पायनॅपल कस्टर्ड
पायनॅपल कस्टर्ड
साहित्य :
१ अननस, १ चमचे कस्टर्ड पावडर,
१/२ लिटर दूध, २ चमचे साखर,
१ चमचा वेलची पावडर, २ चमचे व्हॅनिला आईस्क्रीम
कृती : मंद आचेवर दूध आटवून घ्या.
त्यानंतर १/४ कप वेगळं दूध घेऊन ते गरम करुन घ्या.
या दुधात कस्टर्ड पावडर घालून नीट ढवळा. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या.
कस्टर्ड घातलेल्या दुधात आटवलेलं दूध घाला. मिश्रण ढवळत रहा.
२-३ मिनिटे मिश्रण उकळू द्या. नंतर त्यात वेलची पावडर घाला.
अननस चिरुन त्यात साखर घाला व फ्रीजमध्ये ठेवा.
काही वेळाने हे तुकडे मिश्रणात घाला.
सव्र्ह करताना त्यात व्हॅनिला आईस्क्रीम घाला.
====================================
नमस्कार
मि नविन सद्स्य आहे मिपा वर
त्यामुळे सुरुवात गोड....... तर सारच काहि गोड.
वाचने
4040
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
अरे व्वा
स्वागत
सायली
फोटो?????