आयुष्यावर प्रेम करावे--
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कधी वाटते सोडून जावे
अवतीभवतीचे हे सारे
कुठुन कशाची ओढ लागते
पुन्हा गुंततो इथे कसा रे
कधी वाटते का जाउ मी
सोडून माझे सखे सोबती
अशाच वेळी श्वास कोंडतो
विझुनी जाते जीवन ज्योती
येणे जाणे आणि थांबणे
आपुल्या हाती नाहीच काही
तोच मांडतो खेळ पसारा
तोच नकळता आवरून घेई
तरीही येथे गुंतुन जावे
आयुष्यावर प्रेम करावे
मातीत शेवटी जाणे आहे
कुठे तरी पण नाव उरावे
वाचने
3203
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
अगदि खरं आहे
:)
चांगली कविता..
कधी वाटते
सुंदर आणि
सुंदर कविता.
In reply to सुंदर कविता. by llपुण्याचे पेशवेll
छान कविता