चिवनी ही मच्छी सुरवातीचा जोरदार पाउस पडून जेंव्हा पाणी वाहू लागत तेंव्हा येतात. ही चिवनी ह्या दिवसात गबोळीने भरलेली असतात. उधाण आल्यावर अंडी घालण्यासाठि ही वर आलेली असतात. म्हणुन ह्यांना उधवणीची चिवनी म्हणतात. ही समुद्रातुन वाहत खाडीत, विर्यात शेतात जातात. ह्या दिवसात हे चिवने पकडण्यासाठी सगळे मच्छीप्रेमी आसु घेऊन जागोजागी दिसतात.
चिवनी साफ करण्यासाठी राखाडी घ्यावी लागते. ती नसेल तर तांदळाचे पीठ थोडे थोडे बोटांना लावुन साफ करावी लागतात. कारण ती बुळबूळीत असतात. हातात घेतल्यावर हातातुन सटकतात. ह्यांच्या पाठीवर एक टणक काटा आसतो तो राखाडी हातात घेउन मोडतात.
मला हा काटा वगैरे काढता येत नाही म्हणून मी त्या काट्याच्या जवळून डोकच काढुन टाकते. डोक्याच्या जवळच हा काटा असतो. मच्याकडे कोणी जास्त डोकी खात नाहीत मच्छीची. त्यामुळे साफ करायलाही सोप पडतात.
ह्यातील गाबोळी खाण्यासाठी ही मच्छी लोकप्रिय आहे.
ही आहेत चिवनी
http://farm5.static.flickr.com/4018/4711433910_ee8704ff41.jpg
ही साफ केलेली चिवनी
http://www.flickr.com/photos/bebali/4711436698/
हे आहे चिवनीचे कालवण
http://www.flickr.com/photos/bebali/4711438070/
साहित्य :
फोडणी - १ गड्डा लसूण पाकळ्या ठेचुन, हिंग, हळद, मसाला २ चमचे.
लिंबा एवढ्या चिंचेचा कोळ
चवीपुरते मिठ
१ हिरवी मिरची
थोडी चिरलेली कोथिंबीर.
पाककृती:
भांड्यात तेलावर वरील फोडणी टाकुन चिवनी व चिंचेचा कोळ टाकावा. थोडे पाणी घालावे. मिठ घालावे व चिरलेली कोथिंबीर घालुन मिरची मोडून घालावी. उकळी आली की ३-४ मिनीटे शिजवुन गॅस बंद करावा.
प्रतिक्रिया
18 Jun 2010 - 2:05 pm | जागु
फोटो का अपलोड होत नाहीत ? कुणाला येत असतील तर प्लिज करा.
18 Jun 2010 - 2:21 pm | अविनाशकुलकर्णी
ही आहेत चिवनी

=================================


ही साफ केलेली चिवनी
=================================
हे आहे चिवनीचे कालवण
18 Jun 2010 - 2:27 pm | चिरोटा
सही. गाभोळी तळून पण्(कढी+भात) चांगली लागते.
P = NP
18 Jun 2010 - 2:28 pm | गणपा
आरे आधी त्या पावसाळी भाज्या आणि आता हे मासे.
ठार मेलो......................
18 Jun 2010 - 2:33 pm | स्मिता_१३
सहमत !! =P~ =P~ =P~
स्मिता
18 Jun 2010 - 8:09 pm | शुचि
=)) =)) =))
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
18 Jun 2010 - 2:33 pm | इरसाल
हे शिंगटे तर नाहीत ना ?
18 Jun 2010 - 2:48 pm | गणपा
एक शंका : शिंगाडा म्हणतात तो मासा पण असाच बु़ळबुळीत आणि वर एक टणक काटा असलेला असतो. ही चिवनी म्हणजेच शिंगाडा का?
18 Jun 2010 - 3:07 pm | आंबोळी
जागुराव,
तुम्ही आणि गणपा अगदी अंत बघताय आमचा आज.
एक काम करा दोघेजण ठरवून एका दिवशी एकच पाकृ टाकत चला.... दोघे एकदम टाकू नका....
आंबोळी
18 Jun 2010 - 3:56 pm | सहज
कालवण मस्तच!!!
बाकी अंड्याची सॅक एखादी बरी नंतर तशी किंचीत कडवटच लागते ना?
18 Jun 2010 - 4:01 pm | गणपा
नाही हो सहजराव गाभोळी एनी टाईम क्लासच लागते. (तळलेली असेल तर खासच).
ती नीट साफ करावी लागते. त्या गाभोळीच्या आसपास एक काळा पडदा असतो तो काढुन टाकायचा. त्या पडद्यामुळे कडवटपणा जाणवतो :)
बाकी अस्सल खवय्ये सांगतीलच.
18 Jun 2010 - 4:37 pm | जागु
भेण्डीबाजार, गणपा, स्मिता, इरसाल, आंबोळी, सहज धन्यवाद.
इरसाल, गणपा, जसे गाव तसे नाव पण बदलते. त्याप्रमाणे ह्यांना शिंगटे किंवा शिंगाडा म्हणतात की नाही ते मलाही माहीत नाही. आमच्याइथे ह्यांना चिवनीच म्हणतात.
आबोंळी जागुराव नाही जागुताई.
सहज माश्याचे पोट साफ केले की नाही कडवट लागत.
18 Jun 2010 - 6:34 pm | प्रियाली
वरच्या कालवणाला आमच्या इथे ;) आंबट-तिखट असे म्हणतात. बोंबलाचे आंबट-तिखट हा माझा जीव की प्राण. ;)
* आमच्या इथे म्हणजे वसई-विरार-अर्नाळा भाग. तुमचे "आमच्या इथे" नेमके कुठे आहे?
18 Jun 2010 - 6:57 pm | रामदास
पावसाळ्याच्या या सुरुवातीच्या काळाला वलगण म्हणतात.हे मासे वलगणीचे मासे .गाबुळी साठी खास जाळी घेऊन ही मासळी पकडली जायची. वलगण संपली की चिंबोर्यांच्या मागे लागायचं.
तोपर्यंत श्रावण आला म्हणून आधी गटारी अमावस्येला अंगठा चेपून जे मिळेल ते खायचं .
आठ दिवसानी आपल्याला नाही जमत बॉ श्रावण पाळायला अशी कबुली देऊन परत खायला सुरुवात.!!!!
या काळाच्या अगोदरचा काळ म्हणजे आगोटीचा .या वेळी पावसाळ्याची तयारी केली जायची.या तयारीत म्हत्वाची म्हणजे सुक्या मासळीची बेगमी करून ठेवायची. लावणीच्या वेळी गडी माणसांना जेवण द्यायचे असायचे म्हणून खास तयारी.शहापूर्च्या जवळ कुठेतरी सुक्या मासळीचा घाऊक बाजार असायचा एव्हढं आठवतं आहे.
18 Jun 2010 - 7:04 pm | गणपा
काका कसली आठवण काढलीत हो.
आवणीच्या (लावणीच्या)वेळी हमखास सुक्या माश्यांच जेवण असायच.
गेला बाजार चुलीत भाजलेला सुकाबोंबील किंवा केळीच्या पानात बांधुन चुलीत भाजलेल खार तोंडी लावायला असायचच आसायच :)
18 Jun 2010 - 7:55 pm | शुचि
ती गाभोळी काय सुरेख दिसतेय . मस्त!!!
आम्ही बगड (माशाचं डोकं) करतो. खूपच, फारच, अतिच, भयंकरच चविष्ट लागतं.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
18 Jun 2010 - 8:06 pm | शानबा५१२
विचारल्याशिवाय राहवत नाही म्हणुन लिहतोय...
ज्या एका बोटा एवढी सरासरी लांबी असलेल्या सुकवलेल्या माश्याला चिवणी बोलतात तो तर ह्या माश्यासारखा नसतो!
Botany मधे family बोलतात तसल्या एकाच family चे आहेत की काय?
18 Jun 2010 - 9:39 pm | jaypal
फोटोतील रंगावरुन हे रेड मिट म्हणता येइल का ?
फाअयनल कालवण खल्लास जमलय . काय रंग आलाय हो रश्याला जबरदस्त
=P~ =P~ =P~ =D> =D> =D>
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
18 Jun 2010 - 9:45 pm | प्रभो
मासे व्हाईट मीट मधे येतात रे दाद्या....
18 Jun 2010 - 9:55 pm | jaypal
लालेलाल रक्त दिसत आहे म्हणुन विचारल.
पापलेट बोंबिल ई. माश्यात अस आणि येवढ लाल रक्त दिसत नाही.
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
18 Jun 2010 - 9:58 pm | शुचि
माशाचा कल्ला उचलून लाल रंग बघून मासा घ्यावा. ताजा असतो.
मटण मात्र गुलाबी घ्यावं.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
19 Jun 2010 - 11:01 am | जागु
जयपाल, वरील फोटोतिल मासे ताजे आहेत. आणि त्यांचे बाजुचे पर लाल असतात. ह्याचा रंग साधारण गोल्डन असतो. त्यामुळे ते लाल दिसतात.
शुची तुमची टिप बरोबर आहे. तसेच बघतात ताजे मासे.
शानबा आमच्याइथे ह्याला चिवनीच म्हणतात. कदाचीत तुमच्याइथे ही सुकवुन ठेवत असतील. आणी सुकवल्यावर ती आळुन छोटी होणारच.