पालक बूंदी रायता

श्रद्धा.'s picture
श्रद्धा. in पाककृती
1 Dec 2009 - 11:57 am

साहित्य : धुवुन बारीक चिरलेला पालक १ वाटी , सायीचे फ़ेटलेले दही १ वाटी, १/२ वाटी बुंदी(खारी) ,

जीरे पुड १ चमचा चवीप्रमाणे मीठ आणि साखर..


कृती : एका छोट्या बाउल मधे चिरलेला पालक घेउन त्यात फ़ेटलेले दही घालावे. बुंदी घालावी, जिरे पुड

मीठ साखरपुड घालुन एकत्र करवे आणि खायला घ्यावे...


हा पदार्थ जेवायला बसयाच्या थोडा वेळ आधीच तयार करावा नाहीतर बुंदी खुप मऊ होते.

प्रतिक्रिया

नेहमी आनंदी's picture

1 Dec 2009 - 12:48 pm | नेहमी आनंदी

आमच्यकडे पालकाचीच बुंदी मिळते. त्यामुळे आम्ही तिच घालतो दह्यात. आणि वर साखर मीठ घातले की लगेच बुंदी रायता तयार. रंग पण छान दिसतो.

काळे मिठ किंवा चाटमसाला वापरावा.
आप्ल्या दोन्ही रेसीपीज भरली वांगी आणि पालक रायता छान आहेत.
याच पद्धतिने ईतर पालेभाज्याचा देखील रायता बनविता यीइल उदा.मेथी,मुळ्याची पाने, चाकवत,ई.

गणपा's picture

1 Dec 2009 - 1:02 pm | गणपा

छान दिसतेय.. पण पालक कच्चाच घालायचा का? कि थोडी वाफवुन?

श्रद्धा.'s picture

1 Dec 2009 - 1:18 pm | श्रद्धा.

पालक कच्चाच वापरायचा...

अवलिया's picture

1 Dec 2009 - 1:36 pm | अवलिया

छान !

--अवलिया

पर्नल नेने मराठे's picture

1 Dec 2009 - 3:30 pm | पर्नल नेने मराठे

आताच जाउन पालकाची जुडी घेवुन आलेय.
रायत्याची बुन्दी आहेच घरात. आजच करुन पहाते.
(निगुतीने संसार करण्यात तरबेज =)) )चुचु

सूहास's picture

1 Dec 2009 - 6:41 pm | सूहास (not verified)

मस्त ..

सू हा स...