नयन वळविता सहज कुठेतरी - काही चित्रस्मृती

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

नयन वळविता सहज कुठेतरी - काही चित्रस्मृती

सहज कुठेतरी फिरत असता अचानक काहीतरी दृष्टोत्पत्तीस येऊन क्षणभर आपण खिळून जावे, कुठल्यातरी संग्रहालयात पायपीट करताना एकाद्या कलाकृतीने आपले चित्त वेधून घ्यावे, किंवा कधीतरी कुठेतरी कोणीतरी आपले मन मोहून टाकावे... अशा वेळी क्लिकलेली काही स्मृतिचित्रे...

फिलाडेल्फिया कलासंग्रहालयातील एक प्राचीन मंडप.
.

१९१२ साली आदेलीन गिब्सन Adeline Pepper Gibson (१८८३-१९१९) ही तरुणी मधुचंद्रासाठी भारतात गेलेली असताना तिला मदुराईमधील एका मंदिराच्या प्रांगणात शेकडो वर्षांपासून पडून असलेले ग्रॅनाईटचे मोठाले स्तंभ दिसले. तिने ते ६० स्तंभ खरेदी करून अमेरिकेत आणले. पहिल्या महायुद्धयात ही तरुणी फ्रान्समध्ये नर्स म्हणून काम करत असता मृत्युमुखी पडली. १९२० साली प्रख्यात कलामर्मज्ञ आनंद कुमारस्वामी यांनी फिलाडेल्फिया म्युझियममध्ये हा मंडप उभा केला.... सगळेच अतर्क्य आणि अद्भुत.

ख्रिस्ती भिक्षूंच्या प्राचीन मठातील (Cloister) चौक
.

इ.स. १२७०-८० या काळात फ्रान्समध्ये बांधलेल्या एका ख्रिस्ती मठाचा हा भाग १९२८पासून फिलाडेल्फिया कलासंग्रहालयात आहे. (जगभरातील विविध ठिकाणच्या प्राचीन, मोडकळीस आलेल्या वास्तू खरेदी करून अमेरिकेतील संग्रहालयांमध्ये त्या पुन्हा उभारून आपापली शहरे समृद्ध करण्यासाठी झटणाऱ्या तत्कालीन अमेरिकन नागरिकांचे कौतुक वाटते.)

चित्रकार N. C. Wyeth (१८८२–१९४५) यांचा स्टुडिओ.
.

.

.

फिलाडेल्फियामध्ये N.C. Wyeth यांनी १९११मध्ये अठरा एकर जमीन घेऊन बनवलेले घर आणि स्टुडिओ, तसेच त्यांची अनेक चित्रे बघायला मिळाली. त्यांची ३०००हून अधिक चित्रे आणि त्यांनी चित्रित केलेली ११२ पुस्तके आजमितीला उपलब्ध आहेत. १९४५ साली मृत्यूच्या आदल्या दिवशी अपूर्ण राहिलेले चित्र अजूनही ईझलवरच आहे (वरील फोटोत उजवीकडे.)

याच परिसरात 'ब्रॅंडिवाईन' नदीच्या काठी असलेल्या संग्रहालयात वाईथ यांची पुष्कळ चित्रे आहेत.
या संग्रहालयाचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे या परिसरातील ६३००० (त्रेसष्ट हजार) एकर जमिनीचे आणि पाण्याचे संरक्षण, संवर्धन नियोजन. त्यामुळे या भागाचे कधीही औद्योगिकीकरण होणार नाही याची काळजी घेतली जाते आहे.
याविषयी माहिती :https://www.brandywine.org/

.
Villa at Caprarola चित्रकार : Claude-Joseph Vernet (१७१४-१७८९) या चित्रासोबत अस्मादिक.

या चित्रात इटलीतील प्रसिद्ध 'फारनेजे' (Farnese) घराण्यात जन्मलेली स्पेनची राणी एलिझाबेथ, इटलीतील आपल्या पूर्वजांचा किल्ला बघण्यासाठी आलेली असतानाचे दृश्य रंगवलेले आहे.
हे फारनेजे घराणे अजून रोममध्ये त्यांच्या भव्य प्रासादात निवास करत असून तो Raphael (१४८३–१५२०) या चित्रकाराने केलेल्या प्रचंड भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहे. पूर्वी हा प्रासाद बघितलेला असल्याने मला या चित्राबद्दल कुतूहल निर्माण होऊन ते जास्त बारकाईने बघितले.

या चित्रातले काही तपशील

https://i.postimg.cc/J4WmW8Sb/Phil-art-museum-2019-157.jpg

नेपोलियनच्या पराभवानंतर त्याचा अमेरिकेला जाण्याचा बेत फसला, परंतु त्याचा भाऊ जोसेफ (नेपोलियनने जिंकलेल्या तत्कालीन स्पेनचा तात्पुरता राजा) अमेरिकेला जाऊ शकला. त्याने हे चित्र स्पेनहून अमेरिकेत आणले.

राणीच्या या सफरीत चित्रकार मुद्दाम चित्र बनवण्यासाठी सामील झालेला होता. (त्याने स्वतःचे चित्रही डावीकडल्या सावलीच्या भागात रंगवले आहे.) हे चित्र बघितल्यापासून हा किल्ला बघण्याची उत्सुकता जागृत झालेली आहे. विशेषतः हे चित्र कुठे बसून काढले असावे, ते हुडकता आले तर खूपच समाधान लाभेल.

चित्रातल्या इमारतींचे विहंगम दृश्य. (जालावरून साभार).

फिलाडेल्फिया कलासंग्रहातील रोमच्या किल्ल्याचे एक जुने चित्र

हे चित्र बघून मला गेल्या वर्षीची रोम-भ्रमंती आठवली.

टायबर नदीवरील पूल, किल्ला वगैरे.

रोममध्ये फिरताना अचानक रस्त्याकडेला झाडोऱ्यात बेवारशी उभा असलेला ब्रॉन्झचा पूर्णआकृती योद्धा बघून चाटच पडलो.

(पूर्वीचे ग्रीक योद्धे डोईवर शिरस्त्राण, पण बाकी शरीर नागडे, असे युद्धावर जायचे का? जाणकारांनी प्रकाश टाकावा.)

रोममधील कोलोना प्रासाद Palazzo Colonna
https://www.galleriacolonna.it/en/

रोमच्या इतिहासातील निवडक मातब्बर घराण्यांपैकी असलेले ‘कोलोना’ घराणे चौदाव्या शतकापासून या भव्य प्रासादात आजतागायत वास्तव्य करून आहे. हा प्रासाद पर्यटकांसाठी फक्त शनिवारी सकाळी ९ ते दुपारी २ याच वेळात खुला असतो. पुनर्जागरण काळातील वास्तूंची भव्यता, ऐश्वर्य आणि सौंदर्य अनुभवण्यासाठी कोलोना प्रासाद अवश्य बघावा.

Gaspard Dughetचे (१६१५–१६७५) एक चित्र. या चित्रकाराने रंगवलेली रोम परिसरातली बरीच निसर्गचित्रे इथे आहेत. ती बघायला मुद्दाम इंग्लंडातून आलेल्या एका वृद्ध जोडप्याशी इथे ओळख झाली.

कोलोना प्रासादातील काही चित्रे

"गंगा जमुना डोळ्यात उभ्या का ? जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा.." किंवा "..काहे दिया परदेस, टुकडे को दिल के.." या प्रसंगावरचे रोमन शिल्प.

रोमच्या आधुनिक कला संग्रहालयातली एक लक्षवेधी कलाकृती.

चला आता पॅरिसकडे ..

पॅरिसमध्ये आयफेल टॉवर आणि मोनालिसाभोवती गर्दी करणाऱ्यांना ठाऊक नसलेल्या, केसरी-वीणा वगैरेंच्या खिजगणतीत नसणाऱ्या अनेक शांत, रम्य जागा आहेत. उदाहरणार्थ,
Parc de Sceauxमधील एक दृश्य.
https://1.bp.blogspot.com/-gkDY5Q5z3kg/XZCgN12wi3I/AAAAAAAAW_M/2J4Gplt6oHoAAEYivdiYupRxtHgMsfg8QCLcBGAsYHQ/s640/20190928_115312.jpg

"ते बघितलेस ल्युशियस कतालियस जुलियानस क्लॉडियस अनातोलियस? अडीच हजार वर्षांपूर्वी आपणही असेच मुक्तपणे धावायचो, हवे तिथे जायचो. आता शतकानुशतके शिळा बनून उन्हा-पावसात कायम उभे राहणे कपाळी आले आहे ...."
पार्क सँक्लूमधील प्राचीन कारंजे Parc de Saint-Cloud
https://i.postimg.cc/BnhLr5fd/Cascade-St-Cloud-Paris.jpg

नोत्रदामपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या लहानशा बागेत जरा विसावा घेऊन संध्याकाळ नदीकाठी फिरत घालवावी...
https://i.postimg.cc/ht7Rngkc/Florence-Dec-2017-256.jpg

https://i.postimg.cc/FHpdnCdy/20190915-202520.jpg

एकदा असेच एका अनोळखी पायवाटेने निरुद्देश फिरताना एक वळण आले, आणि -
"... नयन वळविता सहज कुठेतरी, एकाएकी तूच पुढे ... आज अचानक गाठ पडे..."
---म्हणजे काय, हे साक्षात अनुभवले.

https://www.youtube.com/watch?v=0dSTTUBbo0Q

'फ्रेन' Fresnes परिसरातली फारशी वर्दळ नसलेली एक कच्ची पायवाट.
.

.

आणि मायदेशी परतण्यासाठी चंबूगवाळे आवरताना : "आबा, मी पन तुम्च्या बब्बल एनाले!! "
https://i.postimg.cc/gj5ttLkR/zz-ahan-in-bag.jpg

आणखी अशाच काही अनवट जागांची ओळख पुढे कधीतरी....

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

25 Oct 2019 - 4:08 pm | चौकटराजा

तेच बास रिलीफ मधले तर भारीच आहे . बाकी चित्रही उत्तम अशीच निवडलेली आहेत ! रोमचे चित्र पाहून सेंट पीटर चा बेत फसला याची जखम पुन्हा वाहू लागली !

उच्च प्रकाशचित्रे. लेख आवडला.
सगळ्यात शेवटल्या फोटोमधले पिल्लू भलतेच गोड!

मस्त प्रकाशचित्र. ती पॅरीसची जखम जरा भळभळली. तुमची टीपण्णी अजूनही असती तर आवडले असते.
शेवटच्या फोटोतले पार्सल एकदम क्यूट!!! :-)

सुधीर कांदळकर's picture

30 Oct 2019 - 5:07 pm | सुधीर कांदळकर

कलाक्षेत्रातल्या हिरेमाणकांचा खचच ओतलाहे तुम्ही. डोळे विस्फारून एकेक प्रचि पाहात होतो आणि माहिती मनांत साठवायचा प्रयत्न करीत होतो. घरबसल्या हा अमोल खजिना वाचकांच्या हवाली केलात. वाचका किती प्राशशिल दो दो नयनांनी?

शीर्षकही त्याच तोलामोलामोलाचे. ऐकले तेव्हापासून आज अचानक ...... मनांत आहेच.

छोटूला बॅगेत बसवायची कल्पनाही मस्त. एक्सक्लूझिव्ह अँड ओरिजिनल.

अनेक अनेक धन्यवाद.

गुल्लू दादा's picture

31 Oct 2019 - 11:35 am | गुल्लू दादा

नवनवीन जागांची चित्रांसहित ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

पद्मावति's picture

31 Oct 2019 - 1:27 pm | पद्मावति

सुंदर.

सोत्रि's picture

31 Oct 2019 - 1:46 pm | सोत्रि

सुंदर चित्रस्मृती!

- (चित्रमय झालेला) सोकाजी

कंजूस's picture

31 Oct 2019 - 1:50 pm | कंजूस

होहोहो फारच छान!!!

सुबोध खरे's picture

1 Nov 2019 - 8:03 pm | सुबोध खरे

सगळ्यात शेवटचा फोटो सर्वात जास्त आवडला.

सजीव, सुंदर आणि निरागस.

बाकी कितीही चित्रं काढा याच्या जवळपासही येणार नाहीत .

टर्मीनेटर's picture

1 Nov 2019 - 9:46 pm | टर्मीनेटर

सर्वच फोटो मस्त!

१९१२ साली आदेलीन गिब्सन Adeline Pepper Gibson (१८८३-१९१९) ही तरुणी मधुचंद्रासाठी भारतात गेलेली असताना तिला मदुराईमधील एका मंदिराच्या प्रांगणात शेकडो वर्षांपासून पडून असलेले ग्रॅनाईटचे मोठाले स्तंभ दिसले. तिने ते ६० स्तंभ खरेदी करून अमेरिकेत आणले.

शिल्पकलेचा एवढा सुंदर ठेवा देशाबाहेर गेल्याचे दुखः झाले, पण ज्या प्रकारे त्याचे जतन केले आहे ते बघून समाधानही वाटले.

जुइ's picture

1 Nov 2019 - 10:32 pm | जुइ

अतिशय सुंदर चित्रे आणि त्यांचे वर्णन देखिल!

कुमार१'s picture

3 Nov 2019 - 1:57 pm | कुमार१

सुंदर आणि सुंदरच.

मित्रहो's picture

3 Nov 2019 - 4:10 pm | मित्रहो

खूप छान

मुक्त विहारि's picture

21 Nov 2019 - 7:39 pm | मुक्त विहारि

सुंदर रसग्रहण

चित्रगुप्त's picture

24 Nov 2019 - 11:38 am | चित्रगुप्त

सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे अनेक आभार. गेले अनेक दिवस माझे मिपा खाते लॉगिन होत नसल्याने काही लिहिता येत नव्हते. आत्ता सुरु झाल्याचे दिसत आहे.

पाषाणभेद's picture

6 Dec 2019 - 1:45 am | पाषाणभेद

Parc de Sceauxमधील एक दृश्य असलेला फोटो आवडला.
सर्वच चित्रे खुपच सुंदर आहे. आपल्या नजरेतून अशा संग्राहलायांची भेट आवडली.