चड्डीवाला आणि माकडे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
9 Sep 2009 - 4:27 am

चड्डीवाला आणि माकडे

एक नाना नावाचा टोपी विक्रेता होता. गावातले सगळे लोक नाना टोपीवाला असे म्हणत असत.
त्याच्या देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर त्याच्या देशात डोक्यात टोप्या घालण्याची फॅशन जरा कमी झालेली होती व लोकं एकमेकांनाच 'टोप्या घालू' लागली होती. आधीच टोप्यांची विक्री कमी व त्यातच
आर्थिक मंदीमुळे तंगी आली म्हणुन वेगळा धंदा काहीतरी सुरु करायचे नानाच्या मनात होते. म्हणून आपल्या नानाने विजारीच्या आतुन घालतात तसल्या वेगवेगळ्या चड्डया आणि नाड्या विकण्याचा धंदा चालु केला. आताशा सगळे लोकं त्याला "नाना चड्डा" असे म्हणत असत.

त्याच्याकडे सर्व त-हेच्या, विविध मापाच्या, वाढत्या अंगाच्या, बदलत्या घेराच्या, फिट्ट बसणा-या, मोकळ्या चाकळ्या अशा विविध चड्ड्या नाड्यांसह रास्त दरात उपलब्ध होत्या. "इच्छुकांनी या चड्यांचा लाभ घ्यावा ही इनंती!" अशी कसलेल्या दुकानदाराची भाषा तो चड्ड्या विक्री करण्यासाठी गिर्‍हाईकांशी करत असे. नाना चड्डीवाला आपला गरीब स्वभावाचा, हसतमुख, डोक्यावर गांधी टोपी घालणारा व फारच विनोदी, उमद्या व्यक्तिमत्वाचा माणुस होता. त्याचे आधी लक्ष्मी पेठेत दुकान होते पण आर्थिक मंदीमुळे तंगी आली म्हणुन तो दुकानात एखाद्या माणसाला बसवून आपण स्वःता दोन पैसे जास्त मिळावेत म्हणून डोक्यावर चड्ड्यांची पेटी घेवून गावोगावी "चड्ड्या घ्या हो चड्ड्या.... चड्ड्या घ्या हो चड्ड्या" असे ओरडून चाड्ड्यांची विक्री करत फिरत असे. गरीब बिचारा नाना. दिवसभर त्याला ह्या गावातून त्या गावात, उन्हातान्हात फिरावे लागत असे.

असेच एकदा तो पुणेगाव या गावातुन टाणेगावात चड्डी विक्रीसाठी जात होता. वाटेत त्याला भुक लागली. डोक्यावरची चड्ड्यांची पेटी खाली ठेवून नदीच्या काठावर आंब्याच्या झाडाखाली बसून त्याने बरोबर आणलेली चटणी भाकरी खाल्ली. पोट भरल्यावर अंमळ विश्रांतीसाठी तो पहूडला. थोड्याच वेळात त्याला गाढ झोपच लागली.

बर्‍यापैकी झोप घेतल्यावर तो उठला व बघतो तर काय त्याची चड्ड्यांची पेटी उघडी ! तो हादरला. कोणी चोर वैग्रे आला होता की काय असला विचार त्याच्या मनात आला. तेवढ्यात त्याचे लक्ष झाडावर गेले. त्याला झाडावर खुपशी माकडे दंगामस्ती करत असतांना दिसली. सगळ्या माकडांनी त्याच्या पेटीतल्या चड्ड्या घातल्या होत्या!

ईकडे नाना विचारात पडला. त्या चड्ड्या माकडांकडुन परत कशा मिळवाव्या हा विचार त्याच्या मनात आला. त्याने डोके खाजविले. त्याचे पाहून माकडांनीही त्याची नक्कल केली. नानाने एक दगड माकडांकडे भिरकावला. माकडांनीही झाडावरच्या कैर्‍या नानाकडे फेकल्या. नानाच्या डोक्यात एक कल्पना आली. नानाने आपली विजार काढली. माकडांच्या आईवडीलांनी त्यांना "टोप्या विकणारा व माकडे" ही गोष्ट सांगीतलेली होती. त्यामूळे नाना आता पुढे काय करणार याची कल्पना माकडांना आली. ती वेळ न यावी म्हणून माकडांनी घाई करून त्यांनी घातलेल्या चड्ड्या लगेच खाली टाकल्या. नाना हसला व त्याने पटापट त्या सगळ्या चड्ड्या आपल्या पेटीत टाकल्या. नंतर चतूर नानाने खाली पडलेल्या कैर्‍या पण उचलल्या व तडक टाणेगावात चालता झाला.

तात्पर्य: नानाने जुन्या गोष्टीची पुनरावृत्ती केली. तो जुनी गोष्ट विसरला नाही. माकडेही जुनी गोष्ट विसरले नाहीत पण माकडांनीही काळाचा महिमा जाणून घेवून शिकून सवरून नविन मार्ग अवलंबिला.
म्हणजेच नविन गोष्ट करा पण जुनी गोष्ट पण लक्षात ठेवा.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

9 Sep 2009 - 7:10 am | अवलिया

हा हा हा लै भारी रे पाषाणभेदा !
=)) =)) =))

बाकी आम्ही तिथुन निघुन पुढील गावी गेलो आणि चड्डया मोजल्या. (हो आम्हाला मोजता येते)

प्रत्येक प्रकारच्या एक-दोन चड्ड्या कमीच भरल्या.
माकडेच ती, चालुपणा करणारच ! :)

हल्ली त्याच चड्ड्या घालुन शहरात येवुन गोंधळ घालतात असे समजते.
अशा माकडांना पकडण्यासाठी सरकारने काही योजना केली आहे.
पण काही फायदा होत नाही असे दिसते.
असो. :)

-- नाना चड्डा उर्फ नाना टोपीवाला

अवांतर - तेवढी तुम्ही पळवलेली चड्डी नाहीतर पैसे पाठवुन देणे.

============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विजुभाऊ's picture

9 Sep 2009 - 9:32 am | विजुभाऊ

ती वेळ न यावी म्हणून माकडांनी घाई करून त्यांनी घातलेल्या चड्ड्या लगेच खाली टाकल्या. नाना हसला व त्याने पटापट त्या सगळ्या चड्ड्या आपल्या पेटीत टाकल्या.

ती माकडे जुनी झाली .त्यानीही ही गोष्ट आजोबांकडून ऐकली होती.
आताच्या पिढीतली माकडे जरा वेगळे वागतात.
आताच्या माकडाम्च्या पिढीसाठी ही गोष्ट जर्रा बदलते
नानाने चड्डी काढली. माकडे हसली. नानाने काढलेली चड्डी जमिनीवर भिरकावली. नाना आता माकडे चड्ड्या खाली फेकतील या आशेत होता.एक माकडाचे पिल्लु झाडावरून खाली आले. त्याने नानाने खाली फेकलेली चड्डी उचलली आणि झाडावर जाऊन बसले. नाईलाजाने इर्षाद म्हणत नाना तसाच पुढच्या मुक्कामाला निघाला.
तात्पर्यः जुन्या अनुभवावरून बोध घेतला तर फायदाच होतो. आपल्याला जसे अनुभव सांगणारे वाडवडील असतात तसे माकडानासुद्धा अनुभव सांगणारे वाडवडील असतात

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

अवलिया's picture

9 Sep 2009 - 9:40 am | अवलिया

विजुभाउ ! जोरदार... !!

तेवढी पळवलेली चड्डी पाठवा नाहीतर पैसे देवुन टाका. ... !!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सखाराम_गटणे™'s picture

9 Sep 2009 - 9:48 am | सखाराम_गटणे™

>>तेवढी पळवलेली चड्डी पाठवा नाहीतर पैसे देवुन टाका. ... !!
म्हणजे तुम्ही पळवलेल्या चड्ड्या परत घेता तर........

तुम्ही जुन्या चड्ड्या परत घेता का?

दशानन's picture

9 Sep 2009 - 8:26 am | दशानन

=))

नाना चड्डी वाला =))

दगड्या.. लै भारी बॉ !

आशिष सुर्वे's picture

9 Sep 2009 - 9:00 am | आशिष सुर्वे

B) -
कोकणी फणस

बाकरवडी's picture

9 Sep 2009 - 9:04 am | बाकरवडी

चड्डीविक्या अवलिया !
=))

:B :B :B बाकरवडी :B :B :B

सखाराम_गटणे™'s picture

9 Sep 2009 - 9:33 am | सखाराम_गटणे™

चड्ड्या हाच चांगला धंदा आहे.
अगदी खुप गरीबी आली त्तरी माणसे चड्ड्या घालायचे सोडणार नाहीत.

JAGOMOHANPYARE's picture

9 Sep 2009 - 9:49 am | JAGOMOHANPYARE

इस्त्रीवाले, कल्हईवाले, चड्डीवाले........ आता यानन्तर बाकीचेही बलुतेदार येऊ द्यात.....

१. केसावर फुगे विकणारे
२. जुन्या चड्ड्यावर भान्डी विकणारे

:)

दिपक's picture

9 Sep 2009 - 9:55 am | दिपक

त्यामूळे नाना आता पुढे काय करणार याची कल्पना माकडांना आली. ती वेळ न यावी म्हणून माकडांनी घाई करून त्यांनी घातलेल्या चड्ड्या लगेच खाली टाकल्या.
=)) सही रे.

पाषाणभेद's picture

9 Sep 2009 - 10:24 am | पाषाणभेद

परत एकदा बारीक नजरेने वाचन!

दिपकजी आपण डिक्टेटिव्हच व्हायला पाहिजे होते. मागे एकदा माझ्या धाग्यातील फोटोत अशीच बारीक नजर मारली होती, आठवते?
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

सुबक ठेंगणी's picture

10 Sep 2009 - 9:49 am | सुबक ठेंगणी

=)) =)) =))
म्हणजे नानापेक्षा माकडे बरी असं म्हणायचं आहे का तुम्हाला?? :D

सुबक भिंगार्डे

योगी९००'s picture

9 Sep 2009 - 10:32 am | योगी९००

वेळ न यावी म्हणून माकडांनी घाई करून त्यांनी घातलेल्या चड्ड्या लगेच खाली टाकल्या. नाना हसला व त्याने पटापट त्या सगळ्या चड्ड्या आपल्या पेटीत टाकल्या.

नंतर नाना माकडांनी घातलेल्या चड्ड्या नवीन नवीन म्हणून विकू लागला. म्हणजेच नाना चड्ड्या विकण्याबरोबर टोप्याही घालू लागला. लोग त्याला आता "नाना टोपे" असे ही म्हणू लागले.

खादाडमाऊ

नंतर नाना माकडांनी घातलेल्या चड्ड्या नवीन नवीन म्हणून विकू लागला.
याचा अर्थ कोणालाही कळलेला दिसत नाही.

खादाडमाऊ

अभिज्ञ's picture

9 Sep 2009 - 10:58 am | अभिज्ञ

जबरदस्तच......
....../\......

पाषाणभेदा,
फार दिवसानी खळाळून हसवणारा लेख मिपावर आला.
त्याबद्दल तुझे आभार.

लैच भारी.

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

निमीत्त मात्र's picture

9 Sep 2009 - 7:05 pm | निमीत्त मात्र

मस्त खुसखुशीत लेख.
शिर्षक पाहून मला वाटले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आणखी एक लेख आला की काय ;)

हृषीकेश पतकी's picture

10 Sep 2009 - 12:15 pm | हृषीकेश पतकी

लै लै लै भारी...
आपला हृषी !!

अनिल हटेला's picture

10 Sep 2009 - 8:33 pm | अनिल हटेला

सहीच रे दगड्या !!
काय लिहीशील नेम नाय बघ !! =))

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)