प्रेसेंट /आहेर

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
11 Nov 2009 - 8:48 pm
गाभा: 

एका लग्नाला जाण्याचा योग आला होता...पत्रीकेवर लिहिले होते कि प्रेसेंट /आहेर आणु नये.पुष्प गुछ्छ हि आणु नये... हि पध्धत रुढ होत चालली आहे....आपणास काय वाटते? असे असावे कि नको..?..मला वाटते कि आहेर न घेणे व न देणे योग्य आहे....आपणास काय वाटते?
यावर असेहि एक मत आहे कि आहेर न घेता लग्नास गेले कि लोक म्हणतात "आले फुकट हादडायला.."
काहि ठिकाणी तर किति प्रेसेन्ट दिले हे लाऊड स्पिकरवरुन सांगीतले जाते..प्रेसेन्ट च्या किमतिवरुन काय ठरते? सामाजिक पत? कि आर्थिक परीस्थिति?..प्रेसेन्ट न घेण्याची प्रथा पुरोगामी महराष्ट्रात रुढ व्हावि
आपले मत व्यक्त करुन धाग्यास पावन करावे

प्रतिक्रिया

बाकरवडी's picture

11 Nov 2009 - 8:56 pm | बाकरवडी

पळून जाउन लग्न करावे.
काहीच प्रॉब्लेम नाही.

असो, पण आहेर न घेण्याबद्द्ल आग्रही.....
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

गणपा's picture

11 Nov 2009 - 9:11 pm | गणपा

आहेर /अहेर जरुर घ्यावा.
च्यायला सोडायचा कशाला? तुम्हाला गरज नसेल तर सरळ एखाद्या सामाजीक संस्थेला, अनाथाश्रमाला, वृद्धाश्रमाला दान करावे.
घ्या आम्ही आमचे २ पैसे टाकुन धाग्यास पावन केले आहे ;)

बाकरवडी's picture

11 Nov 2009 - 9:23 pm | बाकरवडी

अहो पण आहेर घेतल्यावर रीटर्न गिफ्ट द्यावे लागते.
म्हणजे काही तरी साडी,शर्टपीस्,एखादं भांड, चिवडालाडू वगैरे वगैरे.....
त्यामुळे परत खर्च वाढतो. मुळात आहेर न घेण्याचे मुख्य कारण लग्नातील खर्च कमी करणे हा आहे.

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

गणपा's picture

11 Nov 2009 - 9:33 pm | गणपा

रे बाकरवड्या , लग्नाचा खर्च कमी कारायचाय तर मग कोर्टात लग्न लावाव ना.
साला हाय काय आन नाय काय?

आणी खर्चाच म्हणशील तर लग्नच करु नये. आयुष्यभर होणारा खर्च वाचेल ;)

चिरोटा's picture

11 Nov 2009 - 10:57 pm | चिरोटा

अहेर्/आहेर घेतले की लग्नाच्या दुसर्‍या दिवशी सर्वात आधी बायका कोणी किती अहेर दिला आहे ते बघतात्.त्यात पैशाची पाकिटे असली की मग व्यक्तीचे नाव्/अहेर डायरीत लिहिले जाते. सहसा आपण लोकांना जेवढा अहेर दिलेला असतो साधारण तेवढाच आपल्याला परत मिळतो!!
आपला आशीर्वाद हाच आमचा आहेर हे मला योग्य वाटते.या,अक्षता टाका,भोजन करा आणि निघा.
भेंडी
P = NP

जर पत्रिकेवर स्पष्ट लिहिले आहे तर त्यांच्या मताचा आदर करून आहेर देऊ नये.

पत्रिकेवर काहीच लिहिले नसेल तर मात्र द्यावा.

सिंपल अ‍ॅज दॅट !

रेवती's picture

12 Nov 2009 - 12:25 am | रेवती

जर पत्रिकेवर 'आहेर आणू नये' असे लिहिले असेल तर तसे करावे.
एका वाढदिवसाला लिहिल्याप्रमाणे मी प्रेझेंट नेले नव्हते. बाकीच्यांनी मात्र आणले होते, तिथे थोडी पंचाईत झाली. अनेकदा आहेर घेण्याचा मानस नसताना आलेले पाहुणे, " हे काय? आमच्याकडून घेणार नाही का आहेर?" अशी भावनापूर्ण गळ घालतात. यजमानांकडून काय उत्तर येणार याकडे सगळ्यांचे लक्ष असते. पाकिटे आणि पैसे घेऊनच येतात लोक्स! माझ्या एका नातेवाईकांनी त्यांच्याकडच्या लग्नात जबरदस्तीने दिलेल्या भेटवस्तू त्या त्या लोकांच्या घरी नेऊन दिल्या होत्या. माझ्या मुलाच्या बारश्याला आलेल्या साड्या तशाच पडून आहेत. सात वर्षात एकदाही हात लागलेला नाही. असे होण्यापेक्षा आहेर न घेतलेला चांगला. गरिब असो वा श्रीमंत, त्या लोकांचे पैसे आणि वेळ भेटवस्तू आणताना खर्च झालेले असतात.
रेवती

मी-सौरभ's picture

12 Nov 2009 - 12:45 am | मी-सौरभ

घेतलाच नाही की द्यावा पण लागत नाही ना......:)

सौरभ

गणपा's picture

12 Nov 2009 - 2:44 am | गणपा

असहमत.
समजा तुम्ही घेतला नसेल एखाद्याकडुन पण त्याने त्याच्या लग्नात अहेर आणु नये अस छापल नसेल तर काय तुम्ही नसते हात हलवत जाणार का? लोक लाजेस्तव काहितरी निदान पाकिट तरी द्यालच ना?

रेवती's picture

12 Nov 2009 - 2:55 am | रेवती

आहेर देणं परवडलं पण घेणं नको!
माझ्याच लग्नात आलेले ५ थर्मास, स्टिलचे डबे, साड्या, शेभेच्या वस्तू, पानसुपारीचे बॉक्सेस........
मी तर सासूबाईंना म्हटलही होतं की त्यांना अजू दोन तीन मुलं असती तरी सगळ्यांचे संसार व्यवस्थित चालू झाले असते एवढ्या सामानावर!;)
त्यातल्या त्यात कॅश ठिक आहे......देणंही आणि घेणंही!

रेवती

मिसळभोक्ता's picture

12 Nov 2009 - 3:37 pm | मिसळभोक्ता

त्यातल्या त्यात कॅश ठिक आहे......देणंही आणि घेणंही!

चालेल. पुढच्या वेळी कॅश देऊ ! :-) :-)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विनायक प्रभू's picture

12 Nov 2009 - 3:42 pm | विनायक प्रभू

कॅश द्यायचा प्रसंग यावा अशी ईश्वर चरणी प्रार्थना.

विनायक प्रभू's picture

12 Nov 2009 - 3:45 pm | विनायक प्रभू

पुढच्या वर्षी सिल्वर ज्युबीली आहे हो.
सर्वांनी कॅश पाठवावी अशी अग्रिम सुचना.

चिरोटा's picture

12 Nov 2009 - 4:12 pm | चिरोटा

सध्या कॅशलेसचा जमाना आहे. पार्टी(पक्षी-आपण) मालदार असल्याने पार्टी कुठे देणार ते सांगा.पार्टीत- कोंबडी वडे/मटण पुलाव/मोरी. आणी जेवल्यावर धोंडस पाहिजे.
भेंडी
P = NP

रेवती's picture

12 Nov 2009 - 10:57 pm | रेवती

भेंडीभाऊंशी सहमत! आम्ही लेस कॅशवाले आहोत त्यामुळे मोअर कॅशवाले अर्थात प्रभूसर मालदारांनीच पार्टी द्यावी.;) मांसाहारींनी त्यांची मागणी केली आता शाकाहाराचीही आमची मागणी आहे.

रेवती

रेवती's picture

12 Nov 2009 - 10:50 pm | रेवती

किती पेट्या बोला?:)

रेवती

रेवती's picture

12 Nov 2009 - 11:00 pm | रेवती

छ्या! काहीपण!
मला नाही आवडली प्रतिक्रिया!

रेवती

पर्नल नेने मराठे's picture

12 Nov 2009 - 10:20 am | पर्नल नेने मराठे

माझ्या मामाच्या लग्नात आहेर आणु नये लिहिले होते...त्यामुळे पुष्पगुच्छ आले होते, ते हि महागच असतात की. माझ्या लग्नात चुक सुधारली गेली. आहेर व पुष्पगुच्छ आणु नये लिहिले गेले. नातेवाइक व जवळ्चे मित्र्-मैत्रीणीनी केळवण केले तेव्हाच आहेर दिला.
म्हणुन हल्ली ज्याना खरच आहेर द्यायचा असतो त्यानी लग्नाआधी जे केळवण केले जाते तेव्हाच आहेर द्यावा :P सो हॉलमधे छान वातावरण राहिल. नाहितर ज्यानी आणलाय ते घ्या घ्या म्हणतात व ज्यानी नाहि आणलाय त्याना लाजा आणतात.

चुचु
(व्यवहारी चतुर कोब्रा)

छोटा डॉन's picture

12 Nov 2009 - 10:33 am | छोटा डॉन

चुचु बैं शी सहमत आहे ...

असे प्रायव्हेटमधेय गुपचुप आहेराचे कार्यक्रम उरकुन घेण्यात शहाणपण असते. पण खरच सांगत ते आहेर वगैरे घेतल्याशिवाय कार्याला मज्जा नै साला.
उगाच काय तोंड लांब करुन दिवसभर स्टेजवर उभे रहायचे जर गिफ्ट्स मिळणार नसतील तर ;)

स्वगत : चला, आमंत्रितांची येणार्‍या आहेराच्या ताकदीनुसार लिस्ट फ्रीज करायची आहे, लै गडबड आहे भौ !

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

परिकथेतील राजकुमार's picture

12 Nov 2009 - 6:12 pm | परिकथेतील राजकुमार

म्हणुन हल्ली ज्याना खरच आहेर द्यायचा असतो त्यानी लग्नाआधी जे केळवण केले जाते तेव्हाच आहेर द्यावा

वाह ! म्हणजे ज्यांना आहेर द्यायचा आहे त्यांनी पदरमोड करुन केळवणाचा पण घाट घाला.

चुचु पक्की कोब्रा ग बये तु !!

©º°¨¨°º© परानल खाणे पराठे ©º°¨¨°º©
आमचे राज्य

विजुभाऊ's picture

12 Nov 2009 - 11:07 am | विजुभाऊ

माझ्या लग्नात आलेले कूकर / लेमन सेट / डबे/शर्ट पीस आणि तत्स॑म आहेर मी इतर बर्‍याच लग्नात आहेर म्हणून उपयोगात आणले आहेत

पर्नल नेने मराठे's picture

12 Nov 2009 - 11:10 am | पर्नल नेने मराठे

:O 8| :O)

चुचु

गणपा's picture

12 Nov 2009 - 1:30 pm | गणपा

काय हो विजुभौ कुकर, डब्या वरची नाव बदलुन दिलीत की तशीच?
बाकी काही नाही मागाहुन ईज्जतीचा फालुदा व्हायचा हो ;)

पॅकिंगसकट आला होता. म्हणजे ज्यांनी आम्हाला दिला त्यांच्याकडे ज्यांनी जसा दिला होता तसाच त्यांनी पुढे पास केला. मूळ देणार्‍याचे नाव सुद्धा आत तसेच होते! :(

चतुरंग

jaypal's picture

12 Nov 2009 - 10:56 pm | jaypal

गणपा कडुन हा घ्या..........घरचा आहेर
"काय हो विजुभौ कुकर, डब्या वरची नाव बदलुन दिलीत की तशीच?
बाकी काही नाही मागाहुन ईज्जतीचा फालुदा व्हायचा हो "
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/