सोने एक लाखावर...

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in काथ्याकूट
23 Apr 2025 - 10:48 am
गाभा: 

काल २२ एप्रिल २०२५ रोजी सोन्याने एक लाख रुपयांचा टप्पा गाठला. जून २०२४ मध्ये सोने सत्तर हजार होते, तेंव्हा, वर्षभरात सोने एक लाखाचा टप्पा ओलांडेल असे अंदाज मी वर्तवला होता. सोने आता एक लाखावर गेले आहे. अर्थात आज ते थोडेसे उतरले आहे.

सोन्याच्या किमतींबाबतीतील काही वैयक्तिक, सार्वजनिक टप्पे सांगतो -

  • १९६४ साली सोने साठ रुपये तोळा होते.
  • १९७७ साली सोने ५०० च्या घरात होते.
  • २००५ साली (माझे लग्न झाले तेंव्हा) सोने ६००० होते.
  • २००७ साली पहिल्यांदा सोन्याने पाच आकडी किंमत गाठली होती.
  • आता सोन्याने सहा आकडी किंमत गाठली आहे.
  • सोन्याला सात आकडी किमंत गाठायला किती वर्षे लागतील?

गुंतवणुकीचे अनेक पर्याय असतात - जमीन, इमारती, सोने, शेअर्स, म्युच्युअल फंड्स, बँकांतील ठेवी, इत्यादी. त्यांपैकी सोने ही एक मृत गुंतवणूक आहे असे काही लोक म्हणतात. त्यांचे मत त्यांच्यापाशी; सोने हे काही केवळ गुंतवणुकीपुरतेच मर्यादित नाही.

कल्पना करा तुमच्याकडे दोन पर्याय आहेत -

  1. लाख-दीड लाखांचा फोन कानाला लावून एकजण बोलत आहे.
  2. बोटांत दोन अंगठ्या व वीसेक हजारांचा फोन कानाला लावून दुसरा एकजण बोलत आहे.

तुम्ही कोणता पर्याय निवडाल?

- (सोनंप्रेमी) द्येस्मुक् राव्

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Apr 2025 - 11:02 am | अमरेंद्र बाहुबली

वामनसाहेब, इतर गुंतवणुकीच्या तुलनेत सोने कमी वेगाने वर जाते असे एकले आहे. सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर नाही असेही वाचलेय. खरे का?

वामन देशमुख's picture

23 Apr 2025 - 4:40 pm | वामन देशमुख

वामनसाहेब, इतर गुंतवणुकीच्या तुलनेत सोने कमी वेगाने वर जाते असे एकले आहे. सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर नाही असेही वाचलेय. खरे का?

असे नाही. अति दीर्घ कालावधीसाठी सर्वच गुंतवणुका (एफडी नव्हे, सोने, काही ठिकाणच्या जमिनी, काही ठिकाणाची घरे, काही शेअर्स वगैरे) सर्वसाधारण सारख्याच वेगाने वाढतात.

आग्या१९९०'s picture

23 Apr 2025 - 11:04 am | आग्या१९९०

माझं वैयक्तिक मत. धातुरूपी सोन्यात मी कवडीचीही गुंतवणूक करत नाही. देशांचा विचार करता सुवर्णरोखे हा सध्याच्या सरकारने आणलेला सर्वात चांगला पर्याय होता, सरकारच्या अल्पदृष्टीकोणामुळे तो पर्यायही आता उपलब्ध नाही. गोल्ड ETF मध्ये तरलता खूप कमी आहे परंतु दुसरे चांगले पर्यायही नाहीत.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Apr 2025 - 11:20 am | अमरेंद्र बाहुबली

माझ लग्न झाल्यापासून मी बायकोला फक्त एकदाच अर्धग्राम सोने घेतलेय, त्यावरून घरात वादावादी होते, बायकान सोने इतके काय आवडते माहीत नाही. ह्याबदल्यात तुझ्या नावाने हा mf घेतलाय हा शेअर घेतलाय नी तो इतका वाढलाय तर त्याचे काहीही कौतुक नसते, मी सोन्याऐवजी त्यावेळी हिंडाल्को ३८० रूपयान घेतला होता जो आता ६०० पार करून ८० टक्के जास्तीचा परतावा देतोय.
सोने त्यावेळी ५०००० होते दुप्पट झाले आहे, पण घडणावळ, मोड जीएसटी धरून कितीला पडेल? (४ वर्शा आधि)

वामन देशमुख's picture

23 Apr 2025 - 5:36 pm | वामन देशमुख

बायकोला फक्त एकदाच अर्धग्राम सोने

आबा,

सोनं हे स्त्रीचं मन जिंकण्याचा उत्तम मार्ग आहे हं! तो मार्ग सोडू नका!

---

तुमचे समविचारी: माझ्या एका पुणेरी स्नेह्याला फ्लॅट्स घेत राहण्याचा नाद आहे. त्याची बायको म्हणते, त्या फ्लॅट्सच्या चाव्या मी काय गळ्यात घालून फिरु का?

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Apr 2025 - 6:46 pm | अमरेंद्र बाहुबली

खिक्क! सोन्याचा मुलम दिलेले खोटे दागिने द्यावे.

खिक्क! त्यापेक्षा सोन्याचा मुलामा दिलेल्या चाव्या द्याव्यात.
नेकलेस करा किंवा छल्ला. दोन्हिलाही चालेल.

आग्या१९९०'s picture

23 Apr 2025 - 11:29 am | आग्या१९९०

सोन्याने मला वर्षाला १००% परतावा दिला तरी मी धातुरुपी सोन्यात गुंतवणूक करणार नाही. आपण देशाला परकीय चलन देऊ शकत नसलो तरी निदान वाचवू तर नक्कीच शकतो. ज्यांना देशाला भिकेला लावायचे असेल त्यांनी धातुरुपी सोन्यात नक्कीच गुंतवणूक करावी.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Apr 2025 - 11:36 am | अमरेंद्र बाहुबली

सोन्यात गुंतवणूक बायकांमुळे करावी लागते, दागिने मिरवायला बायकाना आवडतात, लहान भावाचे ४ महिन्याआधी लग्न झाले त्याने कर्ज काढून सोने घातले, त्यावरून माझ्या घरात गृहयुद्ध पेटले होते.

वामन देशमुख's picture

23 Apr 2025 - 4:30 pm | वामन देशमुख

ज्यांना देशाला भिकेला लावायचे असेल त्यांनी धातुरुपी सोन्यात नक्कीच गुंतवणूक करावी.

आग्या राव,

परकीय चलन काही फक्त सोन्यातच खर्च होते का? आयात केलेली इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स तर अल्पकाळातच कचरा होतात!

आग्या१९९०'s picture

23 Apr 2025 - 5:07 pm | आग्या१९९०

परकीय चलन काही फक्त सोन्यातच खर्च होते का? आयात केलेली इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स तर अल्पकाळातच कचरा होतात!
विषय गुंतवणुकीचा आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी तुलना करणे चुकीचे आहे. सोन्यात डिजिटल स्वरूपात गुंतवणूक करण्याचा सुरक्षित पर्याय असताना का देशाचे परकीय चलन वाया घालवावे? सरकारने अक्कल गहाण ठेवली असेल, मी नाही.

कर्नलतपस्वी's picture

23 Apr 2025 - 11:50 am | कर्नलतपस्वी

सोन्या करता बायकोत गुंतवणूक बायको करता सोन्यात गुंतवणूक..

अमर विश्वास's picture

23 Apr 2025 - 12:14 pm | अमर विश्वास

सोने हा एक असेट क्लास आहे .. सोन्यात गुणतवणूक जरूर करावी ... गेल्या वीस वर्षात सोन्याने उत्तम परतावा दिला आहे ..

सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि अस्थिरता बघता सोन्याचे भाव चढेच रहातील असे वाटते .. रिझर्व्ह बँक सुद्धा आपला सोन्याचा साठा वाढवत आहे ..

त्यामुळे या आधी लिहिल्या प्रमाणे ...

१. दागिने हि इन्व्हेस्टमेंट नाही .. कारण त्याच्यात भावना (emotions) असतात ...
२. सरकारने SGB बंद केले असले तारे बाजारात Gold bonds आणि ETF असे दोनही पर्याय उपलब्ध आहेत.
३. साधारण पोर्टफोलिओ मध्ये ५% गुंतवणूक सोन्यात असावी equity balance म्हणून उत्तम काम करते

haapy investing

वामन देशमुख's picture

23 Apr 2025 - 1:07 pm | वामन देशमुख

गुंतवणुकीचे अनेक पर्याय असतात - जमीन, इमारती, सोने, शेअर्स, म्युच्युअल फंड्स, बँकांतील ठेवी, इत्यादी.

एखादी गुंतवणूक खूप चांगली, चांगली, ठीकठाक वगैरे ठरविण्याचे निकष कोणते?

जमीन, निवासी किंवा व्यावसायिक इमारती - पांढरी खरेदी विक्री करताना मिळून किमान दहा टक्के खर्च, इतर वेळी किमान तीन-चार टक्के खर्च पण व्यवहारात जोखीम देखभालीचा खर्च, विक्रीसाठी सर्वात कमी तरल

सोने - पांढरी खरेदी विक्री करताना फारतर सहा टक्के, इतर वेळी एक-दोन टक्के खर्च, देखभालीचा खर्च तुलनेने अत्यल्प, विक्रीसाठी सर्वाधिक तरल

ठेवी - उत्पन्नाप्रमाणे करआकारणी, पाच लाखापर्यंत विमा संरक्षण, सर्वसाधारणपणे सर्वाधीक सुरक्षित

शेअर्स - प्रचंड अभ्यास, सातत्य, याची गरज, मर्यादित रकमेपर्यंत खूप तरल

म्युच्युअल फंड्स - शेअर्सच्या तुलनेत किमान काही प्रमाणात अभ्यास, सातत्य, मर्यादित रकमेपर्यंत खूप तरल

चोरीचपाटी, फसवणूक, गहाळ होणे इ. प्रकारचे नकारात्मक मुद्दे कमीअधिक प्रमाणात सर्वच ठिकाणी लागू असतात.

गुंतवणूक म्हणून सोने हे अत्यंत तरल आहे. इतर असेट्सच्या तुलनेत देखभालीचा खर्च अत्यल्प आहे. खरेदी विक्रीचा खर्च खूप जास्त नाही. विश्वासू सुवर्णकार लोकांच्या ओळखी असणे गरजेचे आहे.

अर्थात एकरकमी गुंतवणूक करणे असो किंवा दरमहा गुंतवणूक करणे असो, कोणत्याही एकाच असेट क्लास मध्येच गुंतवणूक करणे योग्य नाही. सर्वच असेट क्लासेस मध्येही समसमान गुंतवणूक करणे हेही ठीक नाही. आपापल्या प्राधान्यानुसार ठरवावे.

सोने हे काही केवळ गुंतवणुकीपुरतेच मर्यादित नाही.

वरचा प्रतिसाद अर्धाच पेस्ट झाला!

एक गुंतवणूक म्हणून सोन्याबद्धल मिपावर याआधीही बरीच चर्चा झाली आहे. वरचा प्रतिसाद म्हणजे त्या तेजोमहालाला लावलेला विटेचा तुकडा समजा!

सोने हे काही केवळ गुंतवणुकीपुरतेच मर्यादित नाही.

सोने हे गुंतवणुकीव्यतिरिक्त एक आवड म्हणूनही चांगली वस्तू असू शकते. विशेष म्हणजे त्या वस्तूची किंमत काळानंतर कमी होत नाही.

अर्थात प्रत्येकालाच सोन्याचीच आवड असते असे नाही. बाईक्स कार्स, इंटिरियर, फोनसारखी गॅजेट्स वगैरे वस्तू यांची अनेकांना आवड असते. सोन्याच्या तुलनेत या सर्वांची उपयुक्तता असते यात वाद नाही. पण त्यांवर किती खर्च करावा याची मोजमापे व्यक्तीव्यक्तीपरत्वे वेगवेगळी असू शकतात.

मतभिन्नतेच्या आदरासहीत - धाग्यात शेवटी विचारलेला प्रश्न पहा. कदाचित उत्तर सापडेल.

अमर विश्वास's picture

23 Apr 2025 - 1:26 pm | अमर विश्वास

या आधीही गुंतवणूक --- का ? कधी? कशी ? कुठे ? या धाग्यात लिहिल्या प्रमाणे

गुंतवणूक कुठे करावी ?
पर्याय असंख्य आहेत ... पण निर्णय घेताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक :
सर्वात महत्वाचे : don't put all the eggs in one basket
गुंतवणूक करताना सामन्यतः या गोष्टी बघाव्या :
१. ROI किंवा परतावा (काही बाबतीत ग्रोथ पोटेन्शिअल )
२. कालावधी
३. कमीतकमी किती गुंतवणूक लागेल
४. तरलता (Liquidity)
५. तुमची जोखीम घेण्याची क्षमता

आता या सगळ्याचा एकत्रित अंदाज यावा म्हणून खालचा तक्ता बघा
.

विअर्ड विक्स's picture

23 Apr 2025 - 2:50 pm | विअर्ड विक्स

सध्या सोने चांगलेच वाजते आहे. २०२५ मध्येच जवळपास ३०% परतावा दिलाय. मल्टि असेट ऑलोकेशन फंड यामुळे सध्या सगळे जण घ्या म्हणून सांगत सुटलेत. SGB चांगला पर्याय होता आता नाही, ETF चा अनुभव नाही, तरलता आणि परतावा याबाबत संभ्रम आहे. ETF परतावा हा चालू मार्केट दराशी संगतवार नसेल तर परतावा कमी होतो असे ऐकून आहे हे कोडे कोणी उलगडू शकेल का ? टाटा सबसे संस्था है ETF १०. रु. च्या आत युनिट आहे.