Skip to main content

मी लेलेंना शोधतोय....

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 07/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
त्यांचं आडनाव लेले नाही. म्हणजे, लेलेच आहे, की नाही, ते मला नक्की माहीत नाही. त्यांचा नक्की पत्ता मला माहीत नाही. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराजवळ कुठेतरी ते राहातात. एवढंच मला माहीत आहे. म्हणजे, माझ्या सहकार्‍यानं मला त्यांच्याबद्दल सांगितलं, तेव्हा ते तिथं कुठतरी राहातात, एव्हढच मला कळलं होतं. तेव्हापासून, सिद्धिविनायकासमोरून येताजाताना मी त्या दिशेनं भक्तिभावानं हात जोडतो. अर्धा सिद्धिविनायकाला, आणि अर्धा त्या लेले, की कुणी, त्यांना... सिद्धिविनायकाच्या शेजार्‍याला... ...

अशी ही एक श्रद्धा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 06/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
"मी लहान असताना घरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावरच्या गाड्याना पाहून एक दिवस कुणी तरी गाडी थांबवून उतरणारी व्यक्ति माझे वडिल व्हावेत अशी मी उगाचच कल्पना करीत रहायचो.

..

लेखक प्रियाली यांनी रविवार, 06/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
..

आयुष्यावर प्रेम करावे--

लेखक पुष्कराज यांनी रविवार, 06/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कधी वाटते सोडून जावे अवतीभवतीचे हे सारे कुठुन कशाची ओढ लागते पुन्हा गुंततो इथे कसा रे कधी वाटते का जाउ मी सोडून माझे सखे सोबती अशाच वेळी श्वास कोंडतो विझुनी जाते जीवन ज्योती येणे जाणे आणि थांबणे आपुल्या हाती नाहीच काही तोच मांडतो खेळ पसारा तोच नकळता आवरून घेई तरीही येथे गुंतुन जावे आयुष्यावर प्रेम करावे मातीत शेवटी जाणे आहे कुठे तरी पण नाव उरावे
Taxonomy upgrade extras

अशी गुमसुम आवडतेस मला

लेखक धनंजय यांनी रविवार, 06/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
अशी गुमसुम आवडतेस मला *** अशी गुमसुम आवडतेस मला, ... जणू नसतेसच इथे खूप दुरून ऐकतेयस - माझा ... आवाज तुला नाही शिवत. वाटते तुझी दृष्टी तुला ... सोडून गेलीये दूर उडून एक चुंबन जणू तुझे ... ओठ असावे घट्ट शिवत. * सगळ्याच गोष्टी आहेत जशा ... माझ्या आत्म्याने भरलेल्या माझ्या आत्म्याने भरलेली ...
Taxonomy upgrade extras

सबनीसांचा वसंता

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 06/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही त्याला वसंता कधीच म्हटलं नाही.त्याला आम्ही सबनीस म्हणूनच ओळखत होतो.त्यालापण सबनीस म्हणून हांक ऐकण्याची संवय झाली होती. हा सबनीस मडुऱ्याचा.हे एक सावंतवाडी तालुक्यातलं लहानसं खेडं. दहा पांच घरं सबनीसांची होती.लहानपणी जवळच्या मराठी शाळेत शिकून झाल्यावर, सबनीस सावंतवाडीला ईग्रजी शिकायला आपल्या एका नातेवाईकाच्या घरी राहात होता.त्याचे वडील, त्याच्या खर्चाचे पैसे नियमीत पाठवीत असत सबनीसाचं शिक्षणात जास्त मन रमलं नाही.जेमतेम मॅट्रीक झाल्यावर, तो वडीलांची परवानगी घेऊन मुंबईला गेला.

मिसळपाव आता पोलिसांच्या ताब्यात! :)

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 05/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आता येथे जरा जपून लेखन करा बरं! कारंण आपलं मिसळपाव आता महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात गेलं आहे! :) अतिशय कष्टाने व जीव लावून मिसळपाव हे संकेतस्थळ उभारणारे मिसळपावचे तांत्रिक सल्लागार नीलकांतराव हे एम पी एस सी ची परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची पोलिस उप-निरिक्षक (PSI) या पदाकरता निवड झाली आहे.

द्विधा मनाचि

लेखक namdev narkar यांनी शनिवार, 05/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सा॑गु कसे तुला मी माझ्या मनातले ओठा॑त शब्द येन्या आधीच था॑बले ह्या मुक भावना असत्या तुला कळाल्या नसत्या का मग सरीता सागरास मिळाल्या ती नजरा नजर अन चोरुन पाहणे कावरे बावरे होउन गर्दीत मज शोधणे मग कळले मलाही सम भावना तुलाही मग कशास तिश्ठणॅ हे मन का देत नाही ग्वाही

पावसा!

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 05/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कोरड्या हृदयात माझ्या बरसून जा रे पावसा एकट्या वाटेत माझ्या हरवून जा रे पावसा वाटतो विश्वास सार्‍या निश्चयाचा मेरू मी अंतरीच्या बालकाला रडवून जा रे पावसा नांदतो रुसवा जसा की डाग तो चंद्रावरी पाहण्या गाली खळी हसवून जा रे पावसा हासतो फसवा अन मी मनातच रडतो किती शुष्क या वैराण नयना भिजवून जा रे पावसा हाकतो होडी कुणी, भिजवतो-भिजतो कुणी बाळगोपाळांस सार्‍या जमवून जा रे पावसा वाटतो तु मित्र कोणा, कोणास तुची देव रे सार्‍यांस सारे देउनीही कमवून जा रे पावसा चिंब हे करसी असे प्रत्येक तु या मानसी भिजण्यास परतूनी यायचे ठरवून जा रे पावसा -ऋषिकेश
Taxonomy upgrade extras