सरंगे
आणि, ह्या तळलेल्या तुकड्या.
सरंग्याचा रस्सा (कालवण)
सरंग्याच्या तुकड्या ५-६
लसूण ठेचुन ४-५ पाकळ्या
हिंग, हळद
२ चमचे मसाला
चिंचेचा कोळ
मिठ चवीनुसार
तेल
वाटण : पाव वाटी ओल खोबर, ५-६ लसुण पाकळ्या, अर्धा इंच आले, १ ते २ मिरच्या, थोडी कोथिंबीर.
कृती :
तेलावर लसुण फोडणीला टाकावा. हिंग, हळद, मसाला, वाटण, तुकड्या, चिंचेचा कोळ, मिठ घालून उकळी येउ द्यावी. उकली आल्यावर ४-५ मिनीटे शिजवुण गॅस बंद करावा.
सरंगा फ्राय
सरंग्याच्या तुकड्या ५-६
लसूण ठेचुन ४-५ पाकळ्या
हिंग, हळद
२ चमचे मसाला
मिठ चवीनुसार
तेल
कृती :
तुकड्यांना हिंग, हळद, मिठ, मसाला लावुन थोडा वेळ मॅरीनेट करावे. मग तवा तापल्यावर त्यात तेल सोडून लसूण पाकळ्या टाकाव्यात म्हणजे तुकड्यांना खमंग वास येतो. मग तुकड्या शॅलो फ्राय कराव्यात.
टिपा :
वाटणात खोबर नाही घातल तरी रस्सा चांगला होतो.
तुकड्या फ्राय करण्यापुर्वी मॅरीनेट करण्यासाठी आल, लसुण ची पेस्ट, लिंबू रस ही लावतात. पण तसे केल्यावर तुकड्या चिकटतात मग त्याला थोडा रवा लावला की चिकटत नाहीत.
प्रतिक्रिया
23 Jun 2010 - 2:57 pm | शानबा५१२
हा मासा दीसायला सेम हलवा माश्यासारखा दीसतो,फक्त रंगात फरक.पण ह्या माश्याला तेवढी चव नसते अस एकदा खाल्ल तेव्हा समजल.
इथे मला त्या माश्याला हलव्याप्रमाणे चव नसते अस बोलायच आहे.आहे का कोणी सहमत?
___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे
23 Jun 2010 - 3:00 pm | जागु
फोटो अपलोड करायला मदत करा प्लिज.
23 Jun 2010 - 3:05 pm | विसोबा खेचर
व्वा!
23 Jun 2010 - 3:08 pm | इंटरनेटस्नेही
वा... स्ल्पेन्डीड!
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
23 Jun 2010 - 3:26 pm | स्मिता_१३
जागु ताई,
पहील्या फोटोतील मासा हा (कापरी) पापलेट सारखा दिसत आहे. कापरी पापलेट म्हणजेच सरन्गा का?
प्लीज सान्गाल का ?
बाकी रेसिपी नेहमी प्रमाणेच सुन्दर !
अवान्तर : हा अनुस्वार कसा द्यायचा ? :S
स्मिता
23 Jun 2010 - 3:53 pm | बिपिन कार्यकर्ते
अवांतर = avaaMtar
बिपिन कार्यकर्ते
24 Jun 2010 - 6:49 am | स्मिता_१३
स्मिता
23 Jun 2010 - 3:42 pm | सहज
वाह!
23 Jun 2010 - 4:24 pm | गणपा
हे खापरी पापलेट (सरंगे) साध्या पापलेट पेक्षा जास्त चवदार असतात.
गेल्या भेटीत ५००-६०० रु जोडी होती.
इथे मिळत नाय वो :''(
सरंगा तेरी याद में.... :( -गणा
24 Jun 2010 - 10:55 am | वेताळ
सरंगा खुप कमी किंमतीला मिळतो. सर्व साधारण २५० ला किलो मिळतो.
खाली एका प्रतिसादात मसाला विचारला आहे तो बहुधा मालवणी मसाला असावा.
त्यापेक्षा लसुण,आले,थोडा कांदा व मिरची ह्याची पेस्ट व त्यात लिंबु पिळुन माश्याच्या तुकड्याला लावावे. एक/दीड तास ते मुरु द्यावे. नंतर रवा व लाल मिरची पावडर एकत्र करुनमिक्सरला बारीक करुन घ्यावी. व त्यात माशाचा तुकडा घोळवुन घ्यावा. काही ठिकाणी रवा व लाल मिरची पावडर मध्ये अंडे घालतात.त्यामुळे रवा माश्याचा पीस ला व्यवस्थित चिकटतो व चव देखिल चांगली लागते.अर्थात तळल्यानंतर.
वेताळ
23 Jun 2010 - 6:56 pm | प्रभो
मस्त!!
24 Jun 2010 - 4:59 am | सुनील
छान!
२ चमचे मसाला
कोणता मसाला ते स्पष्ट होत नाही. गरम मसाला समजावा काय?
थोडा रवा लावला की चिकटत नाहीत
खरे. तांदळाचे पीठदेखिल चालेल. पण त्यामुळे तुकडे तेलकट होतात.
Doing what you like is freedom. Liking what you do is
happiness.
24 Jun 2010 - 11:41 am | जागु
शानबा, विसोबा, इंटरनेट्प्रेमी, स्मिता, बिपिन सहज, गणपा, वेताळ, प्रभो धन्यवाद.
स्मिता पापलेट चकचकीत असते. सरंगा थोडा राखाडी कलरचा असतो. हलवा काळपट असतो.
सुनिल मसाला म्हणजे जो सण्डेमिक्स वगैरे जो रोज जेवणात लाल मसाला वापरतो तो.
24 Jun 2010 - 2:00 pm | विसोबा खेचर
गोव्या-म्हापश्यातली काही मंडळी हलव्याला 'काळा पापलेट' असं म्हणतात! :)
(कोकणातला) तात्या देवगडकर.
24 Jun 2010 - 2:18 pm | स्मिता_१३
स्मिता
28 Jun 2010 - 6:25 am | शुचि
फोटो अप्रतिम..... खरपूस तळले गेलेत ..
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||