कथा

सिनेमावाला विज्या

मित्रहो's picture
मित्रहो in दिवाळी अंक
19 Oct 2017 - 12:00 am

Header2
"विज्या, आज कॉप्या पुरवता नाही येत आपल्याले" मी धावतच सेंटरच्या बाहेर उभ्या असलेल्या विज्याच्या गँगला सांगितले.
"कोण अडवते बे आमाले?” पोरे माझ्यावरच ओरडली.
"थांबा बे पोट्टेहो." विज्याच्या एका आवाजात पोरे चूप. त्याने त्याच्या बच्चन कट केसातून हात फिरविला, डाव्या हाताने मानेवरचे केस उडविले, विडीचा धूर सोडला आणि मला विचारले,
"पण काहून बे बारक्या?"
"मास्तर सांगत होता, आज इन्सपेक्टर येनार हाय."

दृकश्राव्य विभाग :- लिफ्ट.. (भयकथा)

विनिता००२'s picture
विनिता००२ in दिवाळी अंक
19 Oct 2017 - 12:00 am

Header2
लेखन आणि अभिवाचन :- विनिता००२
पार्श्वसंगीत :- वेल्लाभट

पुढे काय वाढून ठेवलंय.... या विचारातच इतकी धाकधूक आहे की त्याला रात्रीची वेळ, एकटे आपण, बंद लिफ्ट, तिचे फिरणारे आकडे आणि कडी लावून बंद न करता येणारे दरवाजे या गोष्टींची जोड मिळाली तर भीतीशिवाय त्या दारापलिकडे काहीच दिसत नाही.

सासुलीचा योगी श्री सावत्या

रुस्तुम's picture
रुस्तुम in दिवाळी अंक
18 Oct 2017 - 12:00 am

header
"लाह्या व्हाया, लाह्या व्हाया!!!"असा काहीसा आवाज बसमध्ये ऐकायला आला की आम्हास समजायचे बेलापूर आलेले आहे आणि पाच एक मिनिटात ऑफिसमध्ये पोहोचणार, किंवा अचानक रेड्याचा आवाज ऐकायला यायला लागला की आम्हास समजायचे आता पांडवकडा आलाय आणि मग आम्ही आमची झोप आवरायला लागायचो.असले उद्योग कोण करणार? सावत्याच. आमचे बसमधले घड्याळच म्हणा. फक्त यांत्रिक घड्याळ आणि हे मानवी घड्याळ ह्यातला फरक असा की ह्याचा आवाज ऐकला की आमच्या चेहऱ्यावर हास्याची एक लकेर नकळत उमटायची.

दृकश्राव्य विभाग :- स्मरणरंजन - माज्या आज्याचा दारूचा धंदा

गोष्ट तशी छोटी...'s picture
गोष्ट तशी छोटी... in दिवाळी अंक
17 Oct 2017 - 12:00 am

Header2
लेखक :- ब्रिटिश
अभिवाचन :- अंशुमन विचारे
विशेष आभार :- किरण माने, अमोल उदगिरकर आणि छोटा डॉन

'कोणती तरी गोष्ट करायचीच म्हटलं की सगळी कायनात तुमच्या मदतीला येते' असं शाहरुख म्हणून गेलाय. ते खोटं नाहीये!

जेडी५८

मकरंद घोडके's picture
मकरंद घोडके in दिवाळी अंक
17 Oct 2017 - 12:00 am

Header2

चार वर्षं झाली आता रिटायर होऊन. VRS! सध्या माझं वय ५८. मज्जानु लाईफ. झपाट्याने दिनक्रम बदलूनच टाकला. रात्रीची वेळ ड्यूटीची - रात्री ९ ते सकाळी ६. हवेत तरंगलेला वेळ - म्हणजे काम असूनही नसल्याचा आनंद जास्त.

Observation, calculation & study.

ही माझी लाडकी सायकल आणि ही आपली दोस्त JD! (काळ्या बॅगेला जास्त कवटाळून) खर्च तो कसला नाहीच.