Skip to main content

प्रथम तुज पाह्ता , जीव वेडावला अर्थात टू स्टेट्स

लेखक पेट थेरपी यांनी रविवार, 20/04/2014 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
एक पे एक फ्री ही मार्केटिंग मधली हमखास यशस्वी होणारी युक्ती आहे. चित्रपटाच्या रंगीत दुनियेतही ती वापरली जाते पण नेहमी यशस्वी होईलच असे नाही. असं बघा पहिले फरहा आली दोन चार चित्रपट करून विंदू कुमार बरोबर लग्न करून स्थिरावली. पण तिच्या पावलावर पाउल टाकून तब्बू आली. आणि पहिला प्रेम सोडा,( पहिला डाव भुताच असतो ना... ) पण प्रत्येक चित्रपटाद्वारे उत्तम काम करून तिने आपला असा क्लास निर्माण केला. सनी देवलच्याच घरातून बॉबी आला. तो बेताब आम्ही थेटरात जाउन बघितला होता हे कबूल करणे ही आता तरुणपणी केलेली एंबरासिन्ग कामे ह्या फोल्डर मध्ये टाकून डिलीट करायची बाब झाली.

बघ जरा बघ जरा,

लेखक माहितगार यांनी रविवार, 20/04/2014 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
जातं फिरवता फिरवता, कुणी माणुसकी भरडू नये, खूंटीचे त्रैत मांडून, स्वतः इब्लिस होऊ नये ! रक्ताच कांडणं दळूनं, कुणी माज जोडू नये श्रमीकांच्या रक्तानं माखून, 'वाह ताज' म्हणू नये ! फिरकी घेत, गिरकी घेत, किती बेफिकीर होशील ? भरडलेल्या अमानूष गणितांवर थिरकत, किती ओंगाळवाणा होशील ? मेंदूला चिडवताना, मनांना डिवचताना कुठे आहे भान ? नको चिवडतबसू बापजाद्यांची अस्तीत्वहीन शान बस्स झालं, रक्ताळलेलं जातं तूझ, आता फिरवू नको कुठे, बघ जरा बघ जरा, पेटलयं चोहीकडे माणूसकीच रानं !

रवा डोसा पण वेगळा !

लेखक Prajakta२१ यांनी रविवार, 20/04/2014 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
मावशीकडे गेले होते तेव्हा तिथे एक डोसा नुसताच खाल्ला तो मस्त लागला म्हणून त्याची कृती मावशीला विचारून इथे लिहितेय. साहित्य: १. एक वाटी बारीक रवा २. एक वाटी मैदा (diet बद्दल जागरूक असलेल्यांनी मैद्याऐवजी तांदळाचे पीठ वापरले तरी चालेल) ३. २-३ कांदे किसून ४. ताक ५. मीठ , साखर चवीनुसार फोडणीसाठी - जिरे, तूप,३-४ मिरच्या बारीक चिरून कृती : १.

एका कादंबरीची कथा

लेखक रामदास यांनी रविवार, 20/04/2014 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ :सारस्वत कॉलनी सांताक्रुझ ठाकूर सर सकाळची प्रभातफेरी आटपून घरी आले.एरवी चहा वाट बघत असायचा पण आज घराचा मूड काही बरा वाटत नव्हता. त्यांनी शोधक नजरेनी अंदाज घेण्याचा प्रयत्न केला पण टिपॉयवर साठलेली एक नोटबुकांची चळत सोडता काही नजरेस येईना. ही बुकं कुठून आली बॉ असा विचार मनात आला पण घराच्या मूडाचा अंदाज घेण्याच्या विचारात ते राह्यलंच. मॅडम ते यायच्या अगोदरच बाहेर पडल्या होत्या. एरवी ते फोन फारसा वापरत नाहीत पण त्यांनी मॅडमना फोन लावलाच. " कुठ्येस ?" "माहीमला पोचत्येय" "आज घाईत होतीस का ?" "नाय हो पळाले घरातून आज " ठाकूरांना काही कळेना .

पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये......

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 20/04/2014 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा... सांगायलाच पाहिजे का? पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये...... (आजकाल त्या साठी पिठाच्या गिरण्या असतात तिकडे जावे. जात्यावर पिठ काढण्याची परंपरा आता जूनी झाली आहे म्हणून.) (पूर्वी जात्यावर पिठ काढताना बायका ओव्या म्हणायच्या, देवाचे नाव घ्यायच्या. आजकाल पिठाच्या गिरणीत जोरजोरात "गन्नम स्टाईल" लावलेले असते. त्याच तालावर गिरणीवाला धान्य दळत असतो. तोच संस्कार कदाचीत त्या पिठावर होत असेल. पण तरी सुध्दा, उगाच संस्कार वगेरे करण्यासाठी म्हणून, बळेच स्वतःचे कंबरडे मोडून घेउ नये....

मी आणि माझे नशीब

लेखक सुनिल जाधव १९७९ यांनी रविवार, 20/04/2014 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
मी आणि माझे नशीब हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण माझे नशीब कुणी लिहिले हे मला आणि कुणालाच माहित नसते.... बरोबर ना तरी पण हा विषय निघालकी लगेच सगळे आपापल्या विश्वात म्हणजेच भूतकाळात जातात.... कोण होतो मी आणि काय झालो मी...... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि काळाचा दिवस गेला आणि उद्याचा दिवस आपला आहे तेव्हा उद्या साठी आपले नशीब घडवा... आणि ते फक्त आपण आणि आपणच घडवू शकतो ...... तेव्हा मी आणि माझे नशीब यावर चर्चा बंद करा आणि नशीब घडवायला सुरवात करा... आजच आणि आतापासूनच.... येतो मी आता....

सामान्य आणि अ सामान्य

लेखक देशपांडे विनायक यांनी रविवार, 20/04/2014 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
श्री अमोल पालेकर पोलिसाकडे तक्रार करून आले त्यांचे नाव मतदार यादीतून गायब कसे झाले याचा शोध पोलिसांनी घ्यावा असे त्यांचे म्हणणे दिसते माझे नाव मतदार यादीत आहे का नाही हे मी नेट वर पाहिले मतदार यादी नेट वर दिसते हे मी वर्तमानपत्रातून वाचले माझे नाव मतदार यादीत दिसत नव्हते नेटवरून मी तक्रार नोंदविली एका आठवड्यात मला SMS वरून कोणाला भेटावे ते कळवण्यात आले मी त्या अधिकारी व्यक्तीस जाऊन भेटलो माझे म्हणणे ऐकल्यावर मला माझे नाव नोंदवून मिळाले माझे नाव गायब का झाले तेही समजले मी सामान्य माणूस असल्याने कायदे पाळण्याकडे माझा जास्त कल आहे चांगले अधिकारी भेटले तर माझे काम लवकर होते हा योग कधीतरी येतो ह

आर्र....राजकुमार

लेखक तिमा यांनी रविवार, 20/04/2014 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
आर्र... राजकुमार पुणे-मुंबई वोल्वो प्रवासात बरेचदा हिंदी चित्रपट बघावे लागतात. तर आमचे महतभाग्य असे की, काल आम्हाला एक अद्वितीय, 'आर्..राजकुमार' नांवाचा चित्रपट बघायला मिळाला. आधी, थोडावेळ आम्ही त्याकडे बघण्याचे टाळून खिडकीबाहेर बघत होतो. पण मारधाडीचे आवाज, जबरदस्त संवाद आणि गुलजारला घरी बसायला लावतील अशा ग्रेट काव्याची गाणी कानावर आदळू लागली. त्यांत बाहेरुन ऊन यायला लागले. मग पडदा बंद करुन चित्रपट बघायचे ठरवले. जुन्या जमान्यातले असल्याने हिरो-हिरॉईन ना नुसते बघून त्यांची नांवे माहित असणे हे गृहीत नव्हतेच.

शिल्पे घडविली बहु कुशलता..

लेखक सूड यांनी रविवार, 20/04/2014 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
तर!! सांगायची गोष्ट अशी, की मिपाकर कुठेही गेले की धागा हा निघालाच पाह्यजे (असं म्हणतात). बरं, असे काही प्रवासवर्णाचे धागे लिहायचे म्हणजे जाम टेंशन येतं. त्यात लेण्यांबद्दल लिहायचं म्हणजे आणखीच टेंशन!! तरीही म्हटलं आता लोक एवढा आग्रह करतातच आहेत तर खरडाव्या चार ओळी. पुष्कळ दिवसांपासून हो-नाही करत लांबत चाललेला वेरुळ लेण्यांच्या भेटीचा विषय पुन्हा एकदा निघाला. आणि व्हॉट्स अ‍ॅप, प्रत्यक्ष भेटीतून प्लान बनू लागले. दोन दिवसांचाच प्लान करायचा असं कळल्यावर बर्‍याच जणांनी हात वर केले, म्हणजे सहमती दर्शवली.

मुनुस्वामी आणि मागाडीचा चित्ता

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 20/04/2014 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदुस्थानच्या पूर्व किना-यावर मद्रास आणि पश्चिम किना-यावर मँगलोर यांना जोडणारी सरळ रेषा काढली तर त्या रेषेवर मधोमध बंगलोर शहर येईल. समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फूट उंचावर असल्याने बंगलोरची हवा अत्यंत आल्हाददायक असते. अती थंड नाही आणि अती उष्णही नाही, अती पाऊस नाही आणि अगदी कोरडंही नाही असं तिथलं हवामान कोणालाही सुखद वाटण्यासारखंच आहे. आजचं बंगलोर हे दुस-या महायुध्दापूर्वी अगदी लहानसं आणि टुमदार शहर होतं. दुस-या महायुध्दात भौगोलीक स्थानवैशिष्ट्यामुळे आणि औद्योगीक प्रगतीमुळे बंगलोरची झपाट्याने वाढ झाली.