शाळा
शाळा
अथांग सागर यांच्या आठवणी या कवितेमुळे आम्हाला ही शाळेची आठवण झाली
-------------------------------------------------------------------------
शाळे समोरुन जाताना
बालपण मनात गवसत
वर्गात डोकाऊन पहाताना
आठवणींनी मन भरतं
मागे वळुन पहाताना
वाटत तिथेच आहोत आज
तेच सर्व मित्र अन्
तोच बसायचा बाक
आठवणी असतात अभ्यासाच्या
मार दिलेल्या गुरु़जींच्या
मधल्या सुट्टीत गंमत भारी
होती शाळा माझी न्यारी.
माझ्याही आहेत अनेक आठवणी
शाळे मधल्या गमतीच्या
खेळामधल्या मस्तीच्या
सहलीतल्या सफरीच्या
ह्रदयात त्या रुजल्या आहेत
कायमच्या घर करुन बसल्या आहेत
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
