धोखेबाज

srahul's picture
srahul in जनातलं, मनातलं
8 Jan 2022 - 1:04 pm

धोखेबाज

राज कपूर च्या मनातील कलाकार सदा सर्वदा जागा असे , याची साक्ष देणारे बरेच किस्से आहेत , त्यातील आठवलेला आणि मी ऐकलेला किस्सा शेअर करतो .
ख्वाजा अहमद अब्बास पटकथे वर आधारित सिनेमाच्या गडबडीत राज कपूर होता . कथेचा नायक परिस्थिती वश होऊन म्हणा किंवा आपल्या अडचणी मुळे हताश होऊन थोडी लांडी लबाडी करतो , आणि नंतर त्याची सद्सद्विवेक बुद्धी जागी होते आणि तो परत नेहमीच्या चांगल्या मार्गावर येतो. असं कथानक होतं.
राज कपूर ने या सिनेमाचं नाव ठरवलं होतं , “ धोखेबाज “.

पण का कुणास ठाऊक , त्याला स्वत: ला हे नाव खटकत होतं. नकारात्मक वाटत होतं . पण दुसरं समर्पक नाव सुद्धा सुचत न्हवतं.....त्याच्या मनात विचारचक्र सुरू होतं , पण उत्तर काही मिळत न्हवतं ....

अशा वेळी आर. के. स्टुडिओ मध्ये एक विचित्र घटना घडली. राज कपूर च्या स्टाफ मधील दोन माणसांमध्ये वाद झाला. वादाचा मुद्दा असा होता की एका ने दुसर्‍या कडून काही रक्कम उसनी घेतली होती आणि ती त्याने परत केली असं त्याचं म्हणणं होतं. तर त्याने ती रक्कम परत केलेली नाही असं ज्याने ती रक्कम उसनी दिली आहे त्याचं म्हणणं होतं. दोघांमधील भांडण अगदी विकोपाला गेलं .

शेवटी दोघे “राज साहेबांकडे “ आले. राज कपूर ने दोघांची बाजू ऐकली. दोघेही आपआपल्या मतावर आणि मुद्द्यावर ठाम होते. आता राज कपूर ला प्रश्न पडला की कुणाची बाजू घ्यावी आणि न्याय निवाडा कसा करावा ? दोघेही आपली बाजू राज कपूर समोर तावातावाने मांडत होते. शेवटी त्या दोघांपैकी एक जण चिडून बोलला .....” अरे राज साहब आप इस आदमी की एक ना सुनिये , ये पक्का ४२० आदमी है ....”

आणि राज कपूर च्या डोक्यात तो “४२० “ हा शब्द आकाशातील वीजेसारखा चमकला , सिनेमाचं नाव काय याचं उत्तर त्याला मिळालेलं होतं....”श्री ४२०” . तो पराकोटीचा खुष झाला.

त्या आनंदात त्याने ज्या रकमे वरून दोघांमध्ये वाद सुरू होता. त्याच्या दुप्पट रक्कम दोघांनाही देऊन दोघांचही तोंड गप्प केलं....आणि “जा , आता आपआपली कामे पहा “ असं सांगून दोघांची रवानगी केली.
यथावकाश चित्रपट पूर्ण झाला , उत्तम मुद्देसूद पटकथा , राज कपूर चे कल्पक दिग्दर्शन , राज कपूर -नर्गिस – ललिता पवार – एम कुमार -नेमो सहित सर्व कलाकारांचा बहारदार अभिनय , शैलेन्द्र हसरत यांची अर्थपूर्ण गीते आणि शंकर जयकिशन यांचं बहारदार संगीत या जोरावर तिकिटबारी वर धो धो चालला . किंबहुना आज सुद्धा हिन्दी चित्रपटातील एक मैलाचा दगड म्हणून हा चित्रपट ओळखला जातो.

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

8 Jan 2022 - 2:30 pm | कुमार१

छान आठवण

srahul's picture

11 Jan 2022 - 3:27 pm | srahul

धन्यवाद

कानडाऊ योगेशु's picture

8 Jan 2022 - 5:55 pm | कानडाऊ योगेशु

रोचक किस्सा.
असेच अजुन किस्से आल्यास मजा येईल.
कपिल शर्माच्या शो मध्ये रणधीर कपूर ने सांगितले कि राज क्पूर कुठल्या तरी एका कार्यक्रमाला गेला होता तेव्हा तिथे रविंद्र जैनला खाजगी मैफिलीसाठी बोलावले होते तेव्हा त्याने एक भजन गाईले ते राज कपूरला इतके आवडले कि त्याने पुन्हा त्याचा कार्य्क्रम स्वतःच्या घरी ठेवला आणि एके दिवशी रविवारी लोणावळ्याला गेला आणि रामतेरी गंगा मैली ची स्क्रिप्ट त्या भजनावरुन तयार केली.

srahul's picture

11 Jan 2022 - 3:27 pm | srahul

धन्यवाद

'सुन्या सुन्या मैफीलीत माझ्या' ची रोमांचक जन्मकथा पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या शब्दात येथे ऐका:
सुन्या-सुन्या मैफिलीत

srahul's picture

20 Jan 2022 - 1:04 pm | srahul

धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

21 Jan 2022 - 8:49 pm | चौथा कोनाडा

श्री ४२० या शीर्षकाच्या उगमस्थानाची कथा भारीच !