बघ
ती सावलीच ठरली वरचढ उन्हावरी बघ
माझाच जीव जडला माझ्या व्यथेवरी बघ
वारीत पांडुरंगा सावध रहा जरा तू
मारेल चोर डल्ला तुझिया विटेवरी बघ
म्हणतात जे मराठी चित्रपट अता न चाले
नसते पकड जराही त्यांची कथेवरी बघ
साहेब जे कधीही दिसले मुळी न मजला
होते हजर परंतू कायम पटावरी बघ
वाऱ्यामुळे खरेतर पडली कळी उमलती
आरोप त्या बिचाऱ्या आला दवावरी बघ
करतात यार आग्रह बहुतेक याचसाठी
मी बोलतो खरे ते, थोडी पिल्यावरी बघ
प्रतिक्रिया
21 Oct 2025 - 11:36 am | कर्नलतपस्वी
आवडली.
21 Oct 2025 - 3:04 pm | श्वेता२४
प्रत्येक अन प्रत्येक कडवे आवडले...
2 Nov 2025 - 10:07 am | स्वलिखित
आवडल्या गेली आहे
2 Nov 2025 - 10:58 am | नाहिद नालबंद
प्रतिसाद दिल्याबद्दल आपण सर्वांचे आभार, धन्यवाद !
5 Nov 2025 - 3:31 pm | स्वधर्म
आमच्या दुधगावच्या ईलाही जमादार यांची आठवण आली.