दाभोळ जेटीवर कोकण क्रुज फेस्टीवलचे आयोजन
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळ फेरीबोट जेटीवर २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘कोकण क्रुज फेस्टीवल’चे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातील क्रुज संस्कृती कोकणच्या भूमिवर अनुभवण्याची संधी दाभोळ क्रुजवर मिळणार आहे. या महोत्सवात ५० मिनिटांचा भरगच्च कार्यक्रम सादर केला जाणार असून, यामध्ये गोवन फोक डान्स, पोर्तुगीज डान्स, कोळीडान्स, मराठमोळी लावणी तसेच बच्चे कंपनीकरीता खास डान्सचे आयोजन करण्यात आले आहे.
आपटा - गुळसुंदा - कर्नाळा (+फोटो)
दिप्सचा कर्नाळा भटकंती लेख वाचून तिकडे पुन्हा जावेसे वाटू लागले. विचार केला कोकण रेल्वेने जाताना रसायनी,आपटा स्टेशनच्या पश्र्चिमेस कर्नाळ्याचा सुळका दिसतो तर तिकडून जावे.
१)ठाकरवाडीतला जैतू आणि कर्नाळा
२)
३)पाताळगंगा नदी
४)नदीकाठचे सिध्देश्वर,गुळसुंदा
५)लाल सावरीचे फुल
६)पांढरी सावर कमी आढळते
७)रानफुले
सकाळच्या दिवा सावंतवाडी रेल्वेला फार गर्दी असते म्हणून ९.१०च्या दिवा रोहाने जायचे ठरवले. डोँबिवलीहून लोकलने दिवा स्टेशनला उतरण्यापेक्षा विशाळगडाची खिंड लढवणे सोपे असावे. पुढचा प्रवास छान झाला. बरेच प्रवासी नावड्याला उतरून गेले.
दिनांक ५ किंवा ६ डिसेंबरला प्रभाकर पेठकर ह्यांच्याबरोबर पुणे कट्ट्याला येणार का?
खरेतर हा कट्टा ऑक्टोबर मध्येच होणार होता.
पण काही कारणांमुळे कट्टा थोडा उशीरा होत आहे.
श्री.पेठ्कर ह्यांच्याकडे वेळ फार कमी असल्या कारणामुळे कट्ट्यासंदर्भात जास्त काही आखू शकलो नाही.तसदी बद्दल क्षमस्व.
आता पुण्यात कट्टा नक्की कुठे करायचा?
किती वाजता करायचा?
खायला-प्यायला काय आणायचे?
इत्यादी साधक-बाधक चर्चा करायला पुणेकर समर्थ आहेतच.
तस्मात धागा काढून आम्ही तुर्त आपली रजा घेतो.
(तरी पण अधून-मधून पिंका टाकायला येवूच.पुणेकरांच्या धाग्यावर पुण्यातल्या लोकांपेक्षा इतर नगरातील लोकांच्या उड्याच जास्त.)
टेक्श्चर
कापडाच्या दुकानात
एक कापड आवडलं
पण घेतलं नाही
दुकानदाराला सांगितलं
धागा छान आहे
रंग उत्तम आहे
नक्षीही सुरेख आहे
फक्त 'टेक्श्चर' चांगलं नाही
नंतर विचार केला, तेंव्हा
काही माणसं डोळ्यासमोर तरळली;
त्यांचही असंच आहे....
काव्यरस
युरेका
न्यूटन पास्कल Bohr सारे शाळेमध्ये भेटले होते
काही कळले काही घोकले तर काही बिनधास्त ठोकले होते .
शांततेनंतरचं वादळ - Thunder down under
"We must dig in and get through to tea. And we must play on." भावुक झालेला ऑझी कर्णधार मायकेल क्लार्क आपल्या धाकट्या भावासारख्या सहकार्याला श्रद्धांजली वाहत होता. तेव्हा फक्त मॅक्सविलच्या शाळेत उपस्थित ऑझी पंतप्रधान, आजी-माजी क्रिकेटपटू, ह्यूज कुटुंबीय आणि चाहत्यांचेच नाही तर क्रिकेट आवडणार्या / नावडणार्या जगभरातल्या कुठल्याही सहृदय माणसाचे डोळे पाणावले असतील.
२५ नोव्हेंबरपासून सगळं क्रिकेटविश्व हादरलंच होतं. कारणही तसच आक्रीत. आत्तापर्यंत असे शेकडो बाऊन्सर्स टोलवलेला आणि झेललेला फिल ह्यूज सिडनीच्या मैदानावरच एका विचित्र अपघाताने कोसळला.
अंधार क्षण भाग ४ - सॅम्युएल विलेनबर्ग (लेख १६)
अंधार क्षण - सॅम्युएल विलेनबर्ग
साल १९४२. मध्य युरोप.गोळीबार आणि बाँबस्फोट यांच्याशिवाय अजून एक आवाज त्यावेळी लोकांना ऐकू येत होता, तो म्हणजे आगगाड्यांचा. असंख्य आगगाड्या लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात होत्या. पण या आगगाड्या नेहमीसारख्या नव्हत्या. त्यांमधून प्रवास करणारे लोक कधीच परत येणार नव्हते. या गाड्या लोकांना ऑशविट्झ, रॅव्हेन्सब्रुक, बेल्झेक, चेल्म्नो, सॉबिबॉर या आणि इतर मृत्युछावण्यांमध्ये घेऊन जात आणि अजून लोकांना तिथे घेऊन जाण्यासाठी परत येत.
१९४२ च्या वसंतऋतूमध्ये सॅम्युएल विलेनबर्ग नावाचा १९ वर्षांचा ज्यू तरुण अशाच एका आगगाडीतून चालला होता.
नजर
नजरेला नजर बांधून
डोळ्यांनीच नुसतं पाहणं तुझं,
न बोलूनही सांगतं सारं काही।।
जाता जाता मिश्किल हसून
ओठांवर नजर खिळवणं तुझं,
प्रीतीचं रोमांच फुलवतात किती।।
चालता चालता थबकून
मागे वळून पाहणं तुझं,
चोरून चोरून पाहण अन्
गालातल्या गालात हसणं तुझं
ह्रद्याच्या तारा छेडतात किती।।
दूरवर जावूनही नजरेनं
शोधत राहणं तुझं
अन् रोज रात्री स्वप्नात येवून
प्रेम गीतं शिकवणं तुझं
गीताला सुरांची देतात प्रीती।।
तरीही तरीही सांगून टाक् ह्रद्यातलं सारं
कारण तू ही अधांतरी राहून
मलाही अधांतरी ठेवणार किती?
मोठ्ठे आरसे
मुलींच्या वस्तीग्रुहात मी त्याला पकडले
कॉलर पकडुन ओढत बाहेर काढले
बहिणिस आपल्या खांद्यावर होते घेतलेले
घाबरलेले पोर ते ,बोलण्यास न धजावले
दटावताच पोर ते रडु लागले
बहिणीस सावरत हातापाया पडु लागले
"बहिणीला माज्या चेहरा बघायचा व्हता
आयला मारताना बान आरसा फॉड्ला
आरश्यातबी हि लय ग्वाड दिस्सल
बघुन स्वताकडं 'एकडाव ' तरी हसलं
ह्या बारीस जौद्या, परत येत नाय
मोठया आरशात बघायची औकात नाही
आरसे आपले खरेच मोठे आहेत..
पण आपलाच चेहरा का लपवतायत??
काव्यरस
मिसळपाव