Sense of Humour
‘विनोद’ सगळ्यांनाच आवडतो. मलादेखील तो माझ्या लहानपणापासून आवडत आलाय. सुरुवातीस चिं वि जोशी(चिमणराव आणि गुंड्याभाऊ), नंतर पु. ल. व त्यानंतर गंगाधर गाडगीळ (बंडू आणि स्नेहलता), वि. आ. बुवा(मालन मोहिले), द. मा. मिरासदारांहवाच्या ग्रामिण पार्श्वभूमीवरच्या कथा, व इंग्रजी वाचायला सुरुवात केल्यानंतर P G Wodehouse. मोठेपणी वाटायला लागलं की आवडणं वगैरे ठीक आहे पण विनोद मला का आवडतो याचं विश्लेषण करावयास हवं. विनोदासाठी बुद्धी व शब्दकौशल्य आवश्यक आहे; एक पारदर्शक, स्वच्छ स्वभाव देखिल लागतो नाहीं तर विनोदाचा दर्जा व पातळी घसरायला लागते. शाब्दिक कोट्या करायला व उपरोधात्मक (कुजकं) बोलायला सुद्धा बुद्धी व शब्दकौशल्य लागतच पण कोट्याना तेवढंच भांडवल पुरत व कुजकं बोलायला तर चक्क अस्वच्छ स्वभाव लागतो.
आपण ‘विनोदा’कडे सर्वसाधारणतः एक बुद्धीचा आविष्कार म्हणून बघू शकतो पण निव्वळ विनोदा ऎवजी त्या पेक्षा जास्त व्यापक असलेल्या ‘विनोदबुद्धी’ (Sense of Humour) कडे निरखून बघणं इथं मला आवश्यक वाटतं. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंची कांही वाक्ये, त्यांचे शब्द आपल्या लक्षात रहातात कारण ती आपल्याला ते शब्द/वाक्यं तेंव्हा तरी पटलेले असतात, कधी कधी ते शब्द पूर्णतः पटले नसले तरी आपल्याला अजून खोलात जाऊन विचार करायला लावतात. मी विशीत असतांना मला दोनतीन वर्षांनी सिनिअर असलेल्या एकाचे शब्द आठवतात “आपण एखाद्याच्या sense of humour बद्दल जेंव्हा बोलतो तेंव्हा नकळत आपण स्वतःच्या sense of humour बद्दलही बोलत असतो”. अगदी बरोबर कारण जर व त्या (पहिल्या) व्यक्तीचा humour आपल्या स्वतःच्या Humour च्या चौकटीत बसत असेल तरच आपण म्हणतो की “ या अमुक अमुक व्यक्तीला चांगला sense of humour आहे“, नाहींतर नाहीं.
मला याहि कक्षेच्या पलीकडे जाऊन Sense of Humour चा अजून व्यापक अर्थ शोधावासा वाटतो. पण त्या साठी आपल्याला थोडसं वैचारिक उंचीवर जाऊन विनोदाकडे फक्त बुद्धीचा आविष्कार म्हणून न पाहता तो स्वभावाचा एक पैलू किबहुना स्वभावाचं मुलभूत रूप असू शकतो हे ग्राह्य धरायला हवं. म्हणजेच की आपला sense of humour हा आयुष्याकडे बघण्याचा हा आपला एक दृष्टीकोन(attitude) असतो; तो फक्त हसण्यासाठी व हसण्यापर्यंत मर्यादित राहत नाहीं, तो आपलं आयुष्याचं एक तत्वज्ञान बनून जातो. प्रतिकूल परिस्थितीत देखिल ही व्यक्ति स्वतःचं Bearing बिघडू देत नाहीं. The yellow Rolls Royce या चित्रपटांत Shirley MacLaine जेंव्हा Alain Delon ला एका अल्पजीवी पण उत्कट affair नंतर अगदी अनपेक्षित रित्या सोडून निघुन जाते, तेंव्हा जवळच्या एका कठड्यावर बसून तो मस्त हसत बसतो. Roman Holiday मध्ये देखिल Gregory Peck ला Audrey Hepburn ही एक राजकन्या आहे हे शेवटपर्यंत माहित नसतं व तिला तो एक गरीब बिचारी समजून दिवसभर रोम दाखवीत फिरतो. प्रेमाचे अंकुर फुटायला सुरूवात देखिल होते. व चित्रपटाच्या शेवटी एका औपचारिक स्वागत समारंभातून त्याची ओळख या राजकन्येशी करून दिली जाते व या समारंभातून Gregory Peck स्वताशीच छान हसत हसत बाहेर पडतो..
चित्रपटांतला असला तरी हा खरा sense of humour.
वाचने
5140
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
दोनशेच्यावर वाचने झालीतरी
In reply to दोनशेच्यावर वाचने झालीतरी by कंजूस
मला वाटतं Admin साहेबांनी
बंडू आणि स्नेहलता हा "ओतावि"
In reply to बंडू आणि स्नेहलता हा "ओतावि" by आदूबाळ
ओतावि म्ह. काय?
In reply to ओतावि म्ह. काय? by बॅटमॅन
ओढून ताणून विनोद असं असाव
In reply to ओढून ताणून विनोद असं असाव by अनुप ढेरे
रैट्ट.
In reply to बंडू आणि स्नेहलता हा "ओतावि" by आदूबाळ
आपण ज्यांना classic किंवा
Roman Holiday मध्ये देखिल
Please watch the movie again
please watch the movie again
In reply to please watch the movie again by वडापाव
ग्रेगरी पेक ला ऑड्रे हेपबर्न
विनोदबुद्धी वर लिखाण
In reply to विनोदबुद्धी वर लिखाण by चित्रगुप्त
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल
घरी गेल्यावर वेळ मिळाल्यास या
सेन्स ऑफ ह्युमर (विनोदबुद्धी)
In reply to सेन्स ऑफ ह्युमर (विनोदबुद्धी) by सुनील
+100
In reply to सेन्स ऑफ ह्युमर (विनोदबुद्धी) by सुनील
यापेक्षाही, दुसर्यादने आपणावर
In reply to सेन्स ऑफ ह्युमर (विनोदबुद्धी) by सुनील
यापेक्षाही, दुसर्यादने आपणावर
In reply to यापेक्षाही, दुसर्यादने आपणावर by kurlekaar
अगदी बरोबर म्हणून तुम्हाला मी
जर व त्या (पहिल्या) व्यक्तीचा
In reply to जर व त्या (पहिल्या) व्यक्तीचा by मनीषा
विनोदबुद्धी सर्वसाधारणता
In reply to विनोदबुद्धी सर्वसाधारणता by kurlekaar
तुमच्या लेखात, नायकाला सत्यं
In reply to तुमच्या लेखात, नायकाला सत्यं by मनीषा
हा चित्रपट मी १९६० नंतर
In reply to हा चित्रपट मी १९६० नंतर by kurlekaar
"Gallows humor is humor in
जे वरती व्हिडीयो देणार असे