सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. असे आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

तंत्रजगत

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in तंत्रजगत
1 Oct 2020 - 23:01

फोटोयुक्त लेखनाची नवी रेसिपी

नमस्कार मिपाकरांनो,

मिपावर लेखनात फोटो समाविष्ट कसा करावा? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. वास्तविक ह्या विषयावर खाली दिलेले दोन उपयुक्त धागे मिपावर उपलब्ध आहेत.

ताजे प्रेत's picture
ताजे प्रेत in तंत्रजगत
24 Sep 2020 - 23:14

भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी कसे पैसे बनवते ?

हि अत्यंत धक्कादायक माहिती हाती आली आहे
या कंपनीने बराच काळ नेटवर्क फुकट ऑफर केले आणि मग सत्यात स्वस्त सेवा सुरु केली . हे खूप पैसे घेणार असे बोलले जात होते पण यांनी दर कमीच ठेवले आहेत आणि इतर स्पर्धकांची वाट लावली आहे
तर हे नक्की पैसे बनवतात कसे ?

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in तंत्रजगत
15 Sep 2020 - 20:53

स्मायली / Emoji

नमस्कार मिपाकरांनो,

टीपीके's picture
टीपीके in तंत्रजगत
25 Aug 2020 - 18:19

इनस्क्रिप्ट टंकन

सुमारे १९८६ साली भारत सरकारने भारतीय भाषांसाठी संगणक कळफलक प्रमाणीत केला. त्याचे नाव इनस्क्रिप्ट. पुढे १९८८ आणि १९९२ साली त्यात सुधारणा केल्या. त्या काळी युनिकोड वगैरे नव्हते. पुढे युनिकोड आले त्यातही भारतीय भाषांसाठी सुधारणा झाल्या. परंतु तो पर्यंत भारतीय भाषांसाठी लिखाण करण्यासाठी अनेकांनी अनेक अप्रमाणित पद्धती विकसित केल्या होत्या जसे गमभन, बोलनागरी इत्यादी. अशीच आणखी एक सोय म्हणजे गुगल इनपुट टूल्स. AI आणि तत्सम तंत्रज्ञानाचा वापर करून विविध भाषांसाठी बनवलेली प्रणाली, जी अर्थातच प्रमाणित नाही

दुर्दैवाने आजही भारतीय भाषांमध्ये टंकणे कठीण पडते कारण प्रमाणीकरणाचा आणि त्याच्या प्रसाराचा अभाव. तसेच भारतात मिळणाऱ्या संगणकांचे कळफलक हे अमेरिकन असतात व भारतीय इनस्क्रिप्ट अक्षरे त्यावर नसल्याने प्रसारही होत नाही.

सुदैवाने युनिकोड मुळे जगातील सर्व भाषांना संगणकावर स्वतःची एक प्रमाणित लिखाण पद्धती तयार झाली आहे ,आज सगळ्या ऑपरेटिंग सिस्टिम्स युनिकोड सपोर्ट करतात तसेच त्या त्या भाषांमध्ये लिहिण्याची सोयही देतात. परंतु भारतीय भाषांमध्ये तरी हे लिहिणे अजून तितकेसे रुळले नाही.

आपल्याला मराठी वर्णमाला येत असेल तर हे टंकणे शिकणे फार सोपे आहे. रोज अर्धा तास या हिशेबाने ४-६ दिवसात बऱ्यापैकी जमू शकते. अर्थात टंकणे गुगल इनपुट टूल्स इतक्या वेगाने होत नाही परंतु या (गुगल इनपुट टूल्स) पद्धतीत काही स्पेसिफिक शब्द लिहिणे जरा कठीण जाते वेळी इनस्क्रिप्ट माहिती असणे फायद्याचे ठरते. रच्याकने गुगल इनपुट टूल्स पण इनस्क्रिप्ट ला सपोर्ट करते.

तर आज ह्या पद्धतीने काही कठीण शब्द कसे लिहायचे हे बघू. खरे तर मी माझ्या सोयीसाठी ह्या नोट्स तयार केल्या होत्या कारण मला ही माहिती कुठेच मिळाली नाही, खास करून मराठीतले विविध र चे प्रकार इत्यादी. इतरांनाही याचा फायदा होईल असे वाटल्याने इथे देत आहे. अजूनही कोणता शब्द तुम्हाला लिहिता येत नाही असे वाटत असेल तर प्रतिसादात विचारू शकता, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करीन.

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
9 Aug 2020 - 18:28

Electromagnetism चा बहुमुखी  वैश्वानल  : बरसणारे इलेक्ट्रॉन्स, वेटोळे घालणारे चुंबकत्व, उधळणारे  फोटॉन्स,...,आणि फॅरेडेची अफाट बुद्धिमत्ता      

अशीच एक  पावसाळी, घोर अपरात्र वाटावी अशी अवसेची रात्र. दूर जिथे पाहावे तिथपर्यंत काळा कभिन्न अंधार पडलेला. आकाशात काळे ढग दाटून आल्याने रात्रीचा गडद पणा अधिकच वाढवलेला... क्षितीजाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत ढगांचा वेढा पडल्यावर, साऱ्या आसमंताला बंदिवासात टाकल्यावर, जेलरने गुरकावावे तसे ढगांचा गुरगुरणारा, डरकाळी फोडल्यासारखा आवाज सर्वांनाच एक धमकावणी वजा सूचना देऊन गेला.

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in तंत्रजगत
2 Aug 2020 - 12:47

गूगल फोटोज वरून फोटोंचा बॅकअप कसा घ्यावा.

तुम्हाला फोटो काढायला आवडतात?

तुमच्या अँड्रॉइड किंवा आपलं फोनमध्ये काढलेले फोटोज कायम स्वरूपी आपल्यासोबत राहावेत असे तुम्हाला वाटते?

तुमचा फोन हरवला/खराब झाला तर हे सगळे फोटोज कसे मिळवायचे हा प्रश्न तुम्हाला पडतो का?

तुम्ही तुमचा फोन बदलला तर तुमचे महत्वाचे फोटो नव्या फोनमध्ये कसे घेता येतील?

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in तंत्रजगत
30 Jul 2020 - 15:34

संगणकासाठी SSD वापरावी की HDD?

(SSD vs HDD) तुमच्या कम्प्युटरचा वेग खूप कमी झालाय का? तुमच्या कम्प्युटरची रॅम आणि प्रोफेसर दोन्ही आधुनिक असूनही ही समस्या येते आणि तुम्ही सर्व काही करून पाहिले तरीही तुमचा कम्प्युटर चालू व्हायला वेळ घेतोय. किंवा कुठलेही मोठे सॉफ्टवेअर किंवा मोठी फाईल ओपन करताना वेळ घेतो. असे असल्यास त्याला कारण तुमच्या कम्प्युटरचा प्रोसेसर किंवा रॅम नसून तुमचे स्टोरेज डिवाइस असू शकते.

वेलांटी's picture
वेलांटी in तंत्रजगत
16 Jul 2020 - 16:53

मोबाईलमधील डेटा क्लिअर कसा करावा?

माझ्याकडे तीनचार वर्षे जुना सॅमसंग गॅलक्सी ऑनफाईव्ह आहे. मोबाईलमधे स्टोरेज स्पेस कमी आहे. मेमरी कार्डमधेच सर्व डेटा मी सेव्ह करते. मात्र internal storage अतिशय कमी राहिले आहे. एकही नविन अॅप किंवा मोठी फाईल डाऊनलोड होत नाही. Settings-->storage--> अशा पाथने गेल्यास कॅश डेटा आणि miscellaneous असे दोन टाईप्स दिसतात. त्यापैकी कॅश मेमरी डिलिट करता येत आहे आणि नंतर स्पेस वाढलेलीही दिसतेय.

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in तंत्रजगत
11 Jul 2020 - 04:16

पोस्ट वॉरंटी वाहन दुरूस्ती, रिपेअर सेंटर्स, गॅरेजेस इत्यादी बाबत चर्चा

एका व्हाअ‍ॅ गृपमधील झालेल्या चर्चेचा धाग्याच्या रुपाने गोषवारा घेतला गेला आहे. आपली मते येथे मांडावीत जेणे करून पुन्हा चर्चा होवून मत मतांतरात नवे मुद्दे पुढे येतील.

रानरेडा's picture
रानरेडा in तंत्रजगत
10 Jul 2020 - 11:31

वॉरंटी /  गॅरंटी

वॉरंटी /  गॅरंटी

( गॅरंटी सहसा कोणी देत नाही - कायदेशीर व्याख्या आहे काहीतरी, आणि इतर ही लफडी असावी. )

वॉरंटी  चे काही  प्रकार असतात

१ ) ऑन साईट - तुमच्या जागी / घरी / ऑफिस मध्ये येवून सर्व्हिस दिली जाते

२ ) कॅरि इन - तुम्हाला सर्व्हिस सेंटर मध्ये जावे लागते.

३ ) लॅपटॉप ला पाहिली नाही पण काही गॅजेट ना रिपलेसमेंट वॉरंटी असते - त्यात

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in तंत्रजगत
3 Jul 2020 - 07:53

ऍपल फोन पासून अँड्रॉइड

ऍपल फोन पासून अँड्रॉइड ( सॅमसंग ) बदल करताना फोन मधील डाटा/ संपर्क आणि व्हाट्स अप मधील सर्व इकडून तिकडे नेण्यासाठी काही सोपे उपाय आहेत का?

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
22 Jun 2020 - 18:33

गूगल ड्राइव'वरचे फोटो, ओडिओ, विडिओ वेबसाईटवर देणे.

गूगल ड्राइववर अपलोड केलेले फोटो,
ओडिओ, विडिओ वेबसाईटवर देणे.

Google Drive प्रत्येक जीमेल अकाउंटला सर्व फोटो,पिडिएफ, ओडिओ, विडिओ फाईल मिडियाचे धरून १५ जीबी फ्री स्टोरेज देते. शिवाय सिक्युअरटी आहेच.

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
8 Jun 2020 - 19:22

बाल्कनीत ओला कचरा कुजवणे

घरातला ओला कचरा हा कुजल्यावर झाडांसाठी उत्तम खत आहे. झाडं लावताना आपण कुजलेले खत बुंध्याशी देतो किंवा कुंडीत माती भरताना त्यात मिसळतो. बाल्कनीत झाडे ठेवताना कुंडीत झाडाभोवती कुजलेली तयार झालेली खत- माती टाकली की फुलझाडे, वेलभाज्या चांगल्या वाढतात. पण कचऱ्यातून ते कुजलेले खत होण्यासाठी कुठेतरी तयार करावे लागते आणि कमीतकमी तीन महिन्यांचा काळ.

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
1 Jun 2020 - 16:56

Four fundamental forces बहुत 'लोकां'सी चालवणाऱ्या बलांची चतुरंग सेना 

राजा विक्रमाच्या राज्यात अभूतपूर्व अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. विक्रमाच्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण विश्वातच एक भयंकर रोगाची साथ आली होती. नवा रोग, नवी लक्षणे, नवीन उपचार, नवीन लस या सर्वात जगाचं लक्ष तर होतंच पण या रोगामुळे तयार झालेल्या नवीन धोक्यांची नक्की काय काय तयारी करायची आणि धोका नक्की कुठून येईल हे सारंच कळण्यापलीकडे गेलं होतं.

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
25 May 2020 - 11:33

मिसळपाव साइटवर लेखनात audio file देणे.

मिपावर mp3 ओडिओ फाइल देणे.

ओडिओ फाईल्स या .wave / .wav / .mp3 / .aac / .ogg असू शकतात. पण काहीच वर्शन अपलोड होतात.
फाईल प्रथम कुठल्यातरी sharing साइटवर टाकून ( अपलोड करून) तिथून लिंक मिळवावी लागते. ती इथे द्यायची.
लिंक मिळवण्यासाठी तीन साईट्स ट्राई केल्या आहेत.

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in तंत्रजगत
18 May 2020 - 10:34

व्यवसाय कल्पना फिनान्शिअल टेकनॉलॉजि

नमस्कार मंडळी
मिपावर सध्या आणि पुढंही आपल्याला व्यवसाय म्हणून काय करता येईल? यावर उलट सुलट चर्चा चालू आहे .. तर त्याबद्दल फिनटेक ( फिनान्शिअल टेकनॉलॉजि ) मध्ये माझ्या कडे १-२ कल्पना आहेत , तर ते मिळून आपण विकसित करू शकतो का हे मला बघायचं येआहे
मिपावर उद्योगाची जाहिरात करयल परवानगी नाही असे दिस्ते त्यामुळे मी जे लिहीत आहे ते योग्य नसेल तर क्षमा

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
17 May 2020 - 18:16

HTML आणि CSS कोड वापरून लेखन सादर करणे.

लेखन सादर करताना ते जरा आकर्षक दिसावे यासाठी हे कोड आहेत. मी काही नेटवरचे लेख वाचून हे जमवले आहेत. करून पाहा.

HTML आणि CSS कोड वापरून लेखन सादर करणे.

HTML FORMATTING
अनुक्रमणिका

१ ) गाभा

२ ) परिच्छेदाची पहिली ओळ पुढे सुरू करणे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in तंत्रजगत
9 May 2020 - 20:18

क्रॉम्टन Energion HS सिलींग फॅन: समीक्षा (BLDC Ceiling Fan Product Review)

क्रॉम्टन Energion HS सिलींग फॅन: समीक्षा (BLDC Ceiling Fan Product Review)

Crompton Cealing Fan Review
इमेज १

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
26 Apr 2020 - 10:01

पदार्थ जडरूप (मॅटर) असो वा ऊर्जारूप (एनर्जी), प्रकाश कायमच सोबतीला असतो.. (e = m. c^2)

(तसा मोजायला गेले तर १००वी ब्लॉगपोस्ट.. नंबर्स काही महत्वाचे नसतात..  ही पोस्ट आहे आईन्स्टाईन च्या e=m.c^२ विषयी..एकदम छोटुकलं सूत्र..