मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मासे - सरंगा (कालवण, फ्राय)

जागु · · पाककृती
सरंगे Image removed. आणि, ह्या तळलेल्या तुकड्या. Image removed. सरंग्याचा रस्सा (कालवण) सरंग्याच्या तुकड्या ५-६ लसूण ठेचुन ४-५ पाकळ्या हिंग, हळद २ चमचे मसाला चिंचेचा कोळ मिठ चवीनुसार तेल वाटण : पाव वाटी ओल खोबर, ५-६ लसुण पाकळ्या, अर्धा इंच आले, १ ते २ मिरच्या, थोडी कोथिंबीर. कृती : तेलावर लसुण फोडणीला टाकावा. हिंग, हळद, मसाला, वाटण, तुकड्या, चिंचेचा कोळ, मिठ घालून उकळी येउ द्यावी. उकली आल्यावर ४-५ मिनीटे शिजवुण गॅस बंद करावा. सरंगा फ्राय सरंग्याच्या तुकड्या ५-६ लसूण ठेचुन ४-५ पाकळ्या हिंग, हळद २ चमचे मसाला मिठ चवीनुसार तेल कृती : तुकड्यांना हिंग, हळद, मिठ, मसाला लावुन थोडा वेळ मॅरीनेट करावे. मग तवा तापल्यावर त्यात तेल सोडून लसूण पाकळ्या टाकाव्यात म्हणजे तुकड्यांना खमंग वास येतो. मग तुकड्या शॅलो फ्राय कराव्यात. टिपा : वाटणात खोबर नाही घातल तरी रस्सा चांगला होतो. तुकड्या फ्राय करण्यापुर्वी मॅरीनेट करण्यासाठी आल, लसुण ची पेस्ट, लिंबू रस ही लावतात. पण तसे केल्यावर तुकड्या चिकटतात मग त्याला थोडा रवा लावला की चिकटत नाहीत.

वाचन 13582 प्रतिक्रिया 0