एकटेपणा
आपल्या आयुष्यात, आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. काही संस्कार, परंपरा यातून काही अंगवळणी पडलेल्या असतात. अशाच गोष्टी, प्रसंग यांचा अन्वयार्थ शोधणारं हे नवं सदर… आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा…
एक चित्रकार. तसा तो या कलेच्या क्षेत्रात नवीनच. फारसं नाव नसलेला किंवा या क्षेत्रापुरतं म्हणायचंच झालं तर अनोळखी. या चित्रकाराचं एक स्वप्न होतं, ते स्वप्न म्हणजे त्याला आवडणार्या एका सुंदर व्यक्तिचं रूपचित्र (Portrait) काढणं. अर्थात त्याकाळी ती व्यक्ती प्रसिद्धीच्या उंच शिखरावर विराजमान असल्यामुळे आपलं स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण होईल की नाही याबद्दल त्याला स्वतःलाच थोडी शंका होती.