ऍपल फोन पासून अँड्रॉइड

Primary tabs

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in तंत्रजगत
3 Jul 2020 - 7:53 am

ऍपल फोन पासून अँड्रॉइड ( सॅमसंग ) बदल करताना फोन मधील डाटा/ संपर्क आणि व्हाट्स अप मधील सर्व इकडून तिकडे नेण्यासाठी काही सोपे उपाय आहेत का?

प्रतिक्रिया

कंजूस's picture

3 Jul 2020 - 4:57 pm | कंजूस

चांगला प्रश्न आहे।
-----–--
मला सिंकवर विश्वास नाही त्यामुळे मी कॉपी कॉन्टॅक्ट app वापरून सेव करून ठेवतो. ते हातानेच भरतो. विंडोज ते अँड्रॉइड आणि अँड्रॉइड ते अँड्रॉइडसुद्धा असेच केले. यामुळे फोन स्लो होत नाही असा माझा समज.

तुषार काळभोर's picture

1 Aug 2020 - 8:30 pm | तुषार काळभोर

शीर्षक वाचून आयफोन मध्ये अँड्रॉइड इंस्टॉल करण्याची पद्धत मराठीत दिली असा समज झाला :)

असो, आयफोन नाही आणि कधी घेईल असे वाटत नाही. पण माहिती असावी, म्हणून तज्ज्ञांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

मिसळपाव's picture

3 Aug 2020 - 1:26 am | मिसळपाव

वेगळं अ‍ॅप लागतं कारण अँड्रॉईड आणि आय फोनचं एन्क्रिप्शन वेगवेगळं असतं. व्हॉट्स अ‍ॅपच्या डेटाचा बॅक अप जरी घेतला तरी त्याचा फक्त अँड्रॉईड -> अँड्रॉईड किंवा आय फोन -> आय फोन मायग्रेशन साठीच वापर करता येतो. साधारण दहा महिन्यांपूर्वी जेव्हा मला असा बदल करावा लागला होता तेव्हा शोधाशोध करून https://drfone.wondershare.com/ वर जाऊन त्यांची यथोचित यूटीलीटि वापरून (बहुदा $३०-४०) हे काम केलं होतं. माझ्या बाबतीत उलटा प्रकार होता, अँड्रॉईड -> आय फोन असा, पण ती यूटीलिटी दोन्ही तर्‍हेच्या बदलांसाठी आहे. कॉन्टॅक्टस्, फोटो आणि मेसेजेस सुद्धा ट्रान्स्फर करता आले होते.

केंट's picture

3 Aug 2020 - 12:31 pm | केंट

Mobiledit Pro वापरुन बघा

केंट's picture

3 Aug 2020 - 12:33 pm | केंट

Apple क्लाउड अकाउंट ला जाउन कॉंटॅक्ट एक्सपोर्ट करा. ती फाइल गूगल अकाउंट ला इम्पोर्ट करा.

गामा पैलवान's picture

3 Aug 2020 - 7:03 pm | गामा पैलवान

संपर्कविदा हस्तांतरित करण्यासाठी 3u tools वापरता यावेत : http://www.3u.com/news/articles/2472/how-to-trasnfer-iphone-contacts-to-...

प्रकाशचित्रांसाठी आयफोन विंडोज पीसीला जोडावा. विंडोज एक्सप्लोअरर मध्ये आयफोन दिसू लागतो. त्यातल्या DCIM फोल्डरात फोटो व व्हिडियो सापडतात. ते प्र्र्सीवर कॉपी करून घ्यायचे आणि तिथनं आंडराईड फोनवर न्यायचे.

-गा.पै.

कंजूस's picture

4 Aug 2020 - 6:09 am | कंजूस

स्वतंत्र पद्धत. ( Platform / OS Independent )
Contacts to pdf, vcf, text App.
( https://play.google.com/store/apps/details?id=com.firelabs.arspsr.contac... )

हे app वापरून contacts list pdf किंवा text file करून दुसऱ्या एका फोनमध्ये टाकून ठेवणे नेहमीच उपयोगाचे असते.

Transfer

१) जुन्या फोनमधून अशी pdf करून ती नवीन फोनला ट्रान्सफर करायची. आता सगळे contacts नवीन फोनाच्या contacts मध्ये जाणार नाहीत पण pdf file मध्ये आहेत. कुणाला कॉल करायचा झाल्यास यादीतून कॉपी करून कॉल केल्यावर तो नंबर save करत जायचा.

२) कुणाचा मिस कॉल आल्यास तो नंबर pdf मधले 'सर्च ' वापरून शोधता येतो.

या पद्धतीने काम झटकन होत नाही परंतू स्वतंत्र ( platform free ) पद्धत आहे.

गामा पैलवान's picture

4 Aug 2020 - 12:56 pm | गामा पैलवान

गुड टिप, कंजूसकाका!
-आ.न.,
-गा.पै.

सॅमसंग मध्ये स्मार्ट स्विच म्हणुन सोय आहे ती का नाही वापरत? व्हॉट्स ॲपवर बॅकप सेट केला असेल तर नवीन फोनवर व्हॉट्स ॲप सेटअप केले की सगळे मेसेजेस परत येतात