मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Sense of Humour

kurlekaar ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
‘विनोद’ सगळ्यांनाच आवडतो. मलादेखील तो माझ्या लहानपणापासून आवडत आलाय. सुरुवातीस चिं वि जोशी(चिमणराव आणि गुंड्याभाऊ), नंतर पु. ल. व त्यानंतर गंगाधर गाडगीळ (बंडू आणि स्नेहलता), वि. आ. बुवा(मालन मोहिले), द. मा. मिरासदारांहवाच्या ग्रामिण पार्श्वभूमीवरच्या कथा, व इंग्रजी वाचायला सुरुवात केल्यानंतर P G Wodehouse. मोठेपणी वाटायला लागलं की आवडणं वगैरे ठीक आहे पण विनोद मला का आवडतो याचं विश्लेषण करावयास हवं. विनोदासाठी बुद्धी व शब्दकौशल्य आवश्यक आहे; एक पारदर्शक, स्वच्छ स्वभाव देखिल लागतो नाहीं तर विनोदाचा दर्जा व पातळी घसरायला लागते.

१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ३

स्पार्टाकस ·
२२ एप्रिलच्या दुपारी स्कॉट फिशरच्या तुकडीतील शेर्पा नवांग तोपचे याला 'हाय अल्टीट्यूड पल्मनरी एडेमा' ने ग्रासलं. फिशरच्या तुकडीतील गिर्यारोहक सराव आणि अ‍ॅक्लमटायझेशन मध्ये मग्न होते. तीन दिवसांपासून नवांग वरच्या कँपवर सामान वाहून नेण्याचं काम करत होता. फिशर कँप २ वरून बेस कँपला परत येताना त्याला एका दगडावर बसलेला नवांग दिसला होता. दोन दिवसांपासून आपल्याला श्वसनाचा त्रास होत असल्याचं त्याने फिशरपाशी कबूल केलं. फिशरने त्याला ताबडतोब बेस कँपला परतण्याची आज्ञा केली. नवांगची मात्र त्या गोष्टीला बिलकूल तयारी नव्हती.

काही प्रश्र्न......

मुक्त विहारि ·
गेली कित्येक वर्षे काही प्रश्र्न मनांत आहेत. १. गुजरात मधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर आग गाडी जाळलीच नसती तर दंगल झाली असती का? २. मुझफ्फर नगर दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे जाट मुलीची छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? ३. आज काल हिंदी सिनेमांतील हिंदू नायकांचे प्रमाण कमी का झाले आहे? ४. अफगणीस्तान मधील मुर्तींचा नाश केला गेला तेंव्हा, भारताची नक्की भुमिका काय होती? ५. काश्मीर मधील हिंदूंचे प्रमाण अचानक कमी का झाले? ६. जागेचे भाव अचानक कसे काय वाढले? ७. भिवंडी, मुंब्रा ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत? ८.

कॅलीडोस्कोप

kurlekaar ·
लेखनप्रकार
कॅलीडोस्कोप --१-- श्रावणातला सत्यनारायण. तिची नवी कोरी साडी व माझे बऱ्याच दिवसांत न घातलेले सदरा व सुरवार. चौरंग, केळीचे खुंट; श्रीगणेश व लंगडा बाळकृष्ण मूर्तिमय, पण सुपाऱ्यात मांडलेले नवग्रह आणि कलश व श्रीफल मिळून केलेला प्रतिकात्मक सत्यनारायण. ओळखीचे साधू वाणी व त्याचा जावई, लीलावती व कलावती. पंचामृत, व आमच्या हिचा केवळ शिरा म्हणून करतांना कधीकधी चुकणारा पण प्रसादाच्या रूपांत नेहमीच अचूक व हवाहवासा वाटणारा.

त्यांच्या चष्म्यातून भाग ५ : हमीदचे मुसलमान .

राजघराणं ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
त्यांच्या चष्म्यातून भाग ५ : हमीदचे मुसलमान . हमीद दलवाई आणि माझा स्वधर्माकडे पहाण्याचा चष्मा एकच आहे. ज्या दृष्टीकोनातून हमीद इस्लामकडे आणि मुस्लिम समाजाकडे पाही , नेमक्या त्याच दृष्टीकोनातून मी हिंदूचे यच्चयावत धर्म आणि समग्र हिंदू समाज यांकडे पाहतो. हमिदचा दलवाई्चां चष्मा माझ्या नेहमीच्या वापरातला असल्याने , प्रस्तुत लेख प्रथमपुरुषी एकवचनात लिहिला आहे . पण लेखातले प्रत्येक वाक्य आणि विचार प्रवाह मात्र हमिदचाच .

फ्लाईट १९ : मिस्टरी ऑन विंग्स (भाग-१)

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकतचं दिनांक ८ मार्च २०१४ रोजी एम.एह.३७० ही कुलालंपुर-बिजींग हे विमानं कुठलेही सबळ पुरावे नं देता गायब झालय. चीन, मलेशिया आणि इतर अश्या सुमारे १० देशांच्या संयुक्त शोधपथकांना सुमारे ३२,००० चौरस कि.मी. चा परिसर चाळुन काढल्यानंतरही २७७ प्रवासी, मलेशिया एअरलाईन्स चे १२ कर्मचारी आणि बोईंग ७७७ ह्या प्रचंड विमानाचं नक्की काय झालं ह्याचा काही पत्ता नाही. कुठलेही अवशेष, मृतदेह किंवा ईतर पुरावे मागे नं ठेवता गायब झालेल्या ह्या घटनेनंतर दुसर्या महायुद्धाच्या काळात अश्याच गुढ रितीनी गायब झालेल्या फ्लाईट नं. १९ ची आठवण झाली नाही तरच नवल.

भरतपूर व भिंडावास

जयंत कुलकर्णी ·
चलत मुसाफिर यांचा धागा बघून दोन वर्षापूर्वी केलेल्या सहलीची आठवण झाली. इतर माहिती त्यांनी दिलीच असल्यामुळे मला फक्त छायाचित्र टाकायचे काम बाकी आहे....:-) पण हरियानात भिंडावास नावाचा एक मस्त ठिकाण आहे ज्यात पाण्याभोवती १२ कि.मीचा चालण्याचा मातीचा रस्ता आहे. मधे पक्षी व आपण रस्त्यावरुन ते बघायचे असा कार्यक्रम फारच छान असतो. हे पाणे कृत्रीमरित्या साठवले आहे.