तरी हरकत नाही

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
7 May 2024 - 8:39 am

कां कुणास ठाऊक आज प्रो.देसाई मला म्हणाले ” सामंत,आज तुम्ही जरा उदास,उदास दिसता.कारण समजेल का? मी म्हणालो ” हे बघा, भाऊसाहेब मी एव्हड्या कविता लिहीतो,बरेच वेळा तुम्ही मला स्फूर्ती दिलीत आणि मी लिहीत गेलो.बरेच जणाना मी कविता पाठवतो,पण मी पहातोय तुम्ही आणि एक दोन सोडले तर इतर कोणी टीका पण करत नाहीत.का कळत नाही.” त्यावर भाऊसाहेब म्हणाले ” सामंत तुम्ही लिहित चला,कुणी गाईली नाही,वाचली नाही,आणि वाचून ऐकली नाही तरी हरकत नाही.”हे त्यांचे शब्द ऐकल्यावर मला एक कविता सुचली.
माझ्या कविता
कुणिही गात नाही
कुणिही वाचत नाही
वाचली तरी ऐकत नाही
परंतु
कविता लिहील्याविना
मला राहवत नाही
लिहूया कविता म्हणून
लिहिली जात नाही
विचारांच्या वेलीची
शब्दरुपी फुलें जेव्हा
मनाच्या पाण्यात
एकत्र तरंगतात
तेव्हा कविता लिहिल्या
वाचून रहावत नाही
दुःखा मागून
आनंद डोकावतो
यातना मागून
निर्मीती होते
कवितेचे असेच आहे
अशावेळी
कविता लिहील्यावाचून
रहावत नाही
अन तुम्ही
गायिलीत नाही
वाचलीत नाही
आणि वाचून
ऐकलीत नाहीत
तरी हरकत नाही
कविता लिहील्या शिवाय
मी सोडणार नाही.

वाङ्मय

प्रतिक्रिया

खुशाल लिहा, पण मिपावर त्यातले फक्त निवडक, आठवड्यातून फारतर एकच टाकलेत तर बरे होईल, प्रतिसादकांचा मुख्य आक्षेप दररोज वा दिवसातून एकापेक्षा जास्त धागे टाकण्याबद्दल आहे. त्यातून सुटका झाली तर तुम्हाला अप्रिय वाटणारे प्रतिसाद दिले जाणार नाहीत परिणामी तुम्हाला आदर, सन्मान, कौतुक लाभेल. विविध प्रतिसादकर्त्यांनी एवढे समजावूनही हटवादीपणाने धाग्यांवर धागे टाकत रहाण्याचे आश्चर्य वाटते.
माझा उल्लेख तुम्ही अन्यत्र केला आहे, त्याबद्दल नंतर लिहीन.

अहिरावण's picture

7 May 2024 - 7:29 pm | अहिरावण

शतदा सहमत

कर्नलतपस्वी's picture

7 May 2024 - 7:46 pm | कर्नलतपस्वी

सहमत.

अमरेंद्र बाहुबली's picture

7 May 2024 - 8:13 pm | अमरेंद्र बाहुबली

सहमत

श्रीकृष्ण सामंत's picture

7 May 2024 - 9:51 pm | श्रीकृष्ण सामंत

मी आठवड्यातून एक लेख लिहावा ह्याबद्दल आपण वरचेवर अट्टाहास करीत
आहात याचं गुपित मला एका मिपा वाचकाने लिहून कळवलं आहे
माझ्या दुसऱ्या लेखात मी उल्लेख
करीन

अमरेंद्र बाहुबली's picture

7 May 2024 - 10:21 pm | अमरेंद्र बाहुबली

कोण आहे तो?? मिपाद्रोही??

आणि दररोज नेमाने रतीब टाकणे वेगळे. - - तेही इतकी टीका होत असताना. लेख आठवड्यातून एकदा टाकावा असा अजिबात अट्टाहास नाही. महिना - दोन महिन्यातूनही चालेल.

श्रीकृष्ण सामंत's picture

8 May 2024 - 12:42 am | श्रीकृष्ण सामंत

कोण हे वाचक? ते तर शेकडोनी माझा प्रत्येक लेख वाचतात.आवडला म्हणतात
आणखी लिहा "म्हनत्यात"
अच्छा, अच्छा, अच्छा ते "बालिश" टीका
करणारे होय?
"शिंपल"
त्यांनी माझे लेख वाचू नये.
सुंटी वाचून खोकला जाईल.
पण "ग्यानबाची मेख' निराळी आहे.
नंतर कधीतरी सांगेन.

अहिरावण's picture

8 May 2024 - 9:37 am | अहिरावण

>>>पण "ग्यानबाची मेख' निराळी आहे.
नंतर कधीतरी सांगेन.

काय सांगता? नकाच सांगु :)