मी पण अमिताभ बनलो असतो भाय

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
4 Jun 2019 - 4:52 pm

मी पण अमिताभ बनलो असतो भाय

पण आपल्याला रोलच कधी मिळाला न्हाय

" अय साला " करून, डिट्टो करतो हाणामारी

स्टाईल आपली बघून येड्या होतात साऱ्या पोरी

बिग बी ची ऍक्टिंग म्हणजे खाऊ वाटलं काय

उंची सोडली तर बाकी इथं सर्व ठीक हाय

मी पण अमिताभ बनलो असतो भाय

पण साला तसा रोलंच मिळाला न्हाय

शहेनशहा बनुन बाहेर पडलो एका काळ्याभोर रात्री

चमकणारा हात बघून लागली भरपूर मागे कुत्री

लटपट लटपट धावत होतो जणू अग्निपथावरती

जंजीर धरुनी दिवार चढलो मग पडलो तोंडावरती

तोंड फुटुनी पार सुजले , आला गळ्यात माझ्या पाय

मी पण अमिताभ बनलो असतो भाय

पण काय करू , आता पाय गळ्यात आलाय भाय

नायतर नक्की बनलो असतो बिग बी भाय

सिद्धेश्वर विलास पाटणकर

आईस्क्रीमइंदुरी

प्रतिक्रिया

प्रेर्ना स्रोत :: अक्कू काका

पद्मावति's picture

4 Jun 2019 - 4:54 pm | पद्मावति

:)

खिलजि's picture

4 Jun 2019 - 4:59 pm | खिलजि

धन्यवाद पद्मावती तै ..

टवाळ कार्टा's picture

4 Jun 2019 - 7:17 pm | टवाळ कार्टा

ख्या ख्या ख्या

जालिम लोशन's picture

4 Jun 2019 - 11:13 pm | जालिम लोशन

+1

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Jun 2019 - 3:10 pm | ज्ञानोबाचे पैजार

डायरेक्ट बच्चन? मधे "खन्ना" गेला बाजार "राजकपुर" किंवा "देवसाहेब" तरी म्हणायचे. डायरेक्ट बच्चन?
आपली (म्हणजे माझी) झेप जॉनी वॉकर, जॉनी लिव्हर, कादरखान, ओमप्रकाश इतकीच मर्यादीत आहे.
पैजारबुवा,

दुर्गविहारी's picture

5 Jun 2019 - 4:54 pm | दुर्गविहारी

मस्त ! :-)

गड्डा झब्बू's picture

5 Jun 2019 - 7:09 pm | गड्डा झब्बू

भारी!!!

श्वेता२४'s picture

6 Jun 2019 - 11:16 am | श्वेता२४

लय भारी.

" अय साला " आज आपुन बहुत खुश हुआ मालूम

पुरा नाम :: सिद्धेश्वर विलास पाटणकर ' क्या बोलताय

प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद सर्वाना

अभ्या..'s picture

11 Jun 2019 - 2:10 pm | अभ्या..

जो तू होती जया भादुरी,
हम भी तो लंबू होते...
गोरी तरे नैनोमें हम बस जाते
सातो जनम तुझको चाहके
गोरी तेरे नैनोमे हम बस जाते

खिलजि's picture

11 Jun 2019 - 2:22 pm | खिलजि

मावत नाही आता मी

जुन्या विजारीमध्ये

किती फेकून द्याव्या म्हणुनी

ठेवल्या अलमारीमध्ये

घेर वाढता वाढता वाढे

वाढत जाई पोटाचा

आरसा घ्यावा लागे

बघण्या हालहवाल भावाचा

चित्रगुप्त's picture

11 Jun 2019 - 9:26 pm | चित्रगुप्त

मस्त मस्त कविता.
अलिकडे तुमच्या काव्यगंगेचा ओघ काहीसा आटलेला दिसतो, येऊद्या धबाबा कविता. आम्ही आहोत वाचायला आतुर.

धन्यवाद चित्रगुप्त साहेब. बघतो प्रयत्न करून आपण म्हणताय त्याप्रमाणे .