सुंदर चित्रे...

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in जनातलं, मनातलं
2 Mar 2008 - 8:35 pm

रवि परांजपे ह्यांची...

mor

त्यांची इतर चित्रे पण छान आहेत...

एक मराठी कलाकार म्हणून त्यांच्याबद्दल अभिमान आणि ममत्व वाटते...

त्यांच्या चित्रांची मी पंखा आहे...

प्रतिक्रिया

सर्किट's picture

3 Mar 2008 - 7:10 am | सर्किट (not verified)

काय सुंदर चित्र आहे ! वा ! इतक्या लहान मुलांना इतका सुंदर मोर कसा काढता येतो ??

रवीच्या किंडर गार्टन च्या टीचर ला भेटायला हवे !

रवि परांजपे जेव्हा दुसर्‍या वर्गातून तिसर्‍या वर्गात जातील तेव्हा किती छान चित्रे काढतील नाही ???

- सर्किट

धनंजय's picture

3 Mar 2008 - 9:18 am | धनंजय

त्यांच्या चित्राची शैली सोपेपणा दाखवून चकवते. माझ्या मते मोराच्या चित्रात रंगसंगती आणि घटकांची मांडणी मोठी कुशल आहे. वाटल्यास हे चित्र बघा :
cat in chawl
मग मोराच्या चित्राकडे पुन्हा बघा. पुन्हा बघूनही तुम्हाला ते आवडेलच असे नाही. पण आवडण्या/न आवडण्यासाठी प्रौढ कारणे लागतील. "चित्र बाळबोध आहे," हे कारण पुरणार नाही, असे वाटते.

चित्रकारांच्या बाबतीत माझे अज्ञान फार आहे. रवी परांजपे यांची ओळख करून दिल्याबाबत सृष्टीलावण्या यांना धन्यवाद.

विसोबा खेचर's picture

3 Mar 2008 - 9:49 am | विसोबा खेचर

पण आवडण्या/न आवडण्यासाठी प्रौढ कारणे लागतील.

हा हा हा! खरं आहे... :)

"चित्र बाळबोध आहे," हे कारण पुरणार नाही, असे वाटते.

सहमत आहे...

चित्रकारांच्या बाबतीत माझे अज्ञान फार आहे. रवी परांजपे यांची ओळख करून दिल्याबाबत सृष्टीलावण्या यांना धन्यवाद.

हेच म्हण्तो!

तात्या.

सृष्टीलावण्या's picture

3 Mar 2008 - 4:04 pm | सृष्टीलावण्या

महोदय,

चित्रकारीला वयाचे बंधन नसते आणि ती समजून घ्यायला वकूब लागतो. जो दुर्दैवाने परमेश्वराने
प्रत्येकालाच दिलेला असतो असे नाही. पण आपल्या मर्यादा ज्याने त्याने स्वत:च ओळखल्या पाहिजेत.

नाहीतर लोक म्हणतात. "गा.गु.च.का."

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

विसोबा खेचर's picture

3 Mar 2008 - 8:49 am | विसोबा खेचर

मोराचं चित्र छानच आहे..

तात्या.

केशवराव's picture

3 Mar 2008 - 2:43 pm | केशवराव

सृष्टी लावण्या ,
अतीशय चांगल्या कलाकाराशी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

--------- केशवराव.

धमाल मुलगा's picture

3 Mar 2008 - 2:48 pm | धमाल मुलगा

रवि परा॑जप्या॑च्या कु॑चल्याचे फटकारे मिपावर देखील अवतरले हे पाहून छान वाटले.

सृष्टीताई धन्यवाद.

आनंद घारे's picture

3 Mar 2008 - 10:47 pm | आनंद घारे

हे एक आदरणीय ज्येष्ठ चित्रकार आहेत. नवचित्रकलेच्या प्रवाहाच्या विरुद्ध ठामपणे उभे राहून त्यांनी अभिजात शैलीचा पाठपुरावा केला आहे. त्यांचे सुंदर चित्र पाहून चांगले वाटले, पण त्यावरील काही प्रतिक्रिया अभिरुचीपूर्ण नव्हत्या.

आनंद घारे's picture

3 Mar 2008 - 10:57 pm | आनंद घारे

"नवचित्रकलेच्या प्रवाहाच्या विरुद्ध " ऐवजी 'नवचित्रकलेच्या नावाने कुरूपतेचे कौतुक करण्याच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध" असे म्हणणे जास्त योग्य होईल.

चतुरंग's picture

4 Mar 2008 - 12:43 am | चतुरंग

मोराचे आणि वरती धनंजयने दिलेले दोन्ही चित्रे सुरेखच आहेत. मोराच्या वरती रेखाटलेली फांदी जणू दुसरा मोरच वाटते आहे!

रवि प. यांची शैली अनोखी आहे. सशक्त रेषा, सोपी आणि ओघवती मांडणी, त्रिमिती दाखवण्याचे वेगळे कसब, वेगवेगळे पोत कुंचल्यातून साकारण्याची ताकद.
ते एक उत्तम चित्रकार आहेतच, शिवाय एक चांगले कला समीक्षक, लेखक आहेत, आणि ह्या पलीकडे जाऊन ते सामाजिक जाणीव असलेले एक नागरिकही आहेत. दै.सकाळच्या बाल चित्रकला स्पर्धेला त्यांचे कित्येक वर्षे मार्गदर्शन लाभते आहे.

त्यांच्या चित्रांची ओळख मला लहानपणीच दिनदर्शिकांवरच्या अनोख्या चित्रातून झाली. त्यानंतर ते वेगवेगळ्या चित्रातून भेटतच गेले.
सुदैवाने शाळेत मला इ.पाचवी पासूनच, राष्ट्रपती पारितोषिक विजेते कै.अंबादास जगन्नाथ घारे आणि उत्कृष्ट व्यक्तिचित्रण (पोर्ट्रेट) करणारे वसंत विटणकर हे दोघे चित्रकला शिक्षक म्हणून लाभले हे माझे भाग्य!
माझी आई ही सुध्दा एक उत्तम चित्रकार आहे. त्यामुळे रंग-रेषांची ओळख लवकर झाली.

सृष्टीलावण्यताई हा विषय इथे आणल्याबद्दल आभार.

चतुरंग

प्राजु's picture

4 Mar 2008 - 9:02 am | प्राजु

पिसारच्या छ्टा खूप सुंदर आहेत. धन्यवाद सृष्टीताई..
- (सर्वव्यापी)प्राजु

सर्किट's picture

4 Mar 2008 - 9:08 am | सर्किट (not verified)

सृष्टिलावण्यताई/दादा/काका/मावशी,

तुमच्या आदर्शाला उगाच काहीच्याबाही बोलून गेल्याबद्दल क्षमस्व !

च्यमारी ह्या चित्रकलेतले आम्हाला काही कळत नाही.

बहुतांश सर्वसाधारण लोकांना जे आवडते, त्याची आम्हाला किळस येते.

आमचे डोके बिघडलेलेच आहे, हे नक्की !!

एक उदाहरण देतो. हल्लीच आम्ही साल्वादोर दालीचे मेल्टिंग क्लॉक्स बघितले, खूप आवडले. त्यावर आमच्या मित्राने आम्हाला झाडले. त्यात काय दिसते असे आम्हाला विचारले.

म्हटलं, घड्याळ म्हणजे वेळ. असा वितळणारा वेळ पाहताना मजा वाटली. असा आमचा वेळ वितळून जावा, असे कुठेतरी वाटले.

तर म्हणतो कसा, तुम्हा इंटलेक्च्युअल लोकांना ह्य असल्या वेड्यावाकड्या चित्रांत काहीतरी सुंदरच दिसणार. तो दाली एक यडपट आणि तुम्ही शंभर यडपट !

आता, एक स्पष्ट करतो, ते चित्र पाहिपर्यंत मला डाली कोण हे माहितीदेखील नव्हते.

आणि हे तुम्ही दिलेले चित्र पाहीपर्यंत रवी परांजपे ज्येष्ठ आहेत की कनिष्ठ, नक्की कितव्या वर्गात हे देखील माहिती नव्हते.

मुळात चित्रकार कोण आहे हे माहिती नसताना चित्राविषयी दिलेला अभिप्राय अधिक योग्य नाही का ?

असो. आम्हाला ह्या चित्रात दिसले ते आम्ही लिहिले. चित्रकार मराठी आहे, म्हणून उगाच त्याच्या चित्राविषयी अभिमान का बरे ? चित्र पाहायचे, आवडले तर हो म्हणायचे, नाही तर नाही !

आमचे तर बुवा असे आहे.

- सर्किट

सृष्टीलावण्या's picture

4 Mar 2008 - 11:09 am | सृष्टीलावण्या

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

धनंजय's picture

4 Mar 2008 - 10:12 pm | धनंजय

की येथे तुम्ही तुम्हाला झाडण्यासारख्या मित्रासारखे वागत आहात. मोराचे चित्र तुम्हाला वाटले त्यापेक्षा गुंतागुंतीचे आहे. तुम्ही जितपत प्रयत्न दालीच्या चित्राचा आस्वाद घेण्यात खर्चिला, तितपत या चित्राचा आस्वाद घेण्यातही खर्चावा. नपेक्षा तुम्हाला झाडणारा मित्रही योग्यच बोलत होता, असे मान्य करावे - त्यानेही "चित्र बघितले, आणि नावडले म्हणून ना म्हटले", नाही का?

मराठी माणूस असल्याचा चित्रकलेशी संबंध नाही हे तुमचे म्हणणे खरे असले तरी, या त्याचा या संकेतस्थळाशी संबंध आहे. साल्वादोर दालींच्या चित्रांचे मोठे संग्रहालय बार्सेलोना(स्पेन)मध्ये आहे. त्यांची चित्रे सुंदर असण्याचा त्यांच्या स्पॅनिश असण्याशी संबंध नाही म्हणा, पण त्यांचे संग्रहालय स्पेनमध्ये कौतुकाने असण्याशी आहे. तसेच कौतुक या चित्रकाराचे मिपा या मराठी संकेतस्थळावरती होत आहे.

वरील मोराचे चित्र आणि खालील दालीचे प्रसिद्ध चित्र दोन्ही आवडण्यासारखी आहेत, त्यात इंटलेक्च्युअल असण्या-नसण्याचा काय संबंध?
persistence of memory

चतुरंग's picture

4 Mar 2008 - 10:59 pm | चतुरंग

कोणत्याही कलाकाराच्या सर्व कलाकृती उच्च दर्जाच्या असतातच असे नाही. प्रत्येक कलाकृती ही प्रत्येकाला आवडलीच पाहीजे असेही नाही.
पण आवड/नावड का हे मात्र सांगता यायला हवे हे अमान्य नसावे.
मोराचे चित्र हे प्रत्येकाला आवडेलच असा आग्रह नाही.
तुम्ही म्हणता -
>>आणि हे तुम्ही दिलेले चित्र पाहीपर्यंत रवी परांजपे ज्येष्ठ आहेत की कनिष्ठ, नक्की कितव्या वर्गात हे देखील माहिती नव्हते.
मुळात चित्रकार कोण आहे हे माहिती नसताना चित्राविषयी दिलेला अभिप्राय अधिक योग्य नाही का ?

असे जर असेल, तर ज्या कलाकाराबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही त्याच्या चित्राबद्दल - (ते केजी तून वरच्या वर्गात..... वगैरे) अशी तद्दन खालच्या दर्जाची टवाळ टिप्पणी करण्याचे धार्ष्ट्य मला अचंबित करुन गेले! अशा वेळी खरेतर तुम्हाला ते का आवडले नाही ह्याची कारणे देता आली असती तर बरे झाले असते.

दाली च्या चित्राबद्दल धनंजयने लिहिलेच आहे. त्यामुळे मी त्यावर काही भाष्य करत नाही.
इंट्लेक्चुअल असणे/नसणे ह्याचाही इथे काहीही संबंध नाही.

बहुतांश सर्वसाधारण लोकांना जे आवडते, त्याची आम्हाला किळस येते.

ह्या तुमच्या वाक्याबद्दलही मी आपल्याला स्पष्टीकरण मागू इच्छितो. आपण असाधारण असाल त्याबद्दल आमचे काहीच म्हणणे नाही पण इतरांना सर्वसाधारण ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? जालावरच्या दुनियेत अनेक पात्रे वावरत असतात त्यांची काहीही ओळख नसताना त्यांचा असा उपमर्द करण्याचे काहीही कारण आम्हाला दिसत नाही.

चतुरंग

विसोबा खेचर's picture

5 Mar 2008 - 9:54 am | विसोबा खेचर

अशी तद्दन खालच्या दर्जाची टवाळ टिप्पणी करण्याचे धार्ष्ट्य मला अचंबित करुन गेले! अशा वेळी खरेतर तुम्हाला ते का आवडले नाही ह्याची कारणे देता आली असती तर बरे झाले असते.

सहमत आहे...

ह्या तुमच्या वाक्याबद्दलही मी आपल्याला स्पष्टीकरण मागू इच्छितो. आपण असाधारण असाल त्याबद्दल आमचे काहीच म्हणणे नाही पण इतरांना सर्वसाधारण ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?

सहमत आहे..

आमच्या फारिदा खानुमच्या आज़ जाने की जि़द ना करो या गाण्यावरील लेखालाही सर्कीटने काही कारण नसताना मिपावरील वाचकांना ऐरेगैरे म्हटल्याचे आठवते!

माझ्या मते सर्कीटरावांनी वारंवार असा भिकारचोटपणा करू नये...ते शहाणे असतील/आहेत तर त्यांच्या घरचे!

असो,

तात्या.

सर्किट's picture

5 Mar 2008 - 10:32 pm | सर्किट (not verified)

ह्या तुमच्या वाक्याबद्दलही मी आपल्याला स्पष्टीकरण मागू इच्छितो. आपण असाधारण असाल त्याबद्दल आमचे काहीच म्हणणे नाही पण इतरांना सर्वसाधारण ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?

"सर्वसाधारण" ह्या शब्दामुळे आपला गैरसमज झाला असावा असे वाटते.

मला "नॉर्मल" ला दुसरा शब्द सापडला नाही.

मला कुणाचाही उपमर्द करायचा नव्हता.

- सर्किट

चतुरंग

सुधीर कांदळकर's picture

4 Mar 2008 - 2:03 pm | सुधीर कांदळकर

भाषा असते. मोराचे चित्र सुरेख आहे. निसर्ग (झाड आणी मोर) आणि कल्पना (पिसा-याचे अनोखे, वेगळे रंग, भौमितीक आकृत्या) यांची मनोहर सरमिसळ (पुन्हा मिसळच) झालेली आहे. मला देखील चित्रातले फारसे कळत नाही. परंतु जसे भिडले तसे लिहिले.

मिपावरील नव्या चित्रकार सदस्याताईनी रसास्वाद लिहिला तर बरे होईल. माझ्या मडक्यात किती शिरले ते तरी कळेल.

धन्यवाद. शुभेच्छा.

चित्तरंजन भट's picture

4 Mar 2008 - 2:49 pm | चित्तरंजन भट

सुंदर चित्र आहे. फ्लिकरदुव्यावरील इतर चित्रे, प्रकाशचित्रेदेखील बघितली. आवडली. धन्यवाद!

विजुभाऊ's picture

4 Mar 2008 - 3:22 pm | विजुभाऊ

सृष्टीलावण्य ताई
महोदया,

"चित्रकारीला वयाचे बंधन नसते आणि ती समजून घ्यायला वकूब लागतो. जो दुर्दैवाने परमेश्वराने
प्रत्येकालाच दिलेला असतो असे नाही. पण आपल्या मर्यादा ज्याने त्याने स्वत:च ओळखल्या पाहिजेत.
नाहीतर लोक म्हणतात. "गा.गु.च.का.""

मला पहील्या दोन ओळी कळाल्या....
पण तिसर्या ओळीत "गा.गु.च.का."" लिहिले आहे "गा.गु.च.का."" म्हणजे काय...( तात्यानु बघतांव ना आमचो मराठी भाषेचो घोळ.....)
तुमचो एक अज्ञानी मराठी पात्राव
विजुभाऊ

लिखाळ's picture

4 Mar 2008 - 9:03 pm | लिखाळ

वा ..

रवी परांजप्यांची बाकीची चित्रे सुद्धा त्यांच्या संकेतस्थळावर जावून पाहिली.
फारच छान आहेत.

चित्रकलेतल्या विविध शैलींविषयी आपण काही लिहिलेत तर वाचायला आवडेल.
-- लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

मदनबाण's picture

5 Mar 2008 - 11:26 am | मदनबाण

मोराचे चित्र अतिशय सुंन्दर आहे.मोराची मान,डोळे आणि डोक्यावरील तुरा तर फारच आवडला.
चित्राची रंगसंगती अतिशय सुंदर आहे.
सृष्टिलावण्यजी या सुंदर चित्र मि.पा वर दिल्या बद्धल आपल्याला धन्यवाद.....

आपल्या इथे फक्त अनवाणी चालणारे आणि हिंदु देव-देवतांची नग्न चित्रे काढणारे तथाकथित चित्रकारांचा बोलबाला आहे !!!!!आणि अशा या चित्रकाराची अन्य चित्रे (सर्व सामान्यांना समजणारी ?) कोट्यावधी रुपयांच्या
लिलावांनी विकली जातात...(यातील बहुसंख्य चित्रे पाहिल्या नंतर त्या चित्रांचा विषय कोणता असतो हे समजण्यासाठी बहुतेक चित्रकलेत पी.एच.डी करावी लागेल.....)

(राजा रविवर्मा,दीनानाथ दलाल,रघुवीर मुळगावकर यांचा चित्र भक्त)
मदनबाण

नंदन's picture

5 Mar 2008 - 11:49 am | नंदन

हा ओढून-ताणून लावलेला किंवा बादरायण संबंध असेल, पण या चित्राच्या वरील अर्ध्या भागात झाडाच्या सुकलेल्या, रंगहीन फांद्यांचा मोरासारखा (तुर्‍याच्या जागी पांढरी फुले, फांद्यांचा 'पिसारा' खाली झुकलेला) आकार आहे आणि त्याची आरशातली प्रतिमा वाटावी असा रंगीत मोर खाली. चित्राच्या डावीकडे दोघांची सरमिसळ झालेली. [अर्थात, यातून अनेक प्रतीकात्मक अर्थ काढता येतील.]

चित्रकलेत मला मल्लखांबाइतकीच गती (किंवा तिचा अभाव) आहे, त्यामुळे हे निरीक्षण कितपत बरोबर आहे, ते माहीत नाही.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मुक्तसुनीत's picture

5 Mar 2008 - 11:54 am | मुक्तसुनीत

तुम्हाला फारच "दिसते". आणि ते तुम्ही उत्कृष्ट रीतीने "दाखविता". :-)