधला भाग वेगळा ठेवणे. लहान पाय वेगळे करणे.
लहान पाय सगळे भरपूर पाणी घालून मिक्सरमधून काढणे व नंतर गाळून त्याचं पाणी घेणे. ह्याच पाण्याचा रस्सा होणार आहे.
हुश्श!!!!! तयारी झाली बाई!
_____________________________
आता एका मोठ्या कढल्यात थोडसं तेल तापवा, त्यावर आपला परतलेला गुलाबी कांदा घाला. थोड्या वेळातच चिंबोर्यांच्या मोठ्या नांग्या, मधले भाग ,लाल तिखट, माशाच्या कालवणाचा मसाला, हळद, हिंग, धण्याजीर्याची पूड, चिंचेचा कोळ व आलं-लसूण पेस्ट घाला. मध्यम आचेवर हे सर्व १० ते १५ मिनीटं मस्त उकळू द्यां. नंतर लालसर परतलेलं आणि मिक्सरमधून काढलेलं खोबरं घाला, मीठ, आणि जरा मेलो करायला नारळाचं दूध घालून, लहान नांग्यांचं आपण काढलेलं पाणी घालून परत मस्त उकळी येऊ द्या.
आणि हा झाला चिंबोर्यांचा रस्सा तय्यार : )
प्रतिक्रिया
सही!
अगदी
In reply to सही! by सहज
तोंडाला पाणी
तथास्तु!! :)
In reply to तोंडाला पाणी by सन्जोप राव
व्वा व्वा...आज खुपच मस्त वातावरण आणि त्यात
एकदम आण्णा
मीही
चिंबोरी प्रकार बराच क्लिष्ट
In reply to मीही by Pain
सगळ्यात
१३
In reply to सगळ्यात by अवलिया
प्रचंड
In reply to १३ by विनायक प्रभू
लै भारी.
मी चुकून
>>मी चुकून
In reply to मी चुकून by ३_१४ विक्षिप्त अदिती
वा. मस्तच.
मला पण
मला बाई मासे, खेकडे यांची
In reply to मला पण by स्पंदना
मस्त आम्ही
ते पाय फार नाजूक असतात
In reply to मस्त आम्ही by खादाड
जबरदस्त
रस्सा कमी झालाय जरा वाढवला
वा शुची मस्तच.
१३ डझन बाबौ..... बाकी चिंबोरी
तोंडाला पाणी सुटले. मस्त
व्वा !