उधवणीची चिवनी (पावसाळ्यातील मच्छी)
चिवनी ही मच्छी सुरवातीचा जोरदार पाउस पडून जेंव्हा पाणी वाहू लागत तेंव्हा येतात. ही चिवनी ह्या दिवसात गबोळीने भरलेली असतात. उधाण आल्यावर अंडी घालण्यासाठि ही वर आलेली असतात. म्हणुन ह्यांना उधवणीची चिवनी म्हणतात. ही समुद्रातुन वाहत खाडीत, विर्यात शेतात जातात. ह्या दिवसात हे चिवने पकडण्यासाठी सगळे मच्छीप्रेमी आसु घेऊन जागोजागी दिसतात.
चिवनी साफ करण्यासाठी राखाडी घ्यावी लागते. ती नसेल तर तांदळाचे पीठ थोडे थोडे बोटांना लावुन साफ करावी लागतात. कारण ती बुळबूळीत असतात. हातात घेतल्यावर हातातुन सटकतात. ह्यांच्या पाठीवर एक टणक काटा आसतो तो राखाडी हातात घेउन मोडतात.
मला हा काटा वगैरे काढता येत नाही म्हणून मी त्या काट्याच्या जवळून डोकच काढुन टाकते. डोक्याच्या जवळच हा काटा असतो. मच्याकडे कोणी जास्त डोकी खात नाहीत मच्छीची. त्यामुळे साफ करायलाही सोप पडतात.
ह्यातील गाबोळी खाण्यासाठी ही मच्छी लोकप्रिय आहे.
ही आहेत चिवनी
http://farm5.static.flickr.com/4018/4711433910_ee8704ff41.jpg
ही साफ केलेली चिवनी
http://www.flickr.com/photos/bebali/4711436698/
हे आहे चिवनीचे कालवण
http://www.flickr.com/photos/bebali/4711438070/
साहित्य :
फोडणी - १ गड्डा लसूण पाकळ्या ठेचुन, हिंग, हळद, मसाला २ चमचे.
लिंबा एवढ्या चिंचेचा कोळ
चवीपुरते मिठ
१ हिरवी मिरची
थोडी चिरलेली कोथिंबीर.
पाककृती:
भांड्यात तेलावर वरील फोडणी टाकुन चिवनी व चिंचेचा कोळ टाकावा. थोडे पाणी घालावे. मिठ घालावे व चिरलेली कोथिंबीर घालुन मिरची मोडून घालावी. उकळी आली की ३-४ मिनीटे शिजवुन गॅस बंद करावा.
वाचन
13156
प्रतिक्रिया
0