मंडळी आज अस्सल गावाकडची ट्रीट घेउन आलोय.
आधी वाटल कुणाला हा प्रकार माहीत आसेल की नाही पण मागे संदिपच्या एका जुन्या लेखात केळीच्या बोंडाच्या भाकरीचा उल्लेख आला होता.
म्हटल करुन बघु आणि जर जमलीच तर आपल्या दोसतांबरोबर शेअर करु.
साहित्यः
१ केळीचे बोंड साफ करुन.
१ कांदा आडवा-उभा कापुन.
१ वाटी मोड आलेले वाल.
२ लहान चमचे धणे पावडर.
२ लहान चमचे जीरे पावडर.
२ वाट्या तांदळाचे पीठ.
१ लहान चमचा हळद.
२ चमचे लाल तिखटं.
२ मोठे चमचे बेसन.
२ मोठे चमचे तेल.
२ हिरव्या मिरच्या.
चवी नुसार मीठ.
कृती:
केळीचे बोंड साफ करुन घ्यावे. चित्रात दाखवलेला मधला दांडा आणि छोटी पाकळी काढुन टाकावी.
साफ केलेलं बोंड बारीक चिरुन घ्याव.
एका मोठ्या भांड्यात वरील सर्व पादार्थ एकत्र करावे.
चपातीच्या कणके सारख मळुन घ्याव. शक्यतो मळताना पाणी कमी वापराव. कांद्याच पाणी सुटते.
फ्राईंग पॅन मध्ये खाली केळीचे पान ठेवाव आणि त्यावर पीठ पसरवुन साधारण अर्ध्या ते पाउण इंच जाडीची भाकरी थापावी.
वरुन परत केळीच पान ठेवुन पानाच्या सर्व कडा दुमडुन घ्याव्या.
फ्राईंग पॅनवर झाकण ठेवुन मंद ते मध्यम आचेवर भाकरी भाजावी.
१०-१२ मिनिटांनंतर भाकरी पानासकट उचलुन पालथी करावी आणि दुसर्या बाजुने पण भाजुन काढावी.
गवती चहा आणि आलं घातलेल्या गरमा गरम वाफाळत्या चाहा सोबत आनंद घ्यावा..
आजची खादाडी झकासरावांना समर्पीत :)
प्रतिक्रिया
1 Dec 2009 - 12:28 pm | शेखर
व्वा !!
खल्लास ...
शेखर
2 Dec 2009 - 5:15 pm | टारझन
ह्याला म्हणतात पाककृती ... :)
नाय तं च्यामारी ... कांद्याचे पोहे न साबुदाण्याची खिचडी छाप .. सगळ्यांनाच माहित असलेल्या पाककृत्या वाचा आणि त्यावर बळेच बादलीभर लाळ गाळा .. ज्याम बिनकामाचं डिहायड्रेशन होऊन र्हायलं होतं .. ;)
मस्त रे गणप्या .. "नविन" पाककृती :)
- टारपा
1 Dec 2009 - 12:34 pm | jaypal
छळतोस असे फोटो दाखवुन? का करु कंट्रोल नही होता यार.


रेसीपी व फोटो दोन्ही तुझ्यासारखेच अव्वल आणि ए १
अवांतर :- भाकरीचा फोटो मला थालीपिठाची आठवण करुन गेला
1 Dec 2009 - 12:34 pm | नंदन
हतबुद्ध!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
1 Dec 2009 - 5:48 pm | बिपिन कार्यकर्ते
+१
बिपिन कार्यकर्ते
1 Dec 2009 - 12:40 pm | सहज
म हा न!
1 Dec 2009 - 7:45 pm | चित्रा
म्हणते..
खल्लास, जियो, अप्रतिम, भारी, इ. इ.
1 Dec 2009 - 12:45 pm | श्रावण मोडक
छळवाद आहे नुसता!
1 Dec 2009 - 8:28 pm | प्रभो
छळवाद आहे नुसता!
आज तुला जीमेल वर लै छळणारे मी!!!!
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
1 Dec 2009 - 12:47 pm | दशानन
गचकलो.
हा आमचा गणपा ह्याच्यावर आमचा खुप जीव. कधीतरी ह्याचाच जीव घेणार आहे मी ;)
छळतो नुसता.... :(
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
1 Dec 2009 - 12:47 pm | मदनबाण
गण्या सेठ, एकदम क्लास १. पाकृ :)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
1 Dec 2009 - 12:48 pm | दशानन
गचकलो.
हा आमचा गणपा ह्याच्यावर आमचा खुप जीव. कधीतरी ह्याचाच जीव घेणार आहे मी ;)
छळतो नुसता.... :(
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
1 Dec 2009 - 12:48 pm | दशानन
गचकलो.
हा आमचा गणपा ह्याच्यावर आमचा खुप जीव. कधीतरी ह्याचाच जीव घेणार आहे मी ;)
छळतो नुसता.... :(
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
1 Dec 2009 - 1:04 pm | दिपक
1 Dec 2009 - 7:49 pm | विसोबा खेचर
दिपकरावांचा चित्ररूपी प्रतिसाद क्लासच! :)
1 Dec 2009 - 1:08 pm | आशिष सुर्वे
फक्त तुला भेटायला परत 'लागोसा'त यावेसे वाटतेय र्रे लेका!!
तुझा मेंदू आहे की खानावळ??
बाओ ओगा!!
-
कोकणी फणस
1 Dec 2009 - 1:34 pm | अवलिया
गणपाला फाशी देण्यात येत आहे.
--अवलिया
1 Dec 2009 - 1:56 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मस्त आहे.खरच थालिपिठाचीच आठवण झाली.
1 Dec 2009 - 3:17 pm | सूहास (not verified)
गणपाने वेळोवेळी साकारलेली आई अन्नपूर्णेची ही रूपं शब्दातीत आहेत, अतिशय मनमोहक आहेत! अत्यंत अवघड अश्या पाककलेकरता आई अन्नपूर्णेचा वरदहस्त असाच अगदी सदैव गणपावर राहो हीच शुभेच्छा..!
-- तात्या अभ्यंकर.
फक्त हेच शब्द ....रिपीट थाउझंड टाईम्स...
सू हा स...
1 Dec 2009 - 3:26 pm | JAGOMOHANPYARE
मस्त........
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
1 Dec 2009 - 3:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
_/\_
1 Dec 2009 - 3:51 pm | परिकथेतील राजकुमार
गणपा ह्यांचे सदस्यत्व रद्द करुन त्यांचा आयपी कायमस्वरुपी बॅन करण्यात यावा.
विषय संपला.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
1 Dec 2009 - 4:10 pm | समंजस
गणपाभौ, आता या पुढे तुमची तारीफ करायला शब्द नाहीत.
(शक्य असल्यास पेटंट काढून ठेवा. भरपुर रायल्टी मिळेल :) )
1 Dec 2009 - 4:56 pm | शार्दुल
शब्दच नाहीत,,,,,,,, मस्तच
नेहा
1 Dec 2009 - 4:57 pm | सुनील
केळफुलाची भाजी ऐकली होती पण चक्क भाकरी??
आणि काय रे, केळीचे बोंड साफ करून घ्यावे, अशी एका वाक्यात बोळवण करतोस? एवढं सोपं आहे का ते?? आणि वेळ किती लागतो त्याला?
वरील पाकृ करून बघण्याची हिंमत नाही, कधी बोलावलस तरी नक्की येईन!! ;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
1 Dec 2009 - 5:01 pm | घाटावरचे भट
वा वा!!
1 Dec 2009 - 7:47 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री गणपा, अप्रतिम.
1 Dec 2009 - 7:16 pm | रेवती
गणपाभाऊंना कोपरापासून हात जोडून नमस्कार!
मलाही थालीपिठाची आठवण झाली.
केळीची पाने कुठे मिळतात?
रेवती
1 Dec 2009 - 7:29 pm | स्वाती२
गणपा, बोलती बंद केलीत.
1 Dec 2009 - 8:17 pm | संदीप चित्रे
केळफुलं हा माझ्या आजोबांच्या आणि वडिलांच्या आवडीचा पदार्थ.
पालघर, डहाणू या भागात केळफुलं मुबलक मिळतात. त्यामुळे केळफुलांची भजी वगैरे खास प्रकारही खायला मिळतात.
ह्या रेसिपीसाठी स्पेशल धन्स रे गणपा :)
1 Dec 2009 - 8:24 pm | वेताळ
____/\____
वेताळ
1 Dec 2009 - 8:38 pm | चतुरंग
पाककलेकडे स्वयंपाकघरातील बायकांची खुडबूड ह्या पलीकडे फारसे वेगळ्या दृष्टीने बर्याचदा बघितले जात नाही परंतु खरेतर मुखपृष्ठावर तात्या म्हणतो तसे ही अत्यंत अवघड कला आहे आणि शास्त्रदेखील आहे. पूर्ण समर्पणाच्या भावनेने केलेला एखादा पदार्थ हा अनन्यसाधारण तृप्ती देऊन जातो. 'करणार्याच्या हाताची चव' हे शब्द आपण बर्याचदा वापरतो त्याला निश्चित अर्थ आहे.
प्रामुख्याने सुगरणींच्या समजल्या जाणार्या ह्या बालेकिल्ल्यात इतकी यशस्वी चढाई करुन एकाहून एक सरस पाककृतींनी मिपाला तृप्त करुन टाकणार्या गणपाला आजच्या ह्या अफलातून पाककृतीबद्दल सर्व मिपाकरांतर्फे मी 'मिसळपाव बल्लवभूषण' अशा पदवीने सन्मानित करु इच्छितो! गणपाने ह्या पदवीचा स्वीकार करावा. =D> =D> =D> =D>
(वरणभातसीमित)चतुरंग
1 Dec 2009 - 8:39 pm | धनंजय
छळवाद आहे नुसता.
(आणि मूळ केळफूलच एक छळवादी भाजी आहे. फुलांमधल्या कावळे-चिमण्या साफ करायला किती वेळ लागतो, ते गणपांच्या सुंदर चित्रात दिसते आहे का?)
1 Dec 2009 - 9:27 pm | भानस
खरेच तोंडाला पाणी सुटले. इथे केळफूल नाही मिळत त्यामुळे मायदेशात आले की करीनच आता. बाकी वाल पाहून फोडणीस टाकलेल्या बिरडयांचा सुंगध जीव वेडावून गेला. अप्रतिम पाकृ. अनेक धन्यवाद.
1 Dec 2009 - 9:41 pm | वरदा
काय मस्त पा.क्रु. आमच्या घरी केळीचं झाड होतं आणि आई ही भाकरी करायची. खूप आठवणी जाग्या झाल्या...सहीच
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
2 Dec 2009 - 12:47 am | मीनल
कधीही न ऐकलेली पाहैलेली ,चाखलेली पाककृती.
तुम्ही अगदी सुगरण आहात या बद्दल शंका नाही.
आपली कला शेअर करता याच ही कौतुक आहे.
काही सुगरणी पक्क्या असतात. त्या सिक्रसी पाळतात. मग एखादी डिश त्यांची सिगनेचर डिश होते आणि सणा समारंभात उगाचच भाव खातात.
मीनल.
2 Dec 2009 - 12:56 am | विसोबा खेचर
खाऊ देत भाव! आता काही अडलं तर आम्ही आमच्या गणपालाच विचारू डायरेक्ट! :)
तात्या.
2 Dec 2009 - 1:38 am | शाहरुख
पाककृती पाहून मी वारलो आहे..कृपया माझ्या तेराव्याला हा पदार्थ करून समस्त मिपाकरांना खिलवावा.
वरील प्रतिसाद हा तात्यांच्या "मेलो, गचकलो" असल्या प्रतिसादांवरून प्रेरित आहे हे मी प्रांजळपणे कबुल करतो.
2 Dec 2009 - 1:45 am | हरकाम्या
तेराव्याची जागा सांगा मी जातीने हजर राहीन. आणि जेवल्यानंतर तुम्हाला पुढचा जन्म " गणपाच्या " कुळात मिळो असा आशिर्वाद देउनच निघेन ..........
2 Dec 2009 - 1:49 am | हरकाम्या
"गणपतराव "तुम्हाला शतशः धन्यवाद तुम्ही मला माझ्या आजीची
आठवण करुन दिलीत.
2 Dec 2009 - 2:39 am | उमा
गणपा
तुमच्या पाककृती मी नेहमी वाचते. उत्तमच असतात.
बोंडाची (केळफुलाची) भाकरी मि कधीही ऐकली देखिल नव्हती.
अशा""हटके" पाककृती तुम्ही यूटयुब वर चित्रण करुन टाकायला हव्या. पंजाबी आणि दाक्शिणात्य सोडुन पण इतर प्रकार आहेत हे कळू दे सर्वान्ना.
2 Dec 2009 - 5:17 am | प्राजु
धन्य आहेस बाबा तू!!
खरंच एकदा भेटलास की सर्वांसमोर दंडवत घालेन मी तुला. :)
सुंदर! शब्दच नाहीत.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
2 Dec 2009 - 5:40 am | लवंगी
मस्त रे.. आजीच्या हातच्या भाकरीची आणी चहाची आठवण झाली रे..
2 Dec 2009 - 6:27 am | नाटक्या
गणपाशेठ,
छानच....
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
2 Dec 2009 - 8:06 am | श्रीयुत संतोष जोशी
काय पण भारी आहे साला. एक नंबर पाक्रु.
आयुष्यात पहिल्यांदाच ऐकली .
आईशप्पथ एकदम झक्कास.
गणपाशेठ भारतात आल्यावर मला भेटल्याशिवाय व्हिसा मिळणार नाही तुम्हाला परत जायला.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
2 Dec 2009 - 12:41 pm | sneharani
शब्द संपले....
अतिशय उत्तम पाककृती...
2 Dec 2009 - 3:30 pm | भडकमकर मास्तर
__/\__
लै भारी गणपा...
काय सुंदर फोटो आहेत...
2 Dec 2009 - 4:47 pm | सुमीत भातखंडे
नंबर
2 Dec 2009 - 5:14 pm | गणपा
समस्त रसिकांचा ॠणी आहे. :)
- नतमस्तक गणपा
5 Dec 2009 - 12:08 pm | झकासराव
अगा आया आया!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
लेका गणपा कुठुन कुठुन शोधुन आणतोस रे रेसिप्या.
केळफुलाची भाजी करायला देखील बायका तयार नसतात अस ऐकुन आहे मी. (आता आम्हा घाटी लोकाना कुठली माहिती असली भाजी)
तु तर त्याची भाकरी केलीस की.
हजारो पिझ्झ्याना फाट्यावर मारेल अशी जगात लयी भारी पाकक्रुती दिलीस रे. :)
आता गणपाने ही पाककृती मला समर्पित केल्याने मी गणपाला श्या नाय देणार. :)
5 Dec 2009 - 12:17 pm | ऋषिकेश
काय करताय राव बाहेर!
या इथे.. एक मस्त हाटील टाका.. हाटील माझ्यासारख्या ग्राहकांनी उतू जाईल...
__/\__
दंडवत घालण्याशिवाय काय करू शकतो
ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?