गटारी अमावस्या
गटारी अमावस्या -
गेले काही वर्षांपासुन गटारी अमावस्येला एका उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. ३१ डिसेंबर सारखेच या दिवसा कार्यक्रम आखले जातात.
श्रावण महिन्यात मांसाहार साधारण पणे केला जात नाही. पुढील संपुर्ण श्रावण महिना उपवास घडणार असल्याने श्रावण सुरु होण्यापुर्वीच्या अमावस्येदिवशी भरपेट मांसाहार ( पेयपान ) करुन पुढील महिन्याची उणीव भरुन काढण्याचा प्रयत्न केला जातो. ( मुंबईत बहुतेक श्रावण सुरु होण्यापुर्वीचा शेवटचा रविवार गटारी म्हणुन साजरा केला जातो. )
यामागचे काय शास्त्र आहे ? काय रुढी आहेत ? हे या चर्चेतुन माहित करुन घ्यायला आवडेल.
मिसळपाव
