कळसुबाई!! उंची 1,646 m (5,400 ft) ह्याला गवसणी घालायचे ठरवुन .. बारी गावात पाऊल ठेवले. समोर पाहतो तर कळसुबाई
आणि विस्तारीत सह्याद्रीचा कडा
बारी गाव पार करताना शेताडीमधुन वाहणारा हा ओढा
कळसुबाईची सुरवात.. पहिला डोंगर, सरळ अंगावर येणारा चढ...पुढे काय वाढुन ठेवलय याची यथार्थ कल्पना देणारा, सह्याद्रीच्या कुशीत कष्टाला फार महत्व!
दोन दिवसांची सुट्टी साजरी करायची होती. थोडे चढुन झाल्यावर आंब्याच्या थंड सावलीत श्रमपरिहार करुन, ह्या भावड्याकडे आलो. २-३ दा आलो असल्याने परीचय होताच. घराच्या मागचे खोपटे, शेकोटीला लाकडे मिळाली. जेवायची न निजायची सोय लागली.
वडाची पोर्णिमा कालचीच. पुर्ण चंद्राच्या प्रकाशात, शेकोटीची ऊब घेत, गप्पांचा फड छान रंगला. सगळंच कसं छान जमुन आलं होते. १९५०-७० मधील चित्रपट संगीत, गायकांचे स्वर्गीय स्वर माहोल अजुनच नशीला करीत होते. रात्र कधी सरली कळलीच नाही. सकाळी गरमा-गरम पोह्यांचा नाश्ता करुन मार्गाला लागलो.
कसलेली शेती, मधुनच हिरवे गवत.. निसर्गाच्या कुंचल्याची अदाकारी निव्व़ळ पहात रहावी!!
महत्वाचा टप्पा.. कड्याची खडी चढण, धुक्यात हरवलेली वाट..
हा अतिप्रचंड सह्यकडा
काही विहंगम द्रुश्ये
पहीली शिडी
मगाशी उंच, अभेद्य वाटणारा कडा आता जरा कह्यात वाटत होता
दुसरी शिडी
इथे मात्र फसलो. दोन शिड्या झाल्याकी आलो आपण असा आमचा गैरसमज पुरता धुतला गेला
शिडीनंतर पार करावे लागणारे ३ डोंगर, चढण पुर्वीइतकी नसली तरी चढणच होती..
दोन डोंगर पार केल्यावर धुक्यापल्याड दिसले ते कळसुबाई!!
एवढ्या उंचीवर कुणातरी पुण्यवंतानी बांधलेली विहीर.. तशी परंपरागत विहीर नाही. पाण्याचे चौकोनी कुंड, आणि जमिनीखालुन तिथेच येणारा प्रवाह, याला एका खड्ड्यात बंदीस्त करुन बाजुने ४ फुट दगड बांधुन काढले आहेत.
हुश्श!! पोचलो एकदाचे,,, पण हे काय, शेवटच्या शिडीवर ही गर्दी
मग आम्ही शिडीच्या बाजुचा पुर्वापार वापरात असलेला रस्ता निवडला. थोडे हात-पाय ताणुन पोचलो वर, वर होते धुक्याचे साम्राज्य!!
देवीचे मंदीर आणि भटके
एवढ्या उंचीवर मुक्तपणे बागडणारी फुलपाखरे..
सभोवताली ढग असल्याने, कुठलाही गड, कुठलाही प्रदेश काहीच दिसले नाही.
उतरताना काही ठिकाणी क्लिक्ड....
प्रतिक्रिया
6 Jul 2010 - 3:48 am | बबलु
मस्त फोटू आणि वर्णन.
आमच्या M.I.T. ईंजीनीअरींग कॉलेजमधे आमची अशीच एक भटकी टोळी होती.
कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली.
....बबलु
6 Jul 2010 - 3:50 am | गणपा
अतिशय सुंदर.
नशिबवान आहात लेको तुम्ही सगळे :)
6 Jul 2010 - 4:16 am | शिल्पा ब
मस्त फोटो...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
6 Jul 2010 - 9:35 am | आनंदयात्री
छान फोटो आणि वर्णनही मस्त.
6 Jul 2010 - 10:39 am | पहाटवारा
बर्याच वर्षांपूर्वी गेलो होतो. त्याच ट्रिप मधे भंडारदर्याजवळ एक नवीन विद्युत प्रकल्पाचे काम चालले होते, त्याच्या एका २०० मीटर जमीनीच्या खाली असलेल्या बोगद्यात जायला मिळाले. त्यामुळे एकिकडे १६०० मीटर वर तर दुसरिकडे २०० मीटर खाली असा मजेशीर योग होता.
6 Jul 2010 - 11:09 am | समंजस
छान!! मस्त :)
6 Jul 2010 - 1:57 pm | टुकुल
मस्त रे..
--टुकुल
6 Jul 2010 - 4:02 pm | जे.पी.मॉर्गन
वर्णन आणि फोटू.... येक लंबर!
जे पी
6 Jul 2010 - 4:08 pm | स्वाती दिनेश
मस्त फोटो!!!
पाहताना हेवा वाटला,
स्वाती
6 Jul 2010 - 7:04 pm | प्रसन्न शरद
१९८८ साली गेलो होतो. मे महिन्यात दुपारी १२ वाजता चालायला सुरुवात केली ते पन ना जेवता. वर पोहोचे पर्यन्त हालत खराब झाली होती. मन्दीराच्या पुजारयाने बनवलेला भात खलल्यावर मगच मन्दिरात गेलो.
6 Jul 2010 - 7:11 pm | प्रभो
मस्त रे...३ वर्षापूर्वी केलेला कळसूबाई ट्रेक आठवला.... :)
6 Jul 2010 - 9:33 pm | सनविवि
येस...९ फेब्रु. २००७ :)
फोटु एकदम मस्त!
6 Jul 2010 - 7:13 pm | शानबा५१२
पहीला फोटो अविश्वसनीय कारण जरा एडीट केल्यासरखा वाटतो(जरी केलेला नसला तरी)......
पाचव्या फोटोतला माणुस थोडाफार निको सारखा दीसतो ना?
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
6 Jul 2010 - 7:14 pm | शानबा५१२
पहीला फोटो अविश्वसनीय कारण जरा एडीट केल्यासरखा वाटतो(जरी केलेला नसला तरी)......
पाचव्या फोटोतला माणुस थोडाफार निको सारखा दीसतो ना?
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
6 Jul 2010 - 8:33 pm | हर्षद आनंदी
प्रतिक्रियांसाठी मनापासुन आभार,,
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
6 Jul 2010 - 8:40 pm | धमाल मुलगा
मेलो! साफ मेलो!!!
जळव आम्हाला...कधी सोबत नेऊ म्हणुन नकोस हां!
6 Jul 2010 - 8:59 pm | अरुंधती
छान आलेत फोटोज. त्याबरोबरचे वर्णनही आवडले!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
6 Jul 2010 - 10:04 pm | विसोबा खेचर
शब्दच संपले..!
17 Jul 2010 - 1:33 pm | तिमा
फार पूर्वी शिड्या नव्हत्या. नुसते साखळदंड बांधून ठेवले होते. मग कठडा नसलेल्या उभ्या शिड्या होत्या. आता या चांगल्या शिड्या लावलेल्या दिसताहेत.
फोटो उत्तम.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
18 Jul 2010 - 2:12 am | नंदन
मस्त रे!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी