भालचंद्र नेमाडे यांची मुलाखत.. हिंदू धर्मातील अडगळ..

सागरलहरी's picture
सागरलहरी in काथ्याकूट
13 Jul 2010 - 11:44 am
गाभा: 

हिंदुद्वेष्टे नेमाडे यांचा जावईशोध !
मुंबई, ११ जुलै (वार्ता.) - मलिक अंबर हा ‘महाराष्ट्र धर्म’ स्थापन करणारा पहिला माणूस. आपण रामदासांचे नाव घेतो; पण ते काही खरे नाही. मलिक अंबरनेच शहाजी इत्यादींसारख्या मराठ्यांना सर्वप्रथम एकत्र केले आणि त्यातून मराठा धर्म पुढे आला. आज आपण हिंदु संस्कृती जगत असलो, तरी बौद्ध धर्मही पाळत आहोत. आपल्या वारकरी संप्रदायाची सारी तत्त्वे बौद्ध धर्मातूनच घेतलेली आहेत, असे अकलेचे तारे हिंदुद्वेष्टे लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी तोडले. नेमाडे यांचे ‘हिंदु : जगण्याची एक समृद्ध अडगळ’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. त्या निमित्ताने दैनिक ‘लोकमत’मध्ये त्यांची मुलाखत प्रसिद्ध झाली. त्यात त्यांची उपरोल्लेखित विधाने प्रसिद्ध झाली आहेत.
या मुलाखतीत नेमाडे पुढे म्हणतात, ‘‘आजोबा-पणजोबांपासून अनेक गोष्टी आपण सांभाळून ठेवलेल्या असतात. त्यामागे आपल्या भावना असतात. अगदी इथेही आपल्याकडे सज्जामध्ये सायकल असते, पाळणा असतो, अनेक वस्तू असतात. ती तशी अडगळच असते. हिंदु धर्मात तशी सगळी अडगळच झाली आहे आणि त्याला इलाज नाही.

कित्येक वेळा काही लेखक आधी गाजतात आणि मग अधिक गाजवले जातात. ते जे बोलतात, ते जणू ब्रह्मवाक्यच, अशा थाटात प्रसिद्धीमाध्यमे त्यांचा प्रसार करतात. त्यामुळे अशांना आपण विचारवंत वगैरे झाल्याचे भास होऊ लागतात. आपणच आपल्या धर्मावर टीका केली की, माध्यमे डोक्यावर घेतात, हे त्यांना नेमके ठाऊक असते. भालचंद्र नेमाडे हे त्यांतीलच एक.

हिंदु धर्मावर टीका करणार्‍यांना हिंदू विरोध करत नाहीत, हे दुर्दैव !
आपणच आपल्या धर्मावर टीका केली की, माध्यमे डोक्यावर घेतात हे लेखकांना नेमके ठाऊक असते. अन्य धर्मीय त्यांच्या धर्मावर अशी टीका करणार नाहीत; कारण आपल्याच धर्मावर आपणच टीका केली की, बहिष्कृत होणे वा मार खावा लागणे हे दोनच पर्याय समोर असतात. याची त्यांना पक्की खात्री असते. हिंदूंचे तसे नसते! त्यामुळे हिंदू असूनही हिंदूंवरच आघात करणार्‍यांचे फावते. त्यांच्या लेखनावर वा बोलण्यावर विरोधी प्रतिक्रिया उमटली की, ती करणार्‍यांना हे तालीबानी वगैरे संबोधून मोकळे होणार; पण पहिली खोड आपणच काढली, हे विसरणार. हे सर्व लिहिण्याचे कारण इतकेच की महाराष्ट्रातले थोर लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या `हिंदू जगण्याची एक समृध्द अडगळ' नामक बृह्द कादंबरीचा पहिला भाग लवकरच प्रकाशित होत आहे.

हिंदु धर्मावर गरळ ओकणारे नेमाडे आणि त्याला प्रसिद्धी देणारी `स्टार माझा' वृत्तवाहिनी !
`स्टार माझा' नामक वाहिनीला २७ जून २०१० या दिवशी नेमाडेंनी दिलेली मुलाखत पाहिली. त्यात त्यांनी जे तारे तोडले ते भन्नाटच होते. त्यांनी कौरवांना महाभारताचे नायक ठरवले आणि पांडवांनी महाभारत `हायजॅक' केल्याचे सांगितले. दुर्योधन हा जातीभेद न मानणारा पुरोगामी होता. (म्हणजे आजचे पुरोगामी म्हणवणारे त्याचे वंशज समजावे काय ?) राम आणि कृष्ण हे मांसाहारी क्षत्रिय होते. त्यांना ब्राह्मण कोणी बनवले ? कृष्ण हा व्यभिचारी होता आणि तो सामान्य `ड्रायव्हर' होता, अशी अनेक मुक्‍ताफळे त्यांनी उधळली. ब्राह्मण आणि हिंदुत्व पुढे नेऊ पहाणार्‍यांनी हिंदु धर्माचा नाश केला', या बोलण्यातून त्यांचा जातीद्वेषच दिसतो. ढीगभर नोट्स आणि टिपा काढलेल्या `फाइल्स' त्यांनी दाखवल्या. यात मूळ धर्मतत्त्वांचा अभ्यास किती याविषयी नक्कीच शंका येते. `स्टार माझा'नेही हिंदुत्वाची संकल्पना मोडीत काढणारी कादंबरी म्हणून नेमाडेंच्या कादंबरीची भलावण केली. अशा चोपड्या-कादंबर्‍यांनी धर्मतत्त्वे पालटत नसतात. ती शाश्‍वत असतात. हिंदु हा धर्म आहे. तो जगण्याचा मार्ग वा भौगोलिक संस्कृती एवढ्यात कोंबण्याचा प्रयत्‍न नको. नेमाडे, खरेतर तुमच्यासारखे लेखक हीच एक मोठी अडगळ आहे, जी बाहेर पडली तरी काही हानी होणार नाही.
(सौजन्य : दैनिक तरुण भारत (बेळगाव आवृत्ती), ४ जुलै २०१०) लेखक : राष्ट्रीय प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे

प्रतिक्रिया

विनायक पाचलग's picture

13 Jul 2010 - 12:10 pm | विनायक पाचलग

~X( ~X( ~X( ~X( ~X(

मृगनयनी's picture

13 Jul 2010 - 12:16 pm | मृगनयनी

नेमाडे, खरेतर तुमच्यासारखे लेखक हीच एक मोठी अडगळ आहे, जी बाहेर पडली तरी काही हानी होणार नाही.

=D> =D> =D> =D>

या विधानाचे स्वागत आहे! :)

|| जय परशुराम ||

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

भडकमकर मास्तर's picture

13 Jul 2010 - 3:55 pm | भडकमकर मास्तर

बा विनायका, तूच असा हताश झालास तर त्यांची मुलाखत कोण घेणार? त्यांच्यासोबत एक तास असा लेख कोण लिहिणार?

अवांतर : नेमाड्यांना खुले पत्र असा लेख पुढच्या साधनात येणार बहुतेक

विनायक पाचलग's picture

13 Jul 2010 - 6:11 pm | विनायक पाचलग

माझ्या एकट्याच्या जीवावर सगळे कसे चालणार..लिहिल की दुसरे कोणी ... ;) ;) ;) ;) ;)

बाकी मी काही कोसला वाचलेली नाही ..आणि हिंदु वाचेन असे वाटत नाही ...
कोसलातली भाषा वेगळी होती असे समजते .मात्र आजकाल तीच भाषा कॉमन तर झालेली नाही ना ???

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

मनिष's picture

13 Jul 2010 - 12:51 pm | मनिष

कृष्ण हा व्यभिचारी होता आणि तो सामान्य `ड्रायव्हर' होता.

स्तंभित झालो आहे. डोळ्यासमोर एक तारवटलेला, दाढीचे खुंट वाढलेला, बाहेररख्याली ड्रायव्हर समोर आला - त्याने नितीश भारद्वाज सरखे हसायला पाहिले तर ते भलतेच विचित्र दिसले. असो!

हिंदू धर्मात फतवे निघत नाही, उलट पुस्तकाचा खपा वाढतो म्हणून प्रकाशक निर्धास्त असावेत, हेच दुसर्‍या धर्मात असते तर नेमाडे कदाचित जिवंत नसते. परवाच पेपरात एका शिक्षकाचे हात कापल्याची बातमी वाचली - कारण त्याने परीक्षेत एक विवादास्पद उतार्‍यावर प्रश्न विचारले होते.
http://news.yahoo.com/s/afp/20100705/wl_sthasia_afp/indiaeducationcrimer...

ह्या(ही) पुस्तकावर बंदी वगैरे नकोच, पण अशा बेताल वक्तव्यांचा/लिखाणाचा सविस्तर समाचार घ्यायला हवा असे वाटते, म्हणजे असे लिखाण हे संदर्भपुर्ण साहित्य असण्यापेक्षा लेखकाच्या (पुर्वग्रह किंवा इतर कारणाने) दुषित दृष्टीकोनातून आलेले आहे हे सिध्द होईल. त्यांची credibility ही वैचारीक विरोधाने/लिखाणानेच शंकास्पद ठरवावी, असे वाटते.

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Jul 2010 - 12:35 pm | llपुण्याचे पेशवेll

कोसला वाले नेमाडे हेच का?
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

सहज's picture

13 Jul 2010 - 12:39 pm | सहज

नेमाड्यांना मआंजावर यायचे आमंत्रण द्या राव!

पंगा's picture

13 Jul 2010 - 12:42 pm | पंगा

राम आणि कृष्ण हे मांसाहारी क्षत्रिय होते. त्यांना ब्राह्मण कोणी बनवले ?

राम आणि/किंवा कृष्ण यांच्या आहाराच्या आवडीनिवडींबद्दल आणि/किंवा त्यांच्या वर्ण किंवा जातींबद्दल मला कल्पना नाही. (दोघेही क्षत्रिय असण्याबद्दल लहानपणापासून ऐकत आलेलो आहे, परंतु ही बाब व्यक्तिशः पडताळून पाहिलेली नाही.) मात्र, त्यांना कोणी 'ब्राह्मण बनवले' याची मला कल्पना नव्हती. निदान मी तरी कोणाला त्यांचा उल्लेख 'ब्राह्मण' असा करताना ऐकलेले किंवा पाहिलेले नाही.

राम किंवा कृष्ण यांना कोणीतरी 'ब्राह्मण बनवले' असे श्री. नेमाडे नेमक्या कशाच्या आधारावर म्हणतात याबद्दल काही संदर्भ मिळू शकेल काय? मुळात असे विधान त्यांनी ज्या मुलाखतीत केले असे वर म्हटलेले आहे, त्या मुलाखतीच्या ट्रान्स्क्रिप्टचा अधिकृत दुवा पडताळणीकरिता अधिक संदर्भाच्या (context) तपासणीकरिता मिळू शकेल काय?

धन्यवाद.

- पंडित गागाभट्ट.

अवलिया's picture

13 Jul 2010 - 12:51 pm | अवलिया

हा हा हा

गेली चाळिस वर्ष हा माणुस एका कादंबरीच्या जीवावर मिशीला तुप लावुन फिरत होता, आता उरलेले आयुष्य (जीवेत शरदः शतम् ) विचारवंत म्हणुन फिरेल.

--अवलिया

आण्णा चिंबोरी's picture

13 Jul 2010 - 9:14 pm | आण्णा चिंबोरी

जबरा प्रतिसाद णाणा... साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त टीकास्वयंवर आणि तुकाराम. देखणी आणि मेलडी हे कवितासंग्रह, बिढार, हूल, जरीला, झूल, निवडक तुकाराम गाथा, साहित्याची भाषा हे सगळं लेखन मिशा भादरुन केलेलं दिसतंय नेमाड्याने. अर्थात तुला याची कल्पना असेलंच म्हणा.

क्रेमर's picture

13 Jul 2010 - 10:58 pm | क्रेमर

नेमाड्यांनी मराठी संकेतस्थळांवर काही लेख, चर्चा, कथा, कविता (गेला बाजार विडंबन तरी) लिहिल्या आहेत का ? तसे नसल्यास बाकी कर्तृत्त्वाला अर्थ नाही.

छोटा डॉन's picture

13 Jul 2010 - 12:59 pm | छोटा डॉन

पण मिडियाने पुस्तक ऑलरेडी उचलेलेच आहे.
असो, बाकीच्या विचारवंतांचे मत ऐकण्यास उत्सुक आहे.

नेमाडे आता विचारवंत म्हणुन गाजणार हे नक्की !

------
छोटा डॉन

महेश हतोळकर's picture

13 Jul 2010 - 3:07 pm | महेश हतोळकर

विचारवंत
विचारजंत

सागरलहरी's picture

13 Jul 2010 - 1:16 pm | सागरलहरी

http://epaper.lokmat.com/Default.aspx?selpg=1959&selDt=07/11/2010&BMode=100

येथे तळातील बातमी पहा.

पंगा's picture

13 Jul 2010 - 8:35 pm | पंगा

बातमी वाचण्यासाठी त्या संस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे, असे दिसते.

यथावकाश नोंदणी करून वाचेन.

धन्यवाद.

- पंडित गागाभट्ट.

क्रेमर's picture

13 Jul 2010 - 8:38 pm | क्रेमर

येथे नोंदणी न करता वाचता येते.

पंगा's picture

13 Jul 2010 - 9:20 pm | पंगा

धन्यवाद.

वाचत आहे.

अमेरिकेत जुने काहीच ठेवत नाहीत. फर्निचर सगळे बदलतात आणि त्यासोबत कपडेही नवे घेतात. आता तर घर आणि कपडे बदलताना बायकोदेखील नवी करतात. कारण दोघांनाही नोकरी आणि आपली जागा सोडायची नसते. हे उद्योग आपण अजून सुरू केलेले नाहीत.

इथवर वरवर वाचले. एकंदरीत लक्षात आले. गंमत आहे. छान आहे. :D

- पंडित गागाभट्ट.

नावातकायआहे's picture

13 Jul 2010 - 1:17 pm | नावातकायआहे

>> गेली चाळिस वर्ष हा माणुस एका कादंबरीच्या जीवावर मिशीला तुप लावुन फिरत होता,

तुप संपल म्हनुन हे संम्द....
त्याला कळल कि आता हे अस लिहिल्याव तेल, तुप, धुपाटण आणि तो स्वता सम्द गायब होइल

नितिन थत्ते's picture

13 Jul 2010 - 2:26 pm | नितिन थत्ते

कोसला वाचली तेव्हाही ती फार ग्रेट आहे असे वाटले नव्हते. वेगळी भाषा मांडणी आहे एवढेच जाणवले होते.

असो पण आपल्याला साहित्यातलं काय कळतंय म्हणा.

नितिन थत्ते

अवलिया's picture

13 Jul 2010 - 2:52 pm | अवलिया

काय नेमाडे आवडत नाहीत... अरेरे उच्चभ्रु कसे होणार तुम्ही...
गेला बाजार मसंवर पुर्वोत्तर उत्तरोत्तरच्या गलितगात्र मर्णोन्मुख साहित्याला नवसंजीव्नी प्राप्त करुन देवु शकणा-या महान लेखकांच्या प्रगल्भ शैलीच्या आयामांच्या परिणामांचे दैनंदिन तसेच राजकीय, सामाजिक, आर्थिक, झालंच तर लैंगिक पडसादांमधुन उमटणा-या आक्रोशाच्या अर्कोत्तरी चर्चांमधे भाग घेण्यापासुन वंचित रहाणार बघा तुम्ही.

--अवलिया

विजुभाऊ's picture

13 Jul 2010 - 3:00 pm | विजुभाऊ

कथानक म्हणून कोसला फार ग्रेट वगैरे नाही . पण त्यातल्या भाषाशैलीमुळे अनेकजण कोलमडले होते. मराठी भाषेला शैलीदारपणाच्या बुरख्यातून बाहेर काढणार्‍यांपैकी कोसला एक महत्वाचा टप्पा आहे.
तुम्ही कोसला कोणत्या काळात आणि वयात वाचली यावर ती तुम्हाला कशी भावली हे ठरते.
समकालीनांमध्ये फडके खांडेकर काकोडकर हे होते...या सार्‍यात भाऊ पाध्यांचा एक मोठा अपवाद होता

प्रदीप's picture

13 Jul 2010 - 3:59 pm | प्रदीप

समकालीनांमध्ये फडके खांडेकर काकोडकर हे होते...या सार्‍यात भाऊ पाध्यांचा एक मोठा अपवाद होता

मला आठवते त्यानुसार कोसला ६० च्या उत्तरार्धात अथवा ७० च्या पूर्वार्धात प्रसिद्ध झाली. त्यावेळी फडके- खांडेकरांचा जमाना संपलेला होता. तत्कालिन प्रमुख प्रवाहातील कादंबरीकार म्हणजे श्री. ना. पेंडसे, शिवाजी सावंत, रणजित देसाई, ना. सं. इनामदार हे होत. दळवी पण त्याच काळातील पण 'प्रमुख प्रवाहा'तील नव्हेत.

कवितानागेश's picture

13 Jul 2010 - 2:51 pm | कवितानागेश

हा ग्रंथराज नेमाड्यानी नक्की कुणाकुणाची कुरापत काढायला लिहिला आहे ते कळत नाहीये.
त्यांचा विविध स्तरातील लोकांकडून 'सत्कार' होवो हीच प्रार्थना
( अर्थातच कृष्णाकडे!)
============
( अडगळप्रिय)माउ

मितभाषी's picture

13 Jul 2010 - 3:27 pm | मितभाषी

नेमाडेंची काही वाक्ये मुक्ताफळे आहेत हे एकवेळेस मान्य केले तरी.
'हिंन्दुत्व म्हणजे ब्राह्मणत्व' हे सत्य कुणीही नाकारु शकत नाही.

भावश्या.

महेश हतोळकर's picture

13 Jul 2010 - 3:44 pm | महेश हतोळकर

मी नाकारतो!
डोकं/पाय/हात म्हणजे पूर्ण माणूस नव्हे.

विटेकर's picture

13 Jul 2010 - 4:27 pm | विटेकर

'हिंन्दुत्व म्हणजे ब्राह्मणत्व' ...असल्या तद्दन भंपक विधानावर काय प्रतिक्रीया द्यावी... उगाच फुकाचे बाइट वाया घालवणे !

- विटेकर

आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!

मृगनयनी's picture

13 Jul 2010 - 4:39 pm | मृगनयनी

'हिंन्दुत्व म्हणजे ब्राह्मणत्व' हे सत्य कुणीही नाकारु शकत नाही.

@) @) @) @) @) @) @)

भावश्या...

अरे बापरे!! केवढी ही वैचारिक दिवाळखोरी!!!! :-? :-? :-?

वैचारिक दारिद्र्याची सीमा पार करून रसातळ गाठलं!!!!!!!! =))

_________

तुम्हीदेखील त्या दुर्जनांच्याच ओळीत बसलेले वाटता.... मुक्तीची वाट बघत!!!!! :SS :|

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

प्रशु's picture

13 Jul 2010 - 4:49 pm | प्रशु

मी ब्राम्हण नाही पण हिंदु आहे, आता बोला....

'मी हिंदु झालो' हे पुस्तक वाचा आणि नेमाडेंना पण द्या...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Jul 2010 - 5:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

'मी हिंदु झालो' हे एक चांगलं पुस्तक आहे. मला वेळ होईपर्यंत इतर कोणी न लिहील्यास या पुस्तकाबद्दल लिहीण्याचा विचार आहे.

अदिती

प्रशु's picture

13 Jul 2010 - 6:24 pm | प्रशु

जरुर लिहा...

Dhananjay Borgaonkar's picture

13 Jul 2010 - 4:54 pm | Dhananjay Borgaonkar

हे पुस्तक प्रकशित होणार याचा गाजावाजा एक महिन्यापुर्वीच्या लोकसत्तेत आला होता. काही लेखांश सुद्धा होता.
बरीच वर्ष हे पुस्तक प्रकाशित झाल नव्ह्त अस लिहिलेल.
आत कळतय कोणताच प्रकाशक तयार झाला नसेल :P
बाकी यांनी कलेचे जे काही तारे तोडले आहेत यावरुन किव येते नेमाड्यांची.

शुचि's picture

13 Jul 2010 - 5:56 pm | शुचि

"व्यभिचारी", "सामान्य" आणि "ड्रायव्हर"

यापैकी कृष्णाला व्यभिचारी म्हणू शकत नाही कारण त्या काळी जे नियम होते त्या नियमांत बसेल असं वर्तन त्याचं असावं. आताच्या निकषांवर तेव्हाचं वर्तन पडताळून पहाता येत नाही.

सामान्य का बरं? इतकी मुत्सद्दी, हुषार, राजकारणी व्यक्ती सामान्य कशी ठरू शकते?

ड्रायव्हर? जरूर अतिशय उत्तम सारथी तो जरूर होता.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

हे कोण आहे ?
कोण बी उठून काय बी लिहतंय .

पाषाणभेद's picture

13 Jul 2010 - 6:46 pm | पाषाणभेद

कोसलाकार म्हणून उदाहरणार्थ नेमाडेंचा आदर होता पण आता हे सगळे वाचून फक्त कोसलाकार नेमाडे म्हणूनच आदर राहील. उगाचच उदाहरणार्थ अकलेचे तारे तोडणे म्हणजे संशोधन नव्हे. हे बाकी मस्तच. इतिहातकालीन कादंबरी लिहीणे अन इतिहास लिहीणे वेगळे. फारच भंकस. त्यात त्यांनी जे काही उदाहरणार्थ म्हटले आहे ते "पुराव्यानिशी शाबीत" केले आहे काय?

मी जे पेप्रात वाचलेय त्यानुसार एक नायक असतो तो टाईममशीन प्रमाणे मागे पुढच्या कालखंडात वावरतो. मोहंजोदारो ला भेट देतो. असे काहीतरी आहे. त्याचे स्वातंत्र घेवून कादंबरी (हो कादंबरीच) लिहीली आहे. त्यास तितकेच अन तेवढेच महत्व राहू देणे. उगाचच इतिहास संशोधन वैगेरे नावे दिलेली पटत नाहीत.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

स्वप्निल..'s picture

13 Jul 2010 - 7:03 pm | स्वप्निल..

मार्केटींग स्ट्रॅटेजी !!

अडगळ's picture

13 Jul 2010 - 7:58 pm | अडगळ

हल्ली तरुण भारत सनातन प्रभात मधनं बातम्या मारतंय वाटतं.

तिमा's picture

13 Jul 2010 - 8:47 pm | तिमा

त्येंच्यावर संभाजी ब्रिगेड, मनसे, शिवसेना, पतितपावन संघटना, याना छू करा.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

अडगळ's picture

13 Jul 2010 - 8:50 pm | अडगळ

आवो व्हय की . पन पावबटर दिसल्याबिगार ती जागची हालत बी न्हाइत

आण्णा चिंबोरी's picture

13 Jul 2010 - 9:07 pm | आण्णा चिंबोरी

कोण सच्चिदाणंद शेवडे? धण्यवाद.

पंगा's picture

13 Jul 2010 - 9:12 pm | पंगा

कृष्ण हा व्यभिचारी होता आणि तो सामान्य `ड्रायव्हर' होता

वाक्य मूळ मुलाखतीच्या संदर्भात अजून वाचलेले नाही. यथावकाश वाचेन. परंतु हे उद्धृतीकरण जर योग्य असेल, तर एक शंका अजून विचारावीशी वाटते.

कृष्णाच्या वैयक्तिक चारित्र्याबद्दल मला फारशी कल्पना नसल्यामुळे तो 'व्यभिचारी' वगैरे असण्याबाबत कोणत्याही बाजूने चर्चा करू इच्छीत नाही. (तशा गोकुळातील स्त्रियांबरोबरच्या त्याच्या वर्तनाबद्दलच्या काही किंवदंता लोककथांतून, तसेच लावण्यांतूनसुद्धा, कानावर आलेल्या आहेत. परंतु त्या मी व्यक्तिशः पडताळून पाहिलेल्या नाहीत, किंवा कृष्णाने किंवा संबंधित स्त्रियांनीही त्याबद्दल मला येऊन काही सांगितलेले नाही. त्यामुळे, नो कमेंट्स.) त्यामुळे तो मुद्दा सोडून देऊ.

मात्र, 'तो एक सामान्य ड्रायव्हर होता' या वाक्यातील (मला जो जाणवला तो) condescending (मराठी? 'खाली पाहण्याचा'?) सूर खटकला. एखादी व्यक्ती 'ड्रायव्हर' आहे, म्हणजे ती आपोआपच 'सामान्य' (ज्या पद्धतीने हा शब्द वापरलेला आहे, त्यावरून हे 'यःकश्चित' किंवा 'फालतू'करिता euphemism आहे, असे वाटले.) आहे, थोडक्यात 'दखल घेण्याच्या लायकीचा नाही', हा निष्कर्ष कसा निघू शकतो, हे कळले नाही.

ज्या तथाकथित 'ब्राह्मण्य', 'ब्राह्मणी वृत्ती'च्या नावाने आजतागायत खडे फोडले जातत, खुद्द नेमाड्यांनी फोडले आहेत असे कळते (मी नेमाड्यांचे काहीच वाचलेले किंवा ऐकलेले नसल्यामुळे प्रत्यक्ष पडताळून पाहिलेले नाही.), त्याहून हे नेमके वेगळे कसे?

(नेमाडॅ गाडी आणि ड्रायव्हर बाळगून आहेत की नाही, याची कल्पना नाही, परंतु बाळगत असल्यास) नेमाड्यांच्या आपल्या ड्रायव्हरबद्दलच्या (आणि गाडी-ड्रायव्हर बाळगून असोत-नसोत, एकंदरीतच "ड्रायव्हर" या व्यक्तिविशेषाबद्दलच्या) नेमक्या भावना जाणून घेता आल्यास ते रोचक ठरावे.

- पंडित गागाभट्ट.

आण्णा चिंबोरी's picture

13 Jul 2010 - 9:18 pm | आण्णा चिंबोरी

ती मुलाखत पाहण्याचा योग आलेला नसला तरी 'कृष्ण हा सामान्य ड्रायव्हर होता' या वाक्याचा अर्थ कृष्णाचे ड्रायविंग स्किल हे लिमिटेड होते असा होतो. थोडक्यात या वाक्यातून कृष्णाच्या ड्रायविंग स्किलबद्दल टिप्पणी असून, ड्रायविंग या व्यवसायाबाबतची टिप्पणी नाही हे लक्षात घ्यावे. त्यामुळे ड्रायविंग हा सामान्य व्यवसाय आहे हे यातून ध्वनित होत नाही असे वाटते.

पंगा's picture

13 Jul 2010 - 9:33 pm | पंगा

'कृष्णाचे ड्रायविंग स्किल हे लिमिटेड होते' असे सूचित करण्यासाठी 'कृष्ण हा एक सामान्य 'ड्रायवर' होता' या वाक्यातील 'ड्रायवर' हा शब्द सामान्यतः अवतरणांत दिला जात नाही. तसा तो दिल्यास त्यातून वेगळ अर्थ सूचित होतो, असे सूचित करावेसे वाटते.

त्यामुळे ही अवतरणे मूळ मुलाखतीतील*, की मुलाखतकाराच्या पदरची, की मुलाखत येथे (किंवा अन्यत्र) उद्धृत करणार्‍याची ती करामत आहे, या प्रश्नास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते.

याची निश्चिती करण्याकरिता मूळ मुलाखत वाचावी लागेल आणि या विधानाच्या आग्यापीछ्याचा धांडोळा घ्यावा लागेल. 'कृष्णाचे ड्रायविंग स्किल हे लिमिटेड होते' अशा अर्थाने हे विधान केलेले असल्यास त्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ कोणते दाखले दिले आहेत (किंवा नाहीत), हेही तपासावे लागेल.

(*'मूळ बोली मुलाखतीत अवतरणे कशी देता येतील' या पुढील शंकेची आगाऊ अपेक्षा करून असे उत्तर द्यावेसे वाटते, की बोली मुलाखतीत अर्थातच अवतरणे येऊ शकत नाहीत. परंतु अशी मुलाखत लेखीत उतरवताना, आवाजातील चढउतारावरून, तसेच मुलाखतीतील मागल्यापुढल्या संदर्भांवरून, त्या शब्दांचा नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे याचे निदान निश्चितच करता यावे, आणि त्यावरून तेथे अवतरणे देणे अपेक्षित किंवा योग्य आहे की नाही, याचा निर्णय करता यावा. धन्यवाद.)

- पंडित गागाभट्ट.

सदर विषयांवरील चर्चा मिपावर वर्जित आहे. मिपाच्या नव्या अधिकारिक धोरणातही त्याबाबत काही वाचनात आले नाही. त्यामुळे सदस्यत्त्व शाबूत ठेवण्यासाठी या विषयावर यापेक्षा जास्त काही लिहीत नाही.

आण्णा चिंबोरी's picture

13 Jul 2010 - 9:42 pm | आण्णा चिंबोरी

थोडक्यात, नव्या करारात काही भाष्य नसल्याने इथे जुना करार लागू व्हावा असे वाटते.

>>अर्थ कृष्णाचे ड्रायविंग स्किल हे लिमिटेड होत>>>>
तर काय मधीच गाडी सोडून गीता बीता सांगत बसायचा.मागं १०-१२ अक्षौहिणी ट्रॉपीक जाम.
वर एकदा भीष्माच्या अंगावर चक्र घेवुन गेला होता, रथ सोडुन .त्यावेळी रथ नो पार्कींग मध्ये होता.

आण्णा चिंबोरी's picture

13 Jul 2010 - 9:38 pm | आण्णा चिंबोरी

चाक काढलं तवा ज्याक बी लावला नव्हता. रथ पलटी घोडे फरार व्हायची कंडिशन आलती.

आण्णा चिंबोरी's picture

13 Jul 2010 - 9:36 pm | आण्णा चिंबोरी

ब्राह्मण्य किंवा ब्राह्मणी वृत्तीचा जो अधिक्षेप आंबेडकर, फुले, तुकाराम किंवा नेमाडे यांनी केला आहे तो जन्माधिष्ठित वर्णश्रेष्ठता किंवा उच्चनीचतेच्या कल्पनांवर आधारित आहे. जर कृष्ण जन्माने डायवर असता आणि नेमाड्यांनी त्यावर टीका केली असती तर इथे शंका घेण्यास वाव होता. मात्र कृष्ण हा जन्माने (ग्रामपंचायतीचे दाखल्यानुसार) गवळी होता आणि नेमाड्यांनी 'सामान्य गवळी' अशी टीका त्यावर केली नसल्याने नेमाडे नेहमीप्रमाणे आरोपांतून बा-इज्जत मुक्त होत आहेत असे वाटते.

कोणत्याही समाजात कौशल्याची उतरंड असणारच आणि त्यामध्ये एखाद्याच्या क्षमतेनुसार - जन्मानुसार नव्हे - योग्य ते स्थान मिळते तेव्हा उतरंडीतील वरील घटकांनी खालच्या घटकांना त्यांची पायरी दाखवून देणे योग्यच व्हावे.

थोडक्यात, कृष्णाचा पगार किती, पण तो बोलला केवढे हे नेमाड्यांना सांगायचे असावे.

पंगा's picture

13 Jul 2010 - 9:58 pm | पंगा

थोडक्यात, कृष्णाचा पगार किती, पण तो बोलला केवढे हे नेमाड्यांना सांगायचे असावे.

कृष्ण हा 'ड्रायवर' होता, सबब त्याचे वेतन जेमतेमच असणार, आणि एका विशिष्ट प्राप्तिमर्यादेखालील लोकांवर बोलण्यास बंदी असावी, या गृहीतकसंचाबद्दल आक्षेप आहे.

अशी बंधने ही लोकशाहीच्या आदर्शांविरुद्ध जातात. 'एक व्यक्ती, एक मत' (किंवा 'प्रत्येकास एकएक (तरी) असते') या तत्त्वाचे अशी गृहीतके उल्लंघन करतात.

'कृष्णाच्या काळी भारतवर्षात लोकशाही होती का' या प्रश्नास यामुळे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. (पर्यायाने, 'महाभारतकालीन ड्रायवरांची वेतनश्रेणी काय होती?' किंवा 'ड्रायवरांची वेतनमर्यादा किती असावी असे तत्कालीन धर्मशास्त्राचे मत होते? मनुस्मृतीत (तोपर्यंत अस्तित्वात आलेली असल्यास - किंवा नसल्यास त्या काळी बहुजनांस नाडण्याच्या एकमेव उद्देशाने जो कुठला दुसरा धर्मग्रंथ कार्यरत होता, त्या ग्रंथात) याबद्दल नेमके काय विचार मांडलेले आहेत?')

- पंडित गागाभट्ट.

पाषाणभेद's picture

14 Jul 2010 - 5:01 am | पाषाणभेद

मोठा उद्योगपती समजा त्याच्या कुटूंबासोबत फिरायला गेला अन तो स्व:ता गाडी चालवत असेल तर तो डायवर ठरतो का? तेच कृष्णाने केले. तुम्ही जर गाडी चालवत ऑफीसात गेले तर तुम्ही डायवर असता का?
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

तिमा's picture

14 Jul 2010 - 7:52 pm | तिमा

म्या रिटायर झालोय,आम्च्या फ्यामिलीचा मीच डायवर हाये सध्ध्या!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

अविनाशकुलकर्णी's picture

14 Jul 2010 - 8:39 pm | अविनाशकुलकर्णी

'कृष्ण हा सामान्य ड्रायव्हर होता
तो श्री नेमादे यांच्या कडे काम करीत होता

अर्धवटराव's picture

14 Jul 2010 - 9:58 pm | अर्धवटराव

हे नेमाडे प्रकरण काय आहे मला माहित नाहि. पण एक गोष्ट राहुन राहुन खटकते... आपलेच दात आपल्याच ओठांना का चावताहेत ?? भारत स्वतंत्र होउन ६० + वर्षे झालित. आपल्या हाति सत्ता आलि. पण अजुनहि मूळ समस्या तिच. आपल्याच धर्मबांधवांमध्ये हा बेबनाव का?? किंबहुना इतर धर्मबांधवांशी देखिल वैर का ? अखील भारतीय स्तरावर ज्या समस्या आहेत, त्या धर्म, जात, प्रदेश न विचारता सर्वांना समान त्रास देताहेत. हे ढळ्ढळीत सत्य सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसत असताना तिकडे अक्षम्य डोळेझाक का होतेय ? कृष्ण ड्रायव्हर होता कि राम विष्णूअवतार होता, शिवाजीचा गुरू कोण होता, फुल्यांचा ब्राह्मण्द्वेष किती ग्राह्य आहे, आर्य बाहेरुन आले कि तेच मूळ भारतीय होते... हे ज्याचे त्याचे संशोधन त्याने करावे... कोणाला पटत नसेल तर त्याने मुद्दे खोडुन काढावेत... आणि दोघांनी मिळून शेती-संगणक-कारखाने चालवावेत. द्वेष, नींदा, राग डोक्यात घालुन आपण आपलाच वेळ आणि शक्ती वाया घालवतोय... सामाजीक शांती बिघडवुन कोणिच सुखी होणार नाहि हि साधी कॉमनसेन्सची गोष्ट का लक्षात येत नाहि आपल्या ?? (कि हेच उत्तर आहे या प्रश्नाच ?? कॉमन सेन्स इज नॉट दॅट कॉमन...)

(सचींत) अर्धवटराव
-रेडि टु थिंक

कवितानागेश's picture

15 Jul 2010 - 10:39 am | कवितानागेश

हे सगळे 'काळे इंग्रज' आहेत,
आपापसात भांडणे लावून सत्ता गाजवणारे.
इतिहास काहिही असो, अत्ता या क्षणी 'आपण सगळे भारतीय आहोत' , ही भावना हर्वून गेली आहे.
सगळे राज्कारणी सतत जातीचे/ धर्माचे राजकारण करतात आणी आपण 'सामान्य' असल्यामुळे बळी पडतो!
लेखकांचे नुसतेच लेखक होउन भागत नाही, त्यान 'विचार्वंत. संशोधक' वगरै व्हायचे असते, मिडीयावाल्याना सन्सनाटी हवी असते, राज्कारण्याना मसिहा व्हायाचे असते,
...आपण त्यान्च्या सर्व इच्छा भांडून भांडून पूर्ण करतो!
आता ही कुरापत काढण्यामागचा नेमाड्यांचा उद्देश अजून तरी कळला नाही.
============
माउ

उल्हास's picture

15 Jul 2010 - 9:49 am | उल्हास

????

चित्रगुप्त's picture

26 Aug 2011 - 1:45 pm | चित्रगुप्त

भालचंद्र नेमाडेंची कोसला, बिढार, जरीला, झूल ही पुस्तके वेगवेगळ्या वयात अनेकदा वाचली, दर वेळी आवडली.
टीकास्वयंवरही आवडले.
येणार येणार म्हणून अनेक वर्षे गाजत असलेली 'हिंदु' - जगण्याची समृद्ध अडगळ - प्रसिद्ध झाल्याचे समजले, पण दिल्लीत रहात असल्याने मिळण्याची शक्यता नव्हती. पण अचानक दिसले, घेतले आणि पाच-सात दिवसात सलगपणे वाचून काढले.

का कुणास ठाऊक, पहिली पन्नासेक पाने जरा कंटाळवाणी वाटली, पण नंतर मात्र अगदी अखंड आवडले.
'एक समृद्ध अडगळ' यातील 'समृद्ध' कडे दुर्लक्ष करून 'अडगळ' वरच या धाग्यात रोख का, हे समजले नाही.

समग्र ग्रंथ पाहिल्याविण (वाचल्याविण)
उगाच ठेवी जो दूषण
मनुष्य नव्हे पाषाण
मनुष्यवेषे ... असं समर्थ सांगून गेलेत.

थोडक्यात, आधी स्वतः पूर्ण वाचावे, मग बरे वाईट काय ते बोलावे, हे बरे. वाचल्यावर आवडावे अथवा नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मामला.

अर्धवटराव's picture

27 Aug 2011 - 1:20 am | अर्धवटराव

.

अर्धवटराव