मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पायनॅपल कस्टर्ड

साईली · · पाककृती
पायनॅपल कस्टर्ड साहित्य : १ अननस, १ चमचे कस्टर्ड पावडर, १/२ लिटर दूध, २ चमचे साखर, १ चमचा वेलची पावडर, २ चमचे व्हॅनिला आईस्क्रीम कृती : मंद आचेवर दूध आटवून घ्या. त्यानंतर १/४ कप वेगळं दूध घेऊन ते गरम करुन घ्या. या दुधात कस्टर्ड पावडर घालून नीट ढवळा. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. कस्टर्ड घातलेल्या दुधात आटवलेलं दूध घाला. मिश्रण ढवळत रहा. २-३ मिनिटे मिश्रण उकळू द्या. नंतर त्यात वेलची पावडर घाला. अननस चिरुन त्यात साखर घाला व फ्रीजमध्ये ठेवा. काही वेळाने हे तुकडे मिश्रणात घाला. सव्‍‌र्ह करताना त्यात व्हॅनिला आईस्क्रीम घाला. ==================================== नमस्कार मि नविन सद्स्य आहे मिपा वर त्यामुळे सुरुवात गोड....... तर सारच काहि गोड.

वाचने 4040 वाचनखूण प्रतिक्रिया 4

दिपाली पाटिल 02/03/2010 - 13:17
अरे व्वा छान वाटतेय पाकृ...लोकसत्तामध्ये पण अशीच पाकृ आली होती... दिपाली :)

झुळूक 02/03/2010 - 13:34
स्वागत सायली, सुंदर पाक आहे. खुपच गोड सुरुवात!

शुचि 03/03/2010 - 04:25
मस्त आहे पाकृ. स्वागत आहे मिपावर आपलं : ) ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)