माझे पहिले कवितेचे पुस्तक Nightingale in the Shadows गुलामांच्या भाषेतच

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
18 Dec 2025 - 11:22 am

चित्र
या महिन्यात मी माझे पहिले पुस्तक इंग्रजी भाषेत प्रकाशित केले. त्यामागची कथा अशी आहे— सुमारे वर्षभरापूर्वी माझ्या सौ.ची बहीण, वय 80च्या पुढे असलेली, मला म्हणाली: “विवेक, तुझ्या कविता उत्तम आहेत. त्या इंग्रजीत अनुवाद करून पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित कर. लागेल तर मी त्यांचे संपादन करून देईन.” माझ्या सौ.ची आतेबहीण, डॉ. उषा बंदे— आयआयएएस शिमला येथील माजी फेलो—गेल्या 50 वर्षांपासून विविध इंग्रजी वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमित लेखन करत आहेत. मराठी असल्यामुळे त्या दुर्गप्रेमीही आहेत. हिमाचलमध्ये स्थानिकांना देखील माहीत नसलेले 300 हून अधिक दुर्ग त्यांनी शोधून काढले आणि पुस्तकरूपाने प्रकाशित केले आहे.

मी जवळपास 40 कविता आणि तेवढ्याच गोष्टी इंग्रजीत स्वतः अनुवादित केल्या. आवश्यक वाटले तेथे ChatGPT ची मदत घेतली. डॉ. उषा बंदे यांनी स्वखुशीने त्या सुधारून दिल्या. सुरुवातीला एकच पुस्तक प्रकाशित करण्याचा विचार होता. पण अचानक BookLeaf Publishing चे जाहिरात पाहिले. 2000 रुपयांच्या आत ई-बुक आणि पेपरबॅक दोन्ही उपलब्ध. खर्च कमी असल्यामुळे आधी फक्त कवितांचे पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. गोष्टींचे पुस्तक नुकतेच दुसऱ्या प्रकाशकाला दिले आहे. दोन-तीन महिन्यांत तेही इंग्रजीत प्रकाशित होईल.
सौ.साठी लिहिलेली एक कविता इंग्रजीत अनुवादित झाल्यावर अधिक सुंदर वाटते.

Spring in Her Eyes”

Today, in the spring sun,
The whole world bathed anew.
From winter’s silent slumber,
Even the poem stirred and woke.

On the aging tree,
Fresh leaves gently unfurled.
In the fifth melodic note,
The koel sang her song.

Seeing her, I softly whistled.
Seeing me, she blushed—just a little.
No words, just glances,
And a smile tucked in her cheek.

Let there be storms,
Let worldly toil be endless—
Still, in her eyes,
Spring blossoms forever.

पुस्तक खरेदी करण्यासाठी लिंक.

https://amzn.in/d/bYns1hd - Amazon Link

https://ebooks.bookleafpub.com/product-page/nightingale-in-the-shadows - E-Book

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

युयुत्सु's picture

18 Dec 2025 - 11:38 am | युयुत्सु

अभिनंदन...

गवि's picture

18 Dec 2025 - 11:54 am | गवि

अभिनंदन.

पुढील वेळेसाठी एक बारीकशी सुचवणी.

डबल डॅश किंवा लांबडी डॅश ही खास चॅट जिपीटी आऊटपुटची निशाणी आहे. तुम्ही स्वतः भाषांतर केले असले आणि जिपीटीचा उपयोग मर्यादित सुधारणा किंवा बदल यांसाठी केला असेल, तरीही अशा खुणांमुळे तो थेट चॅट जिपीटी कॉपी पेस्ट मजकूर असल्याचे जाणवते. अशा लांब डॅशेस काढून टाकल्या तर बरे होईल.

उदा.

blushed आणि endless नंतर येणारे चिन्ह.

Seeing her, I softly whistled.
Seeing me, she blushed—just a little.
No words, just glances,
And a smile tucked in her cheek.

Let there be storms,
Let worldly toil be endless—
Still, in her eyes,
Spring blossoms forever.

विवेकपटाईत's picture

18 Dec 2025 - 1:06 pm | विवेकपटाईत

काही आधी अनुवाद करून मग चाट जीपीटी वर टाकल्या, त्यामुळे मोठ्या लाईन्स आहे.त्या मला ही आवडल्या..बाकी अधिकांश कविता चार सहा लाईन्स असल्याने गरज पडली नाही. उदा:

From Peepal to Money Plant

The peepal tree
left the village breeze behind.
In the city flat,
it became a money plant.

Packaged in Verse

I shape emotions,
sour-sweet, bitter-hot,
into neat, tempting parcels
of fast-food flavour,
and call them Poems.

रामचंद्र's picture

19 Dec 2025 - 12:12 am | रामचंद्र

'Spring in Her Eyes' कविता आवडली, चित्रदर्शी आहे.

खटपट्या's picture

19 Dec 2025 - 12:43 am | खटपट्या

अभिनंदन

स्वधर्म's picture

19 Dec 2025 - 1:38 pm | स्वधर्म

अभिनंदन

सोत्रि's picture

23 Dec 2025 - 9:06 am | सोत्रि

अभिनंदन, पटाईतकाका!!

- (गद्य) सोकजी