लिसा लिसा - प्रेमाचा निरागस गुंता
प्रियदर्शनचे दिग्दर्शन असलेल्या अनेक चित्रपटांतील कथा हि एखाद्या शांत , निवांत , निसर्ग रमणीय गावामधे घडते . उदाहरणार्थ हिंदीतील मुस्कुराहट , खट्टा मिठा .
लिसा लिसा या २००३ मधे प्रदर्शीत झालेल्या तामीळ चित्रपटामधीलही वातावरण असेच रम्य , शहरी धकाधकीपासुन दुर आहे . कथा नायक राकेश ( शाम ) हा तरुण येथे आपले वाडवडीलोपार्जीत घर , शेती एकट्याने सांभाळतो आहे . पुढे मागे पैसे कमावण्यासाठी परदेशात जाण्यासाठीही त्याचे प्रयत्न चालु आहेत .
चंद्रु हा त्याचा मित्र ( विवेक ) अनेक उद्योगांत आपले पैसे गमावुन बसला आहे . सध्या तरी तो आपल्या मित्राच्या , राकेशच्या घरामधे त्याच्यासोबत राहतो आहे .
अशातच , लष्करातुन निवॄत्त झालेले चंद्रुचे दुरचे आजोबा त्याला भेटायला , त्याच्याकडे सुट्टीमधे राहायला शहरातुन आपल्या परीवारासह येतात . आपली फजिती लपवण्यासाठी चंद्रु हे आपलेच घर आहे अशी आजोबांना थाप मारतो . आणी राकेश हा आपला मित्र आपल्याकडे मदतनीस म्हणुन राहात आहे असे भासवतो . आपल्या मित्रासाठी म्हणुन बिचारा राकेशही या नाटकात सामिल होतो .
आजोबांबरोबर त्यांच्या नातीही शहरातुन आलेल्या असतात . या सर्व नातींमधील बाला ( त्रिषा ) ही नात आपल्या अवखळ , निरागस स्वभावामुळे सर्वांची विशेष लाडकी असते . आपल्या मित्रासाठी घराचा मालक असुनही मदतनीस असल्याचे नाटक करताना राकेशला या सर्वांचे हुकुम झेलावे लागतात . अपमानही सहन करावा लगातो .
काही दिवसांनंतर , बालाला राकेश हाच खरा घर मालक असल्याचा उलगडा होतो . राकेशचा हा त्याग बघुन ती त्याची झालेल्या अपमानाबद्दल माफी मागते . दोघांमधेही आता चांगली मैत्री होते . या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होण्याची राकेशला स्वप्ने पडु लागतात . तो आपला परदेशी जाण्याचा बेत रद्द करतो .
अखेरीस , एक दिवस राकेश बालाला आपल्या प्रेमाची कबुली देतो . बाला मात्र त्याच्या प्रेमाला नकार देते . आपले आधीच लग्न झाले आहे असे कारण ती सांगते .
चित्रपटाची कथा इथे अनपेक्षित वळण घेते . शहरामधे कॉलेजात शिकत असताना , बाला आपल्या कॉलेजमधील लेक्चरर देवा ( माधवन ) च्या प्रेमात पडलेली असते .
अन्यायाची चीड असलेल्या देवाचे कॉलेजमधील गुंडांशी , बड्या धेंडांशी वाद होतात . या अन्यायाचा प्रतिकार करताना देवाच्या हातुन मोठा अपघात होतो . आणी त्याला जन्मठेपेची शिक्षा होते . देवा जरी तुरुंगात असला तरी बाला अजुनही त्याला विसरली नसते . आज ना उद्या त्याची सुटका होईल या आशेवर ती जगत असते .
प्रेमाचा हा तिढा अखेरीस कसा सुटतो , या गुंत्याची उकल कशी होते हे प्रत्यक्ष चित्रपटातच पाहणे योग्य ठरेल .
प्रियदर्शनचे सराईत दिग्दर्शन , हॅरीस जयराजचे रंजक संगीत असलेली गाणी , त्रिशा , शाम , माधवन यांचा कथेला पुरक अभिनय , ऊटीची निसर्ग रमणीय पार्श्वभुमी , साबु सिरिलचे उत्तम कला दिग्दर्शन , सुयोग्य फोटोग्राफी तंत्र अशा सर्व बाजु जमुन आल्यामुळे हा चित्रपट कधीही पाहिला तरी मनोरंजन करतो .
चित्रपटाची व चित्रपटातील गाण्यांची लिंक ----
चित्रपट -- https://www.youtube.com/watch?v=LGzLeiynP0E&list=WL&index=31
गाणी -- https://www.youtube.com/watch?v=Bpsqt2yEdr0&list=WL&index=19
https://www.youtube.com/watch?v=5RBmGknjfQw&list=WL&index=17
प्रतिक्रिया
16 Dec 2021 - 7:27 am | तुषार काळभोर
हलके फुलके असतात. शेवट इमोशनल नसावा ही अपेक्षा.
17 Dec 2021 - 12:04 am | तर्कवादी
हिंदीत उपलब्ध आहे का ?
5 Jan 2022 - 11:21 am | कुमार१
छान परिचय.
5 Jan 2022 - 7:55 pm | मदनबाण
चित्रपटाची ओळख आवडली !
ऊटीची निसर्ग रमणीय पार्श्वभुमी
हे मात्र खरंय... दाक्षिणात्य चित्रपटातील अनेक गाण्यांचे शुटिंग पाहिल्यावर मला उटी आठवतेच ! याचे कारण मी यातील बर्याच लोकेशनवर फोटो काढलेले आहेत.
माझं ऑल टाईम फेव्हरेट गाणं [ मोठ्या साईझ मध्ये ] इथे देतो, हे गाणं ज्या टेकडी / डोंगरावर शुट झालं आहे तिथे आमचा ड्रायव्हर मुद्दामुन घेउन गेला होता आणि इथेच मी काही फोटो काढले होते. मला आता या जागेच नाव आठवत नाही. :( [ तुम्हाला या जागेचे नाव माहित असल्यास नक्की सांगा ] तसेच या गाण्यात उटीचे बोटॉनिकल गार्डन देखील दिसते.
[ दाक्षिणात्य चित्रपट,संगीत आणि भोजनाचा चाहता. ] :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maai Bappa Vithala
25 Jan 2022 - 12:43 pm | टर्मीनेटर
चित्रपटाची ओळख आवडली. हिंदीत उपलब्ध असता तर बरे झाले असते!