प्रो.देसाई म्हणतात........
"लोक अलिकडे जरा आपमतलबी,हलक्या मनाचे आणि सहनशिलतेचं वावडं, जास्त असलेले झाले आहेत.इतके लोक संतापी झालेले मी पाहिलेले आठवत नाहीत.कुणी भगवी टोपी घातली कां कुणी हिरवी टोपी घातली म्हणून लोक कोणत्याही थराला जातील असं मला तरी आठवत नाही.जरा गर्दीत कुणाला चुकून धक्का लागला तर अशा थराला प्रसंग जातो हे पण मला आठवत नाही.
काय झालं आहे या लोकानां?"
प्रोफेसर देसाई मला त्यादिवशी अगदी वैतागून सांगत होते.
मला म्हणाले,
" जराशी सहनशिलता नक्कीच कामी येते.बरेचसे लोक हल्लीच्या जमान्यात फारच टेन्शन ठेवून असतात.तसंच ते कुठला ही प्रसंग असो त्याला तोंड द्दयायला फारच कमी सोशिक झाले आहेत.असले लोक लवकर म्हातारे होणार.
मिसळपाव