जनातलं, मनातलं
कल्पकता
असंख्य भारतीय पापक्षालनासाठी गंगेत डुबक्या मारत असताना डीपसिक या नवजात चिनी कंपनीने अमेरीकेच्या तंत्रवर्चस्वाला हादरवणारे "अल्प मोली बहुदुधी" असे नवीन आर१ हे मॉडेल बाजारात आणले आणि अनेक मातब्बर कंपन्यांचे शेअर्स गडगडायला सुरुवात झाली.
Lessons in Chemistry!
बऱ्याच दिवसांनी एक चांगली heartwarming सिरीज बघितली. ८ भागांच्या ह्या सिरीज मध्ये ६० च्या दशकातील अमेरिकेतील काळ उत्तम उभा केला आहे. Brie Larson(Captain Marvel फेम) ने Elizabeth Zott हे केमिस्ट्री मध्ये करियर करू इच्छिणाऱ्या पण विविध कारणांमुळे डावलले गेलेल्या आणि नंतर एक यशस्वी पण वेगळा कुकिंग शो चालवणाऱ्या कणखर स्त्रीचे पात्र साकारले आहे.
हस्ताक्षराचा ऱ्हास - एक Pen-demic
नुकत्याच पार पडलेल्या जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने ...
तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरात लिखाण करता का? पेन, पेन्सिल वापरून कागदावर लिहिता का? एखादे पत्र लिहून पाठवता का? खरीखुरी रोजनिशी लिहिता का?
कोष
दर्द में डूबे हुए नग़मे हज़ारों हैं मगर
साज़-ए-दिल टूट गया हो तो सुनाए कैसे |
अनेक शायरांची प्रतिभा अशा डिप्रेशस मूड मधूनच फुलली.गम / उदासी ची पण एक नशा असते त्यांना.हा एक प्रकारचा डिफेन्स मेकॅनिझम असतो. सब्लिमेशन म्हणतात त्याला. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही फेजेस या ना त्या प्रकारे कुठल्याना कुठल्या टप्प्यात येतात.
मंजर-ए-सुब्हा उर्फ मांजरसुंबा किल्ला
प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व गड किल्ले गर्दीने भरून जातात.तेव्हा ट्रेक कॅम्पने आदल्या दिवशीच छोटासा मॉर्निंग ट्रेक घेतला...मांजरसुंबा गड!
प्लॅनेटरी अलाईनमेंट: सोशल मीडियाची कमाल!
नमस्कार. गेल्या अनेक दिवसांपासून सतत एक मॅसेज व्हायरल होतोय की, २५ जानेवारीला सगळे ग्रह एका रेषेमध्ये येणार आहेत, खूप अभूतपूर्व दृश्य असेल वगैरे. काही वेळेस तर त्याचे फोटोज- व्हिडिओजही व्हायरल होत आहेत. अनेक जणांना त्यावर उत्तर दिल्यानंतर शेवटी हे लिहावसं वाटलं. वस्तुस्थिती सांगण्यापूर्वी तो कंटेंट बनवणार्यांचं खरंच कौतुक! अगदी सगळीकडे तो मॅसेज गेलेला आहे. अगदी शाळेतल्या मुलांपर्यंतही!
शोध
गंगाेत्त्रीच्या त्या बर्फाच्छादित प्रदेशात सूर्य अस्ताला जात होता. हिमालयाच्या शांत, पण भीषण वातावरणात मी विचारमग्न होऊन चालत होतो..घर सोडून 9 महिने होऊन गेले होते. आयुष्याच्या गुंत्यात गुरफटलेलो, अपराधी भावनेने पछाडलेलो. काहीतरी हरवले होते माझे पण शोधायचे कुठे ते कळत नव्हते त्याचा शोध घेत मी इथवर आलो होतो.
"कोणता शोध आहे तुझा?"
दिल्ली विधानसभा निवडणूक
दिल्लीत येत्या पाच फेब्रुवारीला विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार. दिल्लीत भाजप आप आणि कांग्रेस मध्ये तिरंगी लढत आहे. कोण जिंकणार कोण हरणार हे ठरविण्यासाठी तिन्ही पक्षांची निवडानूकीसाठी किती तैयारी आहे हे पाहण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.
चूक-२
मी त्याला नेहमी पाहायचे, पण लक्ष द्यायचं नाही ठरवलं होतं. माझं आयुष्य वेगळं होतं, माझे स्वप्न वेगळे होते. साधीशी मी, काळीसावळी, पण स्वाभिमान माझ्या मनात होता. घरची परिस्थिती हलाखीची होती, बाप दारू पिऊन मरून पडलेला, आई आणि लहान बहिणीची जबाबदारी माझ्यावर होती. कॉलेजला सायकलने जाणं, वर्गात शिकणं, आणि घरी आल्यावर आईला मदत करणं – हेच माझं रोजचं जगणं.
सिंग्युलॅरिटी ऑफ वर्ड्स
प्रस्तावना :
१. सर्वच लोकांची बुध्दीमत्ता समान नसते. हे अगदी वैश्विक सत्य आहे. आणि आपल्याला हे अगदी लहानपणापासुन माहीती आहे. त्यामुळे सगळ्यांना सगळं कळलंच पाहिजे , अनुभवाला आलेच पाहिजे असा आपला हट्ट किंवा दुराग्रह नाही.
चूक
तिची ती संतापी नजर मला सतत विचारत असते, “माझी काय चूक होती? माझ्या येण्याने तिच्या आयुष्यात एवढा मोठा बदल होईल, याचा मला कधीच अंदाज नव्हता.
कराडची मुलगी
नावात काय आहे ? असं कुणीतरी म्हटलंय ! आपण नवीन व्यक्तीला भेटलो किंवा नवीन व्यक्ती आपल्याला भेटली की आपोपाप पहिला प्रश्न हाच विचारला जातो " नाव काय तुझं ? आणि याचं उत्तर देताना चेहऱ्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहत असेल तर ?
गोत्र, जनुकीय दोष इ० इ०
सध्या माझ्या युट्यूब फीडमध्ये अचानक "गोत्र" या निरर्थक कल्पनेवर काही व्हिडीओ दिसू लागले आहेत. सर्व व्हिडीओंमध्ये वैज्ञानिक सत्याचे शक्य तेव्हढे विकृतीकरण करून या गोत्र कल्पनेचे पुनरुज्जीवन करायचा हास्यास्पद खटाटोप केलेला दिसतो.
"मी, मी आणि माझं राजकारण: दुर्बोध तऱ्यांच्या विचारांचा सागर"
बोटीवरच्या शांत वातावरणात समुद्राच्या लाटा आनंददायी संगीत देत होत्या, आकाश निरभ्र होतं, आणि आम्ही सारे प्रवासी या अनुभवाचा आनंद घेत होतो. पण त्याच वेळी, एका कोपऱ्यातून एक कर्कश गाज ऐकू येत होती. हा आवाज होता दुर्बोध तऱ्यांचा, ज्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे "मी" आणि त्यांची सगळीकडून असलेली असहिष्णुता.
निवडणूक: एका मतदान केंद्र व्यवस्थापनाचा पक्षांचा खर्च किती येतो
निवडणूकीच्या दिवशी मतदाता मत देण्यासाठी मतदान केंद्रावर जातो. मतदात्याने मतदान केन्द्रावर जाऊन आपल्या पक्षासाठी मतदान केले पाहिजे यासाठी प्रत्येक राजनीतिक पक्षाला यंत्रणा राबवावी लागते आणि त्यासाठी मनुष्यबळ ही लागतो आणि त्यासाठी पैसा ही खर्च करावा लागतो. लोकसभा निवडणूकीच्या वेळी दोन्ही पक्षांचे बूथ प्रमुख माझ्या समोरच लहानचे मोठे झाले होते. त्यांच्या कडून मिळालेल्या माहिती आधारावर हा लेख.
जॉन अब्राहम (भाग ३)
जॉन अब्राहम १ ==> जॉन अब्राहम २
शेवटी दुसर्या दिवशी १५ एप्रिलला सकाळी ७:२२ वाजता लिंकन यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले . . .
तर्पण फाउंडेशनचा सोहळा: अनाथांच्या नाथा तुज नमो
✪ समाजातल्या अवघड प्रश्नांना सोडवण्याचा ध्यास
✪ पंखास या बळ दे नवे, झेपावया आकाश दे
✪ कर्तृत्वाचा व दातृत्वाचा "सेतू"
✪ अनाथ असण्यापासून सनाथ होण्याचा प्रवास- गायत्री पाठक
✪ गुंतागुंतीच्या प्रश्नांवर मिळूनी करू मात
✪ "तुम्ही जे कराल, तेच तुमच्याकडे फिरून येईल"
✪ अनाथ मुलींना मिळणार हक्काचं माहेर
✪ कौन कहता है कि आसमां में छेद नहीं हो सकता
- ‹ previous
- 12 of 1005
- next ›