चौकशी

कु.सुमार केतकर

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
8 Jan 2014 - 11:01 pm

कु. सुमार केतकर
यांचे व्यक्तीमत्व रजनीकांथ आलोकनाथ इतके उंच आहे. ( नावात थ अक्षर नसले म्हणुण काय झाले?)
त्यांच्या बद्दलची काही नव्या उजीलाटा ( उचलली जीभ लावली टाळ्याला )
१) कु सुमार केतकर जे लिहीतात त्याला भविष्य कालीन वर्तमान इतिहास म्हणतात.
२) कु सुमार केतकर यांचे व्यक्तीमत्व इतके उत्तुंग आहे की चिमण्या कबुतरे तिथे शिटण्या अगोदर विचार करतात
३) कु सुमार केतकर हे जेंव्हा काही लिहायला घेतात तेंव्हा त्यांच्या मनात विचार येण्या अगोदर कागदावर उमटतो
४) कु सुमार केतकर जे लिहीतात त्याला विचार असे म्हणतात

नरु (नरेन्द्र मोदी) वील बी द विनर: बेजान दारूवाला

आयुर्हित's picture
आयुर्हित in जनातलं, मनातलं
6 Jan 2014 - 1:09 pm

नमस्कार मंडळी,

बेजान दारूवाला यांचे प्रेडीक्षण:
१)नरु (नरेन्द्र मोदी) वील बी द विनर
२)INR(रुपी) विल बी इन बिटवीन ५९ तो ५५ पर डॉलर

मिपाकर ज्योतिषतज्ञ व FINANCIAL ANALYST हो, आपले काय मत आहे?

कळावे, लोभ असावा
आपला लाडका: आयुर्हीत

विज्ञानअर्थकारणज्योतिषप्रकटनसमीक्षासल्लाचौकशी

रेसिडेंट एरिया मधील इंडस्ट्री ...

mahajana cha ganya's picture
mahajana cha ganya in काथ्याकूट
3 Jan 2014 - 7:18 pm

सहा महिन्या पूर्वी नवीन फ्ल्याट घेतला . सोसायटी जवळ एक इंडस्ट्री आहे जिचा आवाज दिवस रात्र येत आसतो . त्यात काम करणारे कामगार दिवस रात्र एक मेकांची आई बहिण मोठ्या आवाजात काढत आसतात . आवाजाच्या त्रासाची कंपनी च्या मालक कडे तक्रार करून उपयोग झाला नाही ..कोणाकडे तक्रार करावी कुणाला माहिती आहे का .

(प्रणयासक्ती)

मूकवाचक's picture
मूकवाचक in काथ्याकूट
28 Dec 2013 - 1:04 am

प्रणयासक्तांच्या प्रेमभावना आणि निसर्गदत्त वासनांप्रती पूर्ण आदर आहे.कुठेही निंदानालस्ती अथवा टिंगलटवाळी करण्याचा हेतू नाही असे सांगून आता एका प्रश्नाकडे वळावेसे वाटते. कृपया विचार व्हावा, युद्ध नको (अशी अपेक्षा).

बिटकॉईन

मारकुटे's picture
मारकुटे in काथ्याकूट
27 Dec 2013 - 12:07 pm

मध्यंतरी बिटकॉईन काय आहे असा धागा काढला होता आणि काही विचारणा केली होती. बहुधा धागा टाकतांना काही चूक झाली असावी म्हणून धागा प्रकाशित झाल्यावर काही काळाने तो अप्रकाशित करण्यात आला. असा धागा गायब झाल्यावर का गायब झाला, अप्रकाशित झाला याची कारणे समजली नाहीत. कूणाला विचारवे ते कळाले नाही. नशीबाचे भोग असे मानून स्वस्थ बसलो.

दुसर्‍या कूणीतरी बिटकॉईनवर लेखन सुरु केले होते. ते सुद्धा मनसेच्या ब्ल्यू प्रिंट प्रमाणे थंडावलेले दिसते. बिटकॉईनवर इंग्रजीत बरंच काहीतरी लेखन सापडते पण नक्की मुद्दे क्लिअर होत नाहीत. असो.

Royal Palms, आरे कॉलनी, गोरेगाव

नित्य नुतन's picture
नित्य नुतन in काथ्याकूट
17 Dec 2013 - 2:09 pm

माननीय मिपाकर महोदयांसी,
विनंती विशेष ...
पत्रास कारण की, मुंबईमध्ये घर (१ bhk) घेणे विचाराधीन आहे... बर्याच संशोधनांती Royal Palms, Aarey Colony, गोरेगाव चे location परवडेबल वाटते आहे ... पण आंतरजालावर या project बद्दल फारच वाईट प्रतिक्रिया दिसत आहेत ...
एक दोन मित्र जे तिथे राहत आहेत त्यांच्या मते या area मध्ये ह्या किमतीत चांगले deal आहे..
पाण्याचा थोडासा problem असला तरीही ....connectivity चांगली आहे.. इत्यादी इत्यादी ...

मिपाकरांपैकी कोणी या area बद्दल जाणत असल्यास फार मदत होतील ...

धन्यु,
- मायानगरीप्रेमी

डेबिट कार्डचा वाईट अनुभव

अव्यक्त's picture
अव्यक्त in काथ्याकूट
16 Dec 2013 - 1:24 am

मला आलेला डेबिट कार्डचा वाईट अनुभव….

माझे HDFC बँकेचे debit कार्ड मी emergency मध्ये june महिन्यात CANARA बँकेच्या ATM मध्ये वापरले.. काही तांत्रिक बिघाडामुळे मी काढलेल्या २० ० ० /- रुपयांपैकी १ ५ ० ० /- रुपये बाहेर आले आणि ५ ० ० /- रुपये कमी आले. मी HDFC शी email करून पिच्छा पुरवला पण त्यांनी CANARA बँकेचा report मागवून २ ० ० ० /- रुपये बाहेर आले होत्ते म्हणून मलाच खोट्यात पाडले… अशा प्रकारांची दाद कोठे मागावी ? कसा पाठपुरावा करावा ? अश्शी बॅंकेकडून होणारी फसवणूक कशी थांबवावी.?
म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काल सोकावतो… मार्गदर्शन अपेक्षित आहे.

आयुर्वेद मध्ये Infertility वर उपचार आहे का ?

komal.tejas's picture
komal.tejas in काथ्याकूट
12 Dec 2013 - 11:08 am

नमस्कार मिपा मध्ये लिहायचा माझा पहिलाच प्रयन्त आहे.
मला (खरे तर आम्हाला ) माहिती पाहिजे आहे कि Infertility साठी आयुर्वेद किती फायद्याचे आहे? आमच्या लग्नाला ५ वर्षे झाली आहेत. (बघून कोणाला तसे वाटणार नाही इतके तरुण आहोत अजून ;))
मुलासाठी पर्यंत चालू आहेत पण अजून यश नाही. डॉक्टर IUI आणि IVF सांगत आहेत. पण मला त्याची भीती वाटते.
मला जाणून घ्यायचे आहे कि आयुर्वेद मध्ये उपचार केले तर किती वेळ लागतो? पुणे (पिंपरी चिंचवड असेल तर उत्तम) ला चांगले आयुर्वेदिक क्लिनिक आहे का?

हिंदु अंत्यसंस्कार आणि दफन

उद्दाम's picture
उद्दाम in काथ्याकूट
6 Dec 2013 - 12:43 pm

हिंदु अंत्यसंस्कार आणि दफन

हिंदु धर्मात दहन केले जाते. पण एक माणूस जाळायला लाकूड फार लागते. विजेवरची दहन सोय सगळीकडे उपलब्ध नसते.

त्यामुळे हिंदु लोकानाही दफनाची सोय करता येईल काय? ( सध्या लिंगायत समाजात अशी पद्धत आहे. ) दफनाला लाकूड लागत नाही. शिवाय ठराविक काळ ८-१० वर्षे वगैरे गेला की त्याच जागेत पुन्हा पुन्हा दफन होऊ शकते.

संकीर्ण : चौकशी ; मदत, सल्ला हवा

मन१'s picture
मन१ in काथ्याकूट
11 Nov 2013 - 9:47 pm

काही बाबतीत सल्ला हवा आहे. अगदि घरगुती वापरातील इएलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते अगदि नाव लावण्यापर्यंत.
इथे विचारण्यास संकोच वाटतो आहे. पण मदत मिळण्याची , निदान योग्य बाजूकडे अंगुलीनिर्देश होण्याची बरीच शक्यता वाटल्याने इथे धागा टाकतो आहे.
१. विवाहोत्तर मुलीने नाव आहे तसेच ठेवले, तर सरकारदरबारी कुठे अडचण येण्याची शक्यता आहे का? किंवा बँक, पासपोर्ट, व्हिसा ह्या ठिकाणी काही
त्रास होउ शकतो का?
एक काल्पनिक नावांनी उदाहरण घेउ. समजा, "अवनी महेश गणोरे " हिचं "नरेश सोपान आवळे" ह्याच्याशी लग्न झालं; तर आधीचं आहे तसच नाव तिला सुरु ठेवण्यास काय काय अडचणी आहेत?