आता गणेश चतुर्थी निमित्त घरोघरी मोदक बनत असतील पण गणपती ला फक्त मोदकांचाच नैवेद्य दाखवतात की अजुन ही काही असतं,??
आणि इच्छुकांनी आपापली पाकृ सगळ्यांसोबत शेअर केली तर माझ्यासारख्यांना मदत ही होईल आणि नविन काहीतरी बनवुन ही पाहता येईल... :)
मी बर्याचदा असे मोदक करते ,मोदक
हे मोदक लगेच बनतात फक्त मोदकांचा साचा भारतातुन आणावा लागतो आणि बाकी आपले ओल्या नारळाचे सारण भरुन उकडीचे मोदक किंवा सुक्या नारळाचे सारण भरुन तळणीचे मोदक.मी एकदा आंब्याच्या रसातले मोदक पाहीले होते पण खाल्ले नव्ह्ते , तसे नक्कीच चांगले लागत असावेत... :)
प्रतिक्रिया
24 Aug 2009 - 1:09 pm | विसोबा खेचर
भाव तेथे देव!
श्रद्धेने, भक्तिने दाखवल्यास गणपतीला मिसळपाव, कांदा भजी, साधा सुंदर आमटी भात किंवा गेला बाजार अगदी बोंबिल फ्राय! कुठलाही नैवेद्य चालतो...!
फ्क्त श्रद्धा आणि भक्ति महत्वाची!
आपला,
(भाविक) तात्या.
24 Aug 2009 - 1:14 pm | पर्नल नेने मराठे
आजिबात नाही, कान्दा ,लसुण नैवेद्यात अजिबात चालत नाही.
चुचु
24 Aug 2009 - 1:24 pm | विसोबा खेचर
आपल्या मताचा आदर करतो,
परंतु मी जी देव ही संकल्पना मानतो त्या देवाला अगदी सुक्या जवळ्याची चटणीदेखील नैवेद्य म्हणून चालते! प्रेमाने दाखवलेला तो नैवेद्य माझा देव आवडीने ग्रहण करतो अशी माझी धारणा आहे जी माझ्यापुरती ठाम आहे!
आपला,
(देवाच्या खाण्यापिण्यावर केवळ 'गोड' किंवा 'शाकाहारी' किंवा 'बिनकांदालसणीचा', असा संकुचित आहार न लादणारा!) तात्या.
24 Aug 2009 - 1:42 pm | पर्नल नेने मराठे
हे म्हणजे स्वतची सोय पाहिल्यासारखे झाले.
चुचु
24 Aug 2009 - 1:46 pm | विसोबा खेचर
ते कसं काय बॉ?
जे शाकाहारी जेवण -मोदकांचा नैवेद्य दाखवतात तेही तो नैवेद्य दाखवल्यानंतर त्यावर ताव मारून स्वत:चीच सोय पाहतात ना?
तात्या.
27 Aug 2009 - 7:48 am | पिवळा डांबिस
गणपतीला ब्राम्हण मानतात (उदा. त्याचे जानवे न विसरता प्रत्येक प्रतिमेत दाखवतात!!!!)
त्यामुळे बहुदा त्याला बिन कांदा-लसूणाचा शाकाहारी नैवेद्य दाखवतात!!!
गौरी किंवा नवरात्रीतल्या देवीसंदर्भातल्या नैवेद्यात असे बंधन नाही. त्यामुळे तेथे आपापल्या जमातीनुसार शाकाहारी/ मांसाहारी नैवेद्य दाखवतात!!!!
पण त्यामुळे प्रत्येक गणपती हा आपापल्या गौरीचा नैवेद्य चाखतच नसेल असे काही नाही!!!!
आमच्या गौरीचा नैवेद्य चाखून पहाणारा,
ब्राम्हण पिवळा डांबिस
सोड्याची खिचडी चिरायू होवो!!!!!!
24 Aug 2009 - 1:43 pm | बिपिन कार्यकर्ते
आपण जे जे खातो ते सगळे देवाला अर्पण करून खावे असे मोठे मोठे संत म्हणुनच गेले आहेत.
बिपिन कार्यकर्ते
24 Aug 2009 - 1:51 pm | विसोबा खेचर
आम्हीही त्या संतांपैकीच एक! :)
पर्नल नेने मराठ्यांना आज साक्षात आमचं मार्गदर्शन मिळतं आहे हे त्याचं भाग्य! विचारू द्या त्यांना काय विचारायचं ते! आम्ही त्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेऊ! :)
श्री श्री संत तात्याबा महाराज
मिसळपाव धर्म संस्थापक!
24 Aug 2009 - 2:14 pm | पर्नल नेने मराठे
8|
चुचु
24 Aug 2009 - 1:26 pm | पक्या
>>आजिबात नाही, कान्दा ,लसुण नैवेद्यात अजिबात चालत नाही.
कोणी सांगितले..देवाने / बाप्पाने असे सांगितले का? कधी?
24 Aug 2009 - 1:44 pm | पर्नल नेने मराठे
बाप्पाने नैवेद्य दाखवा पण सांगितले नाहिये, तरी दाखवता ना?
चुचु
24 Aug 2009 - 1:50 pm | बिपिन कार्यकर्ते
आपण आपल्याला वाटतं म्हणून नैवेद्य दाखवतो. म्हणुनच आपण आपल्याला वाटतो तो नैवेद्य दाखवायचा. वस्तुतः देवाला काहीच गरज नाहीये.
बिपिन कार्यकर्ते
24 Aug 2009 - 1:55 pm | पक्या
>>बाप्पाने नैवेद्य दाखवा पण सांगितले नाहिये, तरी दाखवता ना?
नाही ब्वा. नेहमी नाही दाखवत. जेव्हा दाखवतो तेव्हा कांद्या लसणाच्या पदार्थासकट दाखवतो.
आणि कांदा लसून नैवेद्दालाच का फक्त चालत नाही? त्या मागे काही शास्त्रीय कारण असेल तर आयुष्यात कधीच कांदा लसूण खाऊ नये.
कोणीतरी सांगितले की हि. मिरच्या पण चालत नाही .
24 Aug 2009 - 1:54 pm | भाग्यश्री कुलकर्णी
असहमत.आमच्या आजुबाजुला असणार्या अनेक ब्राम्हणेतर लोकांच्या घरातुन आमच्या देवीला नवैध येत असत. त्यात कांदा असायचाच.
24 Aug 2009 - 2:18 pm | पर्नल नेने मराठे
8| ब्राम्हण कुठे मधे आले आता ह्यात?
चुचु
24 Aug 2009 - 4:58 pm | भाग्यश्री कुलकर्णी
इथे मला ब्राम्हणवादावर बोलायचेच नाहीये.मी देखील अशा गोष्टी मानत नाही.पण त्यांच्याकडे जो मसाला (तिखट)
बनवतात त्यात कांदा वाळवुन घातला जातो(मलाही स्वयंपाकात हा मसालाच लागतो.)त्यामुळे त्यांच्या नैवैधातही कांदा असणे स्वाभाविकच आहे बस एवढेच मला म्हणायचे आहे हो.लगेच मला ब्राम्हणवादी बनवु नका.(ह्.घ्या.)
24 Aug 2009 - 3:31 pm | chipatakhdumdum
तात्या मालक आहेत, या साइटचे, तेव्हा तात्या म्हणाले , की भक्तीभावाने गणपतीला मासाहारी चकणा आणि दारूचा नैवेद्ध दाखवला तरी चालतो, तर आपण म्हणायच्,..वा वा , तात्या, अगदी बरोबर...
.
.
.
.
.
शोले मध्ये गब्बर फ्रेम मध्ये असला की मागे लाम्बवर, निराशेने कुत्री रडतात, तशी एक धून वाजत असते..
हा माणूस जे जे काही express करतो, लिहीतो किन्वा reaction देतो, तेव्हा मागे लाम्बवर कुठेतरी दु:खाचे मन्द पायरव जाणवतात.
24 Aug 2009 - 3:46 pm | सूहास (not verified)
<<<तात्या मालक आहेत, या साइटचे, तेव्हा तात्या म्हणाले , की भक्तीभावाने गणपतीला मासाहारी चकणा आणि दारूचा नैवेद्ध दाखवला तरी चालतो, तर आपण म्हणायच्,..वा वा , तात्या, अगदी बरोबर...>>>
आपण प्रतिसाद नीट वाचावा, त्यात तात्यांनी तु हाच नैवैद्य दाखव असे कुठ म्हटलय ..नो बॉसींग..तुला काय (आणी कोणाला) काय-काय दाखवायच हा तुझा वैयक्तीक प्रश्न आहे..
<<<शोले मध्ये गब्बर फ्रेम मध्ये असला की मागे लाम्बवर, निराशेने कुत्री रडतात>>>
बरय तु मात्र हसत असतोस..
अजुन वैयक्तीक लिहायच असल्यास लिही...
सू हा स...
24 Aug 2009 - 1:27 pm | अवलिया
गणपती बाप्पा मोरया !
--अवलिया
============
काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?
24 Aug 2009 - 1:30 pm | ज्ञानेश...
तात्यांचे मत पटले.
शबरीची उष्टी बोरेही रामाने खाल्ली होती. मग भक्ताने प्रेमाने दिलेला कुठलाही पदार्थ देव कशाला नाकारेल?
(गणेशभक्त)
ज्ञानेश.
"Great Power Comes With Great Responsibilities"
24 Aug 2009 - 1:36 pm | पर्नल नेने मराठे
शबरीला ऑप्शन्च नव्ह्ता.....आपल्याला बाप्पाच्या क्रुपेने सगळे निट मिळ्तेय ना, मग दाखवा कि चान्गला नैवेद्य.
चुचु
24 Aug 2009 - 1:41 pm | विसोबा खेचर
चांगला नैचेद्य?
मग वरणभात, मोदक यांचा नैचेद्य तेवढा चांगला आणि चिंबोर्याचं कालवण-तांदळाची भाकरी हा नैवेद्य वाईट, असं काही आहे का?
तात्या.
24 Aug 2009 - 1:50 pm | पर्नल नेने मराठे
तात्या मी कधिहि चिंबोर्याचं कालवण-तांदळाची भाकरी हा नैवेद्य बाप्पाला दाखविलेला पहिला नहिये. दिपालीने जनरल नैवेद्य विचारलेला आहे, तिला निट मार्गदर्शन करा.
चुचु
24 Aug 2009 - 1:53 pm | विसोबा खेचर
जनरल नैवेद्य?
म्हटलं तर सगळंच जनरल नायतर साधी कांदा-भाकर सुद्धा खासच!
तात्या.
24 Aug 2009 - 10:17 pm | मिसळभोक्ता
जनरल नैवेद्यापेक्षा आम्हाला जनरल वैद्य अधिक आदरणीय आहेत.
(आता तात्यानेच ह्या धाग्याचा खफ करायचा ठरवले, तर आम्ही तरी काय करणार ?)
-- मिसळभोक्ता
24 Aug 2009 - 2:48 pm | गणपा
नेने तै,
नैवेद्याच म्हणशील तर एकविरा आईला कोंबडी, चिंबोर्यांचा नैवेद्य दाखवतात.
मराठी आंतरजालीय जगतातच गणपतीला कोळंबीचा नैवेद्य दखवल्या वाचलेले स्मरते. सापडल्यस दुवा देइनच.
24 Aug 2009 - 9:58 pm | सखी
खूप वर्षांपूर्वी दुरदर्शनवरच्या एका मुलाखतीत महाराष्ट्रातल्या काही भागात बहुतेक विदर्भात आणि काही कोळी वस्तीत गौरी गणपतीला सामीश नेवैद्य दाखवतात असे ऐकल्याचे आठवते. ज्यांची मुलाखात होती त्या बाईंनी शबरीचेच उदाहरण दिले. आणि वर तात्या आणि बिका म्हणाले तसे आपण जे जे खातो ते सगळे देवाला अर्पण करून खावे, म्हणून हे लोक ते जे नेहमी खातात त्याचाच नेवैद्य दाखवतात. यावरुनच फक्त आपण जितके काही आतापर्यंत पाहीले आणि अनुभवले याच्या पलीकडेही जग असते, आणि रोजच आपल्या माहीतीत भर पडते, हे मलातरी तेव्हा कळाले.
24 Aug 2009 - 1:42 pm | ज्ञानेश...
निरुत्तर झालो. :(
"Great Power Comes With Great Responsibilities"
24 Aug 2009 - 1:46 pm | विंजिनेर
हुर्रर्रऽऽ हा.... पोरेहो.. काय गलाटा मचवून राहला है?'
निंवात बाप्पाच्या नैवेद्याचे मोदक खायचे सोडून काहून जवळा-मोदक वाद घाल्ता?
दोन्ही खा आनी पडा चिप....
सर्व धर्म सारखे... आमलेट..
24 Aug 2009 - 1:53 pm | अवलिया
कृपया अवांतर चर्चा करु नये.
आधीच भुक लागली आहे, त्यात अजुन वेगवेगळ्या खाद्य पदार्थांची नावे घेवुन डिवचु नये.
ज्यांना मोदकाचाच नैवेद्य दाखवायचा आहे त्यांनी मोदकाचा दाखवा.
ज्यांना जवळाचा दाखवायचा त्यांनी जवळाचा दाखवा.
ज्यांना दोन्ही दाखवायचा त्यांनी मोदकात सारण म्हणुन जवळाची चटणी भरावी. (संमतीसाठी संस्कृत श्लोकांचा आधार आहे, समजणार नाही आणि तात्या अवांतर म्हणुन उडवुन टाकेल म्हणुन दिले नाही)
सगळ्यांनी नैवेद्य दाखवल्यावर प्रसाद भक्षण करतांना एक घास "हा नानाच्या वाटेचा... " असे म्हणुन खाणे, अन्यथा पाप लागेल. ( पुन्हा एकदा.. संमतीसाठी संस्कृत श्लोकांचा आधार आहे, समजणार नाही आणि तात्या अवांतर म्हणुन उडवुन टाकेल म्हणुन दिले नाही)
(प पु अवांतरशास्त्री) अवलिया
============
काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?
24 Aug 2009 - 1:57 pm | पक्या
तु़ळजापूरला भवानी मातेला मटणाचा नैवेद्य दाखवतात.
24 Aug 2009 - 1:58 pm | पर्नल नेने मराठे
अहो पक्या विषय बाप्पाचा नैवेद्य आहे.
चुचु
24 Aug 2009 - 2:01 pm | पक्या
>>अहो पक्या विषय बाप्पाचा नैवेद्य आहे.
सर्वत्र देव एकच आहे.
24 Aug 2009 - 7:50 pm | llपुण्याचे पेशवेll
>>सर्वत्र देव एकच आहे
हो म्हणून गणपतीला साडी आणि देवीला धोतर नेसवत नाहीत. देवीला साडीच नेसवतात आणि गणपतीला धोतरच नेसवतात.(अलीकडे स्वेटर पण घालतात).
पुण्यातल्या काही गणपतींच्या मूर्ती पैलवानाच्या वेषात लंगोटीवर उभ्या असलेल्या आहेत. त्यामुळे देव देवतांनुसार त्याना केल्या जाणार्या उपचार आणि नैवेद्यात भेद हा आहेच.
त्यामुळे चुचूताइंचा मुद्दा योग्य आहे.
मटण, चिंबोर्या यांचा नैवेद्य एकविरादेवी, खंडोबा वा इतर देवताना दाखवत असतीलही पण गणपतीला दाखवलेला मी अजून तरी पाहीलेला नाही.
दिपालीताईनी गणपतीच्या नैवेद्याविषयी विचारले आहे तर त्याला उत्तर असे
१. उकडीचे मोदक: यात तांदूळाच्या पिठीची उकड आणि ओल्या नारळाचे सारण असते
२. गव्हाच्या उकडीचे मोदकः ही पद्धत विदर्भ मराठवाड्यात जास्त असावी असे वाटते. यात कणकेच्या पारीत ओल्या नारळाचे सारण भरतात.
३.तळलेले मोदकः हे खोबर्याचे सारण भरलेले, कणकेची पारी असलेले आणि तळले ले असतात.
४. खव्याचे मोदकः खव्यापासून बनवलेले असतात.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
24 Aug 2009 - 7:58 pm | बाकरवडी
सहमत !
:B :B :B बाकरवडी :B :B :B
24 Aug 2009 - 8:17 pm | ब्रिटिश टिंग्या
असेच म्हणतो!
>>हो म्हणून गणपतीला साडी आणि देवीला धोतर नेसवत नाहीत. देवीला साडीच नेसवतात आणि गणपतीला धोतरच नेसवतात.
हे आवडले! :)
जियो पुप्या!
24 Aug 2009 - 1:57 pm | पर्नल नेने मराठे
माझ्या ऐकिवात असे आहे कि काहि मासाहारी खाणारर्या लोकामधे देवीला मासाहारी नैवेद्य दाख्विला जातो. त्याचवेळी बाप्पाच्या मुखासमोर रुइचे पान लावतात.,कारण बाप्पाला ते दिसु नये म्हणुन.
चुचु
24 Aug 2009 - 1:59 pm | दिपाली पाटिल
चांदणी वाटप केंद्र आज बंद आहे कां??? ...उगाचच अवांतर चर्चा चालु आहे...मी चांदणी देऊ शकते कां?? किंवा त्यासंदर्भात कोणाशी संपर्क साधावा??
दिपाली :)
24 Aug 2009 - 2:07 pm | पर्नल नेने मराठे
हिला योग्य मार्गदर्शन मिळावे मी एवढी झटतेय न हिला चांदण्याच पड्लेय. ~X(
चुचु
24 Aug 2009 - 2:06 pm | sneharani
aamchyakade ganapatila Khir(gavachi), Modak yancha nevaidya dakhavatat.
24 Aug 2009 - 2:12 pm | पक्या
चर्चा अवांतर वाटत नाहिये.
गणपती ला फक्त मोदकांचाच नैवेद्य दाखवतात की अजुन ही काही असतं,??
ह्याच अनुषंगाने चर्चेचे मुद्दे पुढे येत आहेत.
हं आता नैवेद्याला काय नसतं असं विचारलं नसल्याने प्रतिसाद क्र. २ पासून पुढील सर्वच प्रतिसाद अवांतर ठरू शकतात. :)
स्नेहारानीचा प्रतिसाद वगळता.
24 Aug 2009 - 2:28 pm | दिपाली पाटिल
गणपतीला जवळा नी अजुन कसले कसले नैवेद्य दाखवलेले माझ्यातरी ऐकिवात नाही...जर तुम्ही दाखवता तसा नैवेद्य ते फक्त सांगायचे आहे हवं असल्यास पाकृपण टंका,पण त्यासाठी दाखले द्यायची गरज नसावी असे मला वाटते...
त्यामुळे बरंच काही अवांतर आहे असं माझं मत आहे.
दिपाली :)
24 Aug 2009 - 2:32 pm | पर्नल नेने मराठे
गणपतीला जवळा नी अजुन कसले कसले नैवेद्य दाखवलेले माझ्यातरी ऐकिवात नाही...जर तुम्ही दाखवता तसा नैवेद्य ते फक्त सांगायचे आहे हवं असल्यास पाकृपण टंका,
:O :S पाकृ :(
पण त्यासाठी दाखले द्यायची गरज नसावी असे मला वाटते...
त्यामुळे बरंच काही अवांतर आहे असं माझं मत आहे.
:D च्यायला उगाच एवढी भान्ड्ले
चुचु
24 Aug 2009 - 2:36 pm | विजुभाऊ
बहुजन समाजाचे जे देव आहेत ते बहुतेक मांसाहारी आहेत. उदा: खंडोबा / भैरोबा / मरीआई /
उच्चवर्गीय समाजाचे देव आहेत ते बहुतेक शाकाहारी आहेत. गणपती/विष्णू / शंकर वगैरे
भारतीय जातीव्यस्थेचा देवांवरसुद्धा एवढा गाढा प्रभाव पडला आहे
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
24 Aug 2009 - 2:42 pm | प्रशांत उदय मनोहर
शाकाहार/मांसाहार किंवा कांदा-लसूण चालणे न चालणे हे थोड्यावेळासाठी बाजूला ठेवू.
देवाला अर्पण करताना (मग नैवेद्य असो किंवा सगुण उपासनेतली इतर उपचारद्रव्ये असोत) "समर्पण" वृत्ती आणि भक्तिभाव असणं महत्त्वाचं. उदा. प्रसादाचं पात्र देवासमोर नैवेद्यासाठी ठेवल्यावर त्याकडे पाहून "अरे वा! आज कंदी पेढे वाटतं!" असा विचार येतो तेव्हा तो "कंदी पेढा"च राहतो, "प्रसाद" बनत नाही कारण आपलं मन त्याला "प्रसाद" म्हणून स्वीकारण्यापेक्षा "कंदी पेढा" म्हणून स्वीकारतं. प्रसादाला प्रसाद म्हणून स्वीकारण्याची मनाची अवस्था फार कमी लोकांची होते. ज्यांची होते ते भाग्यवान.
आपल्याला खायला/प्यायला जे चालतं ते सगळं देवाला चालतं. किंबहुना, पूर्वी देवाला समर्पित केल्याशिवाय काहीच खात/पीत नसत. माझ्या वैयक्तिक मतानुसार गटारी अमावस्या हे १ नंबरचं फ़्रॉड आहे. जे अन्न श्रावणात ग्रहण करणं पाप आहे, ते इतर दिवशी ग्रहण करणं पुण्य होऊ शकत नाही. इतर वेळेला ते खातापिताना जर मनात पाप नसेल तर श्रावणातही तसं करताना पापाची भावना यायला नको.
त्यामुळे श्री विसोबा खेचर यांच्या मतांशी संपूर्ण सहमत आहे.
आपला,
(सविस्तर) प्रशांत
---------
एक मी आभाळ आहे ठेविले पंखांत माझ्या, सांगते मज हे न क्षितिज न बिंदु तुझिया थांबण्याचा
24 Aug 2009 - 3:22 pm | सूहास (not verified)
देवापुढे काय -काय ठेवायच तो देवाचा वैयक्तीक प्रश्न आहे ..त्यामुळे पास...
बाकी एक गाणे आठवुन गेले....
देवा पुढं माणुस ..पाला-पाचोळा र...
सू हा स...
24 Aug 2009 - 6:39 pm | लवंगी
भक्तिभावाने दिलेल सगळ चालत ग बाप्पाला..
माझ्या माहेरी नैवेद्यात कंदा-लसूण चालतो. मोदक, मुटके, वाल्-अळूची भाजी, पुरी-भाजी, वरण्-भात, चटणी असा नैवेद्य दाखवतात.
सासरी नैवेद्यात कंदा-लसूण नाहि वापरत. मोदक, नेवर्या, घश्शी, अळूवडी, मडगणे, सुक्के, फोडी इत्यादि कोकणी पदार्थ असतात.
माझा नैवेद्य दोन्हिकडचे काहि पदार्थ आणी माझे स्वतःचे नविन काहि अशी भेळ असते. यावर्षी मी मोदकांसोबत मुगाची डाळ, गव्हाचा रवा आणी गुळ घालून खीर बनवली होती . इथे भाजीच अळू मिळत नाहि म्हणून २ महिन्यापूर्वी अळुचे कांदे लावून वाल-अळूची भाजीपण बनवली. मला वाटत अशा उत्सवातुनच आपण परंपरा जपतो कि नै! म्हणून तुझी आई-सासू जे करत असतील ते जरूर दाखव नैवेद्यात.
24 Aug 2009 - 11:54 pm | विसोबा खेचर
भक्तिभावाने दिलेल सगळ चालत ग बाप्पाला..
एवढी साधी बाब काही लोकांच्या लक्षात येत नाहीये याचं आश्चर्य वाटतं!
तात्या.
24 Aug 2009 - 7:36 pm | टारझन
काय पाणचट पणा चालू आहे रे मुला-मुलींणो ? तो ही आम्हाला सोडून ?
नौवेद्यात खाणेवल काहीही द्या .. पण भरपूर द्या .. संकोच करू नका ...
-(टिंगलमुर्ती) टारया
24 Aug 2009 - 7:55 pm | आशिष सुर्वे
मुख्य विषय राहिला बाजूलाच!
काथ्याकूट भलतीकडेच कूटत चालले आहे!
गणपती बाप्पा मोरया !!
-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
24 Aug 2009 - 7:59 pm | चित्रा
(धागा कसला आणि चर्चा कशावर चालू आहे? )
माझ्या माहेरी गणपती कोकणातील मूळ घराण्यात बसवत, त्यामुळे आमच्याकडे गणपती नसत. पण गणपती नसत म्हणजे फक्त प्रतिष्ठापनेची पूजा नसे, बाकी सगळे तसेच, म्हणजे पाच दिवस आरत्या, नैवेद्य वगैरे सगळे व्हायचे. ऋषिपंचमीला बर्याच भाज्या एकत्र करून भाजी केली जाते तशी भाजी हमखास व्हायचीच. ती आमच्या घरचे लोक आवडीने खातात.
सासरी गणेशचतुर्थीला पक्वान्न म्हणून मुख्यत्वे उकडीचे मोदकच असतात, आणि नेहमी देवकार्याला होतो तसा स्वैपाक वगैरे. आणि गौरींना एका दिवशी भाकरी आणि शेपूच्या भाजीचा नैवेद्य असतो आणि दुसर्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक.
24 Aug 2009 - 8:13 pm | रामदास
पुष्पम् फलम् तोयम्
मनापासून अर्पण करू ते.
24 Aug 2009 - 9:17 pm | लिखाळ
पेशवे, चित्राताई आणि काहींनी दिलेले प्रतिसाद आवडले.
उकडीचे मोदक, सणाचा रुचकर बेत, मोदकाच्या आकाराचे पेढे, पंचामृत, फोडणी दिलेले पंचामृत, गुळ-खोबरे, दूध-साखर, फळे इत्यादी.
गणपती विसर्जन करताना त्याला वाटेमध्ये खाण्यासाठी दही-पोह्याची शिदोरी आठवणीने :)
-- लिखाळ.
'वाटते आहे', 'कुठेतरी वाचले आहे', अशी संदिग्ध विधाने करणार्याला म. संकेतस्थळां वरच्या चर्चेत मानाचे पान असते असे वाटते ;)
31 Aug 2009 - 12:56 pm | पर्नल नेने मराठे
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4946470.cms
=))
चुचु
31 Aug 2009 - 1:31 pm | दिपाली पाटिल
छान धागा आहे गं... किती साधा प्रश्न होता माझा...लोकांना एवढं साधं नाही समजलं नी भलतंच पुराण चालु केलं. बाकी अगदी अचुक धागा दिलास.
दिपाली :)
31 Aug 2009 - 2:35 pm | प्रसन्न केसकर
मोदकाबरोबरच पंचखाद्य असते. त्याला रेसीपी वगैरे नाही. फक्त खोबरे, बदाम, खडीसाखर, काळ्या मनुका आणि खारीक एकत्र करायचे.
शिवाय अनंतचतुर्दशीला विसर्जन करताना किसलेल्या खोबर्यात पीठीसाखर मिसळुन खिरापत असते. त्याशिवाय वाटली डाळ पण. तिची रेसीपी मला नक्की माहिती नाही. पण मधे एकदा मिपावर कुणीतरी दिली होती तशीच काहीशी असते.